Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 202
ऋषिः - भरद्वाजो बार्हस्पत्यः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
इ꣢न्द्रा꣣ नु꣢ पू꣣ष꣡णा꣢ व꣣य꣢ꣳ स꣣ख्या꣡य꣢ स्व꣣स्त꣡ये꣢ । हु꣣वे꣢म꣣ वा꣡ज꣢सातये ॥२०२॥
स्वर सहित पद पाठइ꣡न्द्रा꣢꣯ । नु । पू꣣ष꣡णा꣢ । व꣣य꣢म् । स꣣ख्या꣡य꣢ । स꣣ । ख्या꣡य꣢꣯ । स्व꣣स्त꣡ये꣢ । सु꣣ । अस्त꣡ये꣢ । हु꣣वे꣡म꣢ । वा꣡ज꣢꣯सातये । वा꣡ज꣢꣯ । सा꣣तये ॥२०२॥
स्वर रहित मन्त्र
इन्द्रा नु पूषणा वयꣳ सख्याय स्वस्तये । हुवेम वाजसातये ॥२०२॥
स्वर रहित पद पाठ
इन्द्रा । नु । पूषणा । वयम् । सख्याय । स । ख्याय । स्वस्तये । सु । अस्तये । हुवेम । वाजसातये । वाज । सातये ॥२०२॥
सामवेद - मन्त्र संख्या : 202
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 9;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 9;
Acknowledgment
विषय - आम्ही कल्याणासाठी कुणाला हाक द्यावी, पुढील मंत्रात हा विषय वर्णित आहे -
शब्दार्थ -
(वयम्) आम्ही प्रजाजनांनी (सख्याय) मैत्रीसाठी तसेच (स्वस्तये) अविनाशी, उत्तम दशा व कल्याणासाठी (इन्द्रा पूषणा) परमात्मा - जीवात्मा, प्राण- अपान, राजा- सेनापती, क्षत्रिय वैश्य आणि विद्युत वायू या सर्वांना (योग्य व आवश्यक त्या त्या वेळी) (नु) अवश्यमेव हाक मारावी (व यांचे साहाय्य घ्यावे) तसेच (वाजसातये) अन्न, धन, शक्ती, वेग, विज्ञान, प्राणशक्ती आणि आत्मशक्ती प्राप्त करविणाऱ्या आंतरिक व बाह्य संग्रामामध्ये यशस्वी होण्याकरिता वर उल्लेखिलेल्या सर्वांना हाक मारावी व त्यांचे साहाय्य घ्यावे (हेच आमच्या हिताचे आहे.) ।। ९।।
भावार्थ - मानवीय जीवनात प्रत्येकाच्या मनात व बाह्य परिस्थितीत सतत युद्ध वा संघर्ष सुरू असतो. त्या संघर्षात जे लोक परमात्मा, जीवात्मा, प्राण, अपान, राजा, सेनापती, क्षत्रिय, वैश्य, विद्युत आणि वायूशी मैत्री करतात, तेच लोक विजय संपादन करतात. ।। ९।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. कारण की इथे ङ्गइन्द्रा- पूषणाफ या शब्दाचे एकाहून अधिक म्हणजे अनेक अर्थ आहेत. ।। ९।।