Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 200
ऋषिः - गृत्समदः शौनकः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
इ꣡न्द्रो꣢ अ꣣ङ्ग꣢ म꣣ह꣢द्भ꣣य꣢म꣣भी꣡ षदप꣢꣯ चुच्यवत् । स꣢꣫ हि स्थि꣣रो꣡ विच꣢꣯र्षणिः ॥२००॥
स्वर सहित पद पाठइ꣡न्द्रः꣢꣯ । अ꣣ङ्ग꣢ । म꣣ह꣢त् । भ꣣य꣢म् । अ꣣भि꣢ । सत् । अ꣡प꣢꣯ । चु꣣च्यवत् । सः꣢ । हि । स्थि꣣रः꣢ । वि꣡च꣢꣯र्षणिः । वि । च꣣र्षणिः ॥२००॥
स्वर रहित मन्त्र
इन्द्रो अङ्ग महद्भयमभी षदप चुच्यवत् । स हि स्थिरो विचर्षणिः ॥२००॥
स्वर रहित पद पाठ
इन्द्रः । अङ्ग । महत् । भयम् । अभि । सत् । अप । चुच्यवत् । सः । हि । स्थिरः । विचर्षणिः । वि । चर्षणिः ॥२००॥
सामवेद - मन्त्र संख्या : 200
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 9;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 9;
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात इन्द्राला विनंती केली आहे की आम्हाला निर्भय कर -
शब्दार्थ -
(या मंत्राचे तीन अर्थ आहेत) प्रथम अर्थ - (परमात्मपर) - (अड्ग) हे बंधू (अथक हे माझ्या परम मित्रा) (इन्द्रः) विघ्नविदारक, सिद्धिप्रदाता परमेश्वर (अभि सत्) सर्वांना अभिभूत करणाऱ्या सतावणाऱ्या (महत्) (भय़म्) मोठ्याहून मोठ्या अशा भीतीला म्हणजे विपत्ती, काम- क्रोध, शत्रू- उत्पीदन अथवा मरणाच्या भयाला (अप चुच्यवत्) पूर्णपणे दूर करो. कारण की (हि) (सः) तो निश्चयाने (स्थिरः) भयाने कधीही उद्विग्न वा भयभीत होणारा नसून स्थिर मती आहे. तसेच तो (विचर्षणिः) भय- निवारणाचे उपाय प्रेरणा रूपाने दर्शवितो (संकटकाळी धीर देतो व भय दूर करतो.)
द्वितीय अर्थ - (सूर्यपर) - (अड्ग) हे बन्धू वा मित्रा, (इन्द्रः) अंधकार- विनाशक, प्रकाशदाता सूर्य (अभि सत्) अभिभूत करणाऱ्या (सर्वांना सतावणाऱ्या) (महत्) (भयम्) मोठआहून मोठ्या भीतीला म्हणजे रोग, व्याघ्र आदी हिंसक प्राणी, पृथ्वी आदी ग्रह- उपग्रहांच्या एकमेकावर टक्कर वा आदळणे यासारख्या भयांना (अप चुच्यवत्) नष्ट करतो, (हि) कारण की (सः) तो सूर्य (स्थिरः) आकर्षण शक्तीने आकाशात स्थिर असून म्हणजे केवळ स्वतःच्या धुरीवर भ्रमण करणारा आहे म्हणून तो इतर स्थानात जात नाही म्हणून गतिरहित आहे. तसेच तो (विचर्षणिः) प्रकाश दानाद्वारे सर्व पदार्थ पाहण्याची शक्ती आम्हास देतो.।।
तृतीय अर्थ - (राष्ट्रपर) - (अड्ग) हे बंधू, (इन्द्रः) परम धनवान, शत्रुविदारक, प्रजेला सुख- संपत्ती देणारा राजावा सेनापती (अभि सत्) राष्ट्रात व्याप्त होणाऱ्या (महत्) (भयम्) मोठ मोठ्या भीतीला (अप चुच्यवत्) दूर करो (हि) कारण की (सः) तो (स्थिरः) आपल्या सेनाध्यक्ष पदावर स्थिर असून (विचर्षणिः) गुप्तचर रूप नेत्रांद्वारे राष्ट्रात व शत्रुराष्ट्रात घडणाऱ्या सर्व परिस्थितीचा विशेष द्रष्टा आहे. ।। ७।।
भावार्थ - मनुष्यांना विविध भय त्रस्त व दुःखी करीत असतात. कधी त्यांना काम- क्रोधादी शत्रू सतावतात, तर कधी माणसांना दुष्काळ, नद्यांचा पूर, संक्रामक रोग आदी त्रस्त करतात. कधी माणसाला माणसापासून तर कधी वाघ आदी हिंसक प्राण्यापासून भय वाटते. कधी राष्ट्राला शत्रूच्या आक्रमणापासून भीती तर कधी चोर, दरोडेखोर, ठक, लुटारू यांपासून भीती असते तर कधी जन्मृ मृत्यूची भीती वाटते व माणूस दुःखी होतो. मंत्रात कामना केली आहे की सर्वद्रष्टा परमेश्वराने, स्थिर प्रकाशक सूर्याने तर स्थिर गुप्तचर ज्याचे नेत्र, त्या राजाने प्रजेला, मनुष्याला सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्त करावे. त्या निर्भय वातावरणामुळे सर्व जण अभ्युदय व निः श्रेयस (लौकिक उत्कर्ष व मोक्ष) प्राप्त करू शकतील. ।। ७।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे।। ७।।