Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 199
ऋषिः - श्रुतकक्ष आङ्गिरसः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
इ꣡न्द्र꣢ इ꣣षे꣡ द꣢दातु न ऋभु꣣क्ष꣡ण꣢मृ꣣भु꣢ꣳ र꣣यि꣢म् । वा꣣जी꣡ द꣢दातु वा꣣जि꣡न꣢म् ॥१९९॥
स्वर सहित पद पाठइ꣡न्द्रः꣢꣯ । इ꣣षे꣢ । द꣣दातु । नः । ऋभुक्ष꣡ण꣢म् । ऋ꣣भु । क्ष꣡ण꣢꣯म् । ऋ꣣भु꣢म् । ऋ꣣ । भु꣢म् । र꣣यि꣢म् । वा꣣जी꣢ । द꣣दातु । वाजि꣡न꣢म् ॥१९९॥
स्वर रहित मन्त्र
इन्द्र इषे ददातु न ऋभुक्षणमृभुꣳ रयिम् । वाजी ददातु वाजिनम् ॥१९९॥
स्वर रहित पद पाठ
इन्द्रः । इषे । ददातु । नः । ऋभुक्षणम् । ऋभु । क्षणम् । ऋभुम् । ऋ । भुम् । रयिम् । वाजी । ददातु । वाजिनम् ॥१९९॥
सामवेद - मन्त्र संख्या : 199
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 9;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 9;
Acknowledgment
विषय - इन्द्राने आम्हाला काय काय द्यावे, पुढील मंत्रात याविषयी कथन केले आहे -
शब्दार्थ -
(इन्द्रः) सर्व ऐश्वर्यांचा मूळ कोष आणि जो सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्रदान करण्यात समर्थ आहे, असा परमेश्वर (इषे) राष्ट्रोन्नतीसाठी, अभीष्ट प्राप्ती आणि मोक्ष प्राप्तीसाठी (नः) आम्हाला (ऋभुम्) अति तेजस्वी, सत्याच्या प्रकाशाने देदीप्यमान, सत्यनिष्ठ, मेधावी ब्राह्मण देवो. तसेच आम्हा उपासकांना / नागरिकांना (ऋव्युक्षणम्) मेधावीजनांना आधार देणआरी उत्तम (रथिम्) धन-संपदा (ददातु) देवो. तसेच तो (वाजी) बलवान इन्द्र (वाजिनम्) बली व राष्ट्र रक्षानिपुण क्षत्रिय (आमच्या राष्ट्राला) (ददातु) देवो. ।। ६।।
भावार्थ - (नागरिक कामना व्यक्त करीत आहेत) - परमेश्वराच्या कृपेने आमच्या राष्ट्रात सत्यशील, उपदेश कुशल, मेधावी, विज्ञानवान, ब्रह्मवर्चस्वी ब्राह्मण जन्माला यावेत. तसेच बलवंत, धनुर्विद्या पारंगत, नीरोगी, महारथी, राष्ट्ररक्षेसाठी तत्पर सदा विजयशील शूरवीर क्षत्रिय जन्माला यावेत. कृषी व व्यापार- व्यवसायात कुशल, धनसंपन्न, दानशील वैश्य आमच्या राष्ट्रात उत्पन्न व्हावेत. सर्व राष्ट्रवासी धनपती होऊन प्रगती व अभ्युदय प्राप्त करोत, सर्व जण आनंदाने धर्ममय आयुष्य जगत मोक्षाकरिता यत्नशील असावेत (अशी आम्ही कामना वा परमेश्वराजवळ प्रार्थना करीत आहोत.) ।। ६।।
विशेष -
या मंत्रात ‘ददातु’ आणि ‘ऋभु’ या दोन शब्दांची पुनरावृत्ती असल्यामुळे लाटानुप्रास अलंकार आहे. ‘वाजी, वाजि’ या शब्दांमुळे छेकानुप्रास अलंकार आहे. ।। ६।।