Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 205
ऋषिः - मधुच्छन्दा वैश्वामित्रः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
अ꣡सृ꣢ग्रमिन्द्र ते꣣ गि꣢रः꣣ प्र꣢ति꣣ त्वा꣡मुद꣢꣯हासत । स꣣जो꣡षा꣢ वृष꣣भं꣡ पति꣢꣯म् ॥२०५॥
स्वर सहित पद पाठअ꣡सृ꣢꣯ग्रम् । इ꣣न्द्र । ते । गि꣡रः꣢꣯ । प्र꣡ति꣢꣯ । त्वाम् । उत् । अ꣣हासत । सजो꣡षाः꣢ । स꣣ । जो꣡षाः꣢꣯ । वृ꣣षभ꣢म् । प꣡ति꣢꣯म् ॥२०५॥
स्वर रहित मन्त्र
असृग्रमिन्द्र ते गिरः प्रति त्वामुदहासत । सजोषा वृषभं पतिम् ॥२०५॥
स्वर रहित पद पाठ
असृग्रम् । इन्द्र । ते । गिरः । प्रति । त्वाम् । उत् । अहासत । सजोषाः । स । जोषाः । वृषभम् । पतिम् ॥२०५॥
सामवेद - मन्त्र संख्या : 205
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 10;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 10;
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात परमेश्वराच्या स्तुतिविषयी सांगितले आहे -
शब्दार्थ -
हे (इन्द्र) पूजनीय जगदीश्वरा, मी (ते) तुझी स्तुती करण्यासाठी (गिरः) वेदवाणी (असृग्रम्) उच्चारित करीत आहे. (सजोषाः) गहन प्रेमाने उच्चारित केलेली ही वेदवाणी (वृषभम्) सर्व अभीष्ट पदार्थांची वृष्टी करणाऱ्या (पतिम्) पालनकर्ता (त्वां प्रति) आपणाला उद्देशून (उद् अहासत) (माझ्या हृदयातून) उठत आहे आणि तुला प्राप्त करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे.।। २।।
भावार्थ - जर उपासकाने वेदवाणीद्वारे अत्यंत प्रेमाने ईश्वराची स्तुती केली, तर तो अवश्य प्रसन्न होतो आणि स्तोतासाठी तो धर्म, अर्थ, काम, मोक्ष (या चार पुरुषार्थांची) वृष्टी करतो।। २।।
विशेष -
एक प्रीतिमयी भार्या ज्याप्रमाणे आपल्या पोषक प्रिय पतीला प्राप्त करण्यासाठी त्याच्याकडे जाते, तद्वत माझी (उपासकाची) स्तुती तुझ्यापर्यंत जाते. या मंत्रातील उपमा अलंकारामुळे हा ध्वनी व्यक्त होत आहे.।। २।।