Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 203
ऋषिः - वामदेवो गौतमः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

न꣡ कि꣢ इन्द्र꣣ त्व꣡दुत्त꣢꣯रं꣣ न꣡ ज्यायो꣢꣯ अस्ति वृत्रहन् । न꣢ क्ये꣣वं꣢꣫ यथा꣣ त्व꣢म् ॥२०३॥

स्वर सहित पद पाठ

न꣢ । कि꣣ । इन्द्र । त्व꣢त् । उ꣡त्त꣢꣯रम् । न । ज्या꣡यः꣢꣯ । अ꣣स्ति । वृत्रहन् । वृत्र । हन् । न꣢ । कि꣣ । एव꣢म् । य꣡था꣢꣯ । त्वम् ॥२०३॥


स्वर रहित मन्त्र

न कि इन्द्र त्वदुत्तरं न ज्यायो अस्ति वृत्रहन् । न क्येवं यथा त्वम् ॥२०३॥


स्वर रहित पद पाठ

न । कि । इन्द्र । त्वत् । उत्तरम् । न । ज्यायः । अस्ति । वृत्रहन् । वृत्र । हन् । न । कि । एवम् । यथा । त्वम् ॥२०३॥

सामवेद - मन्त्र संख्या : 203
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 9;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (इन्द्र) परमेश्वरा, (त्वत्) तुझ्यापेक्षा (उत्तरः) गुणांमध्ये अधिक (न कि) कोणी नाही. हे (वृत्रहन्) विघ्नविनाशक, तुझ्यापेक्षा वयात (ज्यायः) जास्त असलेला कोणीही (न) (अस्ति) नाही. (कारण तू नित्य व अजर - अमर आहेस) तसेच (यथा) जसा (त्वय्) तू आहेस (अजर, अमर, सच्चिदानंद आदी स्वरूपाचा जसा तू आहेस) तसा (न कि एवम्) कोणीही नाही, हे निःसंशय।। १०।।

भावार्थ - अतिविशाल या ब्रह्मांडात ज्यापेक्षा अधिक गुणवान कुणी नाही आणि ज्याच्यापेक्षा अधिक वृद्ध कुणी नाही, अशा त्या जगदीश्वराची पूजा (उपासना) सर्वांनी अवश्य केली पाहिजे.।। १०।। या दशतीमध्ये इन्द्र परमेश्वराप्रत ज्ञान, कर्म, उपासना रूप सोम अर्पण करणे, त्याचे स्तुतिगान, त्यापासून धनाची याचना करणे, त्याचे महत्त्व विशद करणे, इन्द्र या नावाने आचार्य, राजा व सूर्य यांचे र्वऩ हे सर्व विषय वर्णित आहेत. यामुळे या दशतीच्या मंत्राच्या अर्थाशी या पूर्वीच्या दशतीची संगती आहे, असे जाणावे.।।

इस भाष्य को एडिट करें
Top