Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 206
ऋषिः - वत्सः काण्वः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
सु꣣नीथो꣢ घा꣣ स꣢꣫ मर्त्यो꣣ यं꣢ म꣣रु꣢तो꣣ य꣡म꣢र्य꣣मा꣢ । मि꣣त्रा꣢꣫स्पान्त्य꣣द्रु꣡हः꣢ ॥२०६॥
स्वर सहित पद पाठसु꣣नीथः꣢ । सु꣣ । नीथः꣢ । घ꣣ । सः꣢ । म꣡र्त्यः꣢꣯ । यम् । म꣣रु꣡तः꣢ । यम् । अ꣣र्यमा꣢ । मि꣣त्राः꣢ । मि꣣ । त्राः꣢ । पा꣡न्ति꣢꣯ । अ꣣द्रु꣡हः । अ꣣ । द्रु꣡हः꣢꣯ ॥२०६॥
स्वर रहित मन्त्र
सुनीथो घा स मर्त्यो यं मरुतो यमर्यमा । मित्रास्पान्त्यद्रुहः ॥२०६॥
स्वर रहित पद पाठ
सुनीथः । सु । नीथः । घ । सः । मर्त्यः । यम् । मरुतः । यम् । अर्यमा । मित्राः । मि । त्राः । पान्ति । अद्रुहः । अ । द्रुहः ॥२०६॥
सामवेद - मन्त्र संख्या : 206
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 10;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 10;
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात मित्र, मरुत् आणि अर्यमा, याविषयी कथन केले आहे -
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) - (अध्यात्म पर) - हे इन्द्र परमात्मा (सः) तो (मर्त्यः) मरणधर्मा मनुष्य (घ) निश्चयाने अवश्यमेन (सुनीथः) शुभनीतिसंपन्न होतो वा कीर्तिमंत होतो (यम्) ज्याला (मरुतः) प्राणशक्ती (यम्) ज्याला (अर्यमा) श्रेष्ठ विचारवान सम्नानित आत्मा आणि (अद्रुहः) द्रोह न करणारे (मित्राः) व त्यांचे मित्र झालेले मन, बुद्धी, चित्त, अहंकार, नेत्र, कर्म, त्वचा, नासिका आणि जिहृा ज्याचे (पान्ति) रक्षण करतात, ज्याचे पालन करतात. (सर्व इंद्रिये, मन, बुद्धी आदी ज्या मनुष्याला रश आहेत, तो स्वीकृत कार्यात अवश्य सफल होतो.)।।
द्वितीय अर्थ - (राष्ट्रपर) - हे इन्द्र राजा, (सः) तो (मर्त्यः) प्रजानन (घ) निश्चयाने (सुनीयः) सन्मार्गावर चालणारा आणि सदाचार परायण होतो (यम्) ज्याला (मरुतः) वीर क्षत्रिय, (यम्) ज्याला (अर्यमा) धार्मिक विभागाचा न्यायाधीश आणि (अद्रुहः) राजद्रोह अथवा प्रजाद्रोह न करणारे (मित्राः) मित्र झालेले अन्य राज्याधिसारीगण (पान्ति) संकटांपासून वाचवतात वा ज्याचे काळजीपूर्वक पालन करतात. ।। ३।।
भावार्थ - या जगात वा या राष्ट्रात अनेक लोक उचित मार्गदर्शन न मिळाल्यामुळे सन्मार्गापासून ढळतात, पण अध्यात्म मार्गावर चालणाऱ्या ज्या माणसावर जीवात्मा व प्राण आदीशक्ती अनुग्रह करतात आणि राष्ट्रात राज्याधिकारी जन ज्याची सहायत करतात, तो मनुष्य निरंतर प्रगती करीत ध्येय प्राप्त करण्यात अवश्य यशस्वी होतो.।। ३।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे ।। ३।।