Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 191
ऋषिः - इरिम्बिठिः काण्वः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

आ꣡ या꣢हि सुषु꣣मा꣢꣫ हि त꣣ इ꣢न्द्र꣣ सो꣢मं꣣ पि꣡बा꣢ इ꣣म꣢म् । ए꣢꣫दं ब꣣र्हिः꣡ स꣢दो꣣ म꣡म꣢ ॥१९१॥

स्वर सहित पद पाठ

आ꣢ । या꣣हि । सुषुम꣢ । हि । ते꣣ । इ꣡न्द्र꣢꣯ । सो꣡म꣢꣯म् । पि꣡ब꣢꣯ । इ꣣म꣢म् । आ । इ꣣द꣢म् । ब꣣र्हिः꣢ । स꣣दः । म꣡म꣢꣯ ॥१९१॥


स्वर रहित मन्त्र

आ याहि सुषुमा हि त इन्द्र सोमं पिबा इमम् । एदं बर्हिः सदो मम ॥१९१॥


स्वर रहित पद पाठ

आ । याहि । सुषुम । हि । ते । इन्द्र । सोमम् । पिब । इमम् । आ । इदम् । बर्हिः । सदः । मम ॥१९१॥

सामवेद - मन्त्र संख्या : 191
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 8;
Acknowledgment

शब्दार्थ -
(आयाहि) आपण यावे. (ते) आम्ही आपणांकरिता (सुषुमहि) सोमरस गाळून तयार केला आहे. आध्यात्मिक व वास्तविक अर्थ असा की (आम्ही उपासकांनी / प्रजाजनांची / शिष्यांनी / गृहस्थांनी) आपल्यासाठी श्रद्धा, ज्ञान, कर्म, उपासना आदी भावनांचा रस निष्पादित केला आहे (हृदय त्यासाठी तत्पर केले आहे) हे (इन्द्र) परमात्मा, राजा, आचार्य, अतिथिप्रवर, आपण (इमम्) आम्ही समर्पित करीत असलेल्या (सोम्) श्रद्धा, ज्ञान, कर्म, उपासना, राज्यकर, सोम औषधीचा रस आदी रस (पिब) प्या. (इदम्) या (मम) माझ्या (बर्हिः) हृदयासनावर, राज्यासनावर अथवा कुशासनावर आपण (आ सदः) स्थानापन्न व्हा.।। ७।।

भावार्थ - सर्व मनुष्यांचे हे हिताचे आहे की त्यानी हृदयात परमेश्वराला प्रकाशित कर त्याची उपासना करावी आणि राजा, आचार्य, उपदेशक, संन्यासी आदींना घरी निमंत्रित करून त्यांचा यथोचित आदर- सत्कार करावा. ।। ७।।

इस भाष्य को एडिट करें
Top