Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 210
ऋषिः - विश्वामित्रो गाथिनः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
धा꣣ना꣡व꣢न्तं कर꣣म्भि꣡ण꣢मपू꣣प꣡व꣢न्तमु꣣क्थि꣡न꣢म् । इ꣡न्द्र꣢ प्रा꣣त꣡र्जु꣢षस्व नः ॥२१०॥
स्वर सहित पद पाठधा꣣ना꣡व꣢न्तम् । क꣣रम्भि꣡ण꣢म् । अ꣣पूप꣡व꣢न्तम् । उ꣣क्थि꣡न꣢म् । इ꣡न्द्र꣢꣯ । प्रा꣣तः꣢ । जु꣣षस्व । नः ॥२१०॥
स्वर रहित मन्त्र
धानावन्तं करम्भिणमपूपवन्तमुक्थिनम् । इन्द्र प्रातर्जुषस्व नः ॥२१०॥
स्वर रहित पद पाठ
धानावन्तम् । करम्भिणम् । अपूपवन्तम् । उक्थिनम् । इन्द्र । प्रातः । जुषस्व । नः ॥२१०॥
सामवेद - मन्त्र संख्या : 210
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 10;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 10;
Acknowledgment
विषय - परमेश्वराचे वा विद्वान अतिथीचे उपवाहन (इंद्र नावाने)
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (विद्वान अतिथिविषयी) हे (इन्द्र) विद्वान, आपण ९प्रातः) या प्रभातकाळी (न्) आम्ही करीत असलेल्या या यज्ञात, ज्यात (धानावन्तम्) भाजलेल्या जव आहेत, (करम्भिणम्) तूप मिश्रित सातू आहेत आणि (अपूपवन्तम्) तूप लावलेले जव वा तांदळाच्या पुऱ्या ज्यात आहेत आणि (उक्ऴिनम्) ज्यात वेदमंत्र म्हटले जात आहेत, अशा यज्ञाचे (अतिथी यज्ञाचे (जुषस्व) प्रेमाने सेवन करा (आम्हा गृहस्थांचे आतिथ्य स्वीकारा)।।
द्वितीय अर्थ - (अध्यात्मपक्षीं) हे इन्द्र परमेश्वर, आपण (प्रातः) या प्रभातकाळी (नः) आमच्या (धानावन्तम्) धारणा, ध्यान, समाधीने युक्त म्हणजे उपासनामय (करम्भिणम्) कर्मकांड वा विधीद्वारे होत असलेल्या (अपूपवन्तम्) ज्ञानकांडाने संपन्न आणि (उक्थिनम्) सामगानाद्वारे समृद्ध अशा उपासना- यज्ञाचा (जुषस्व) प्रेमाने स्वीकार करा. ।। ७।।
भावार्थ - सर्व मनुष्यांचे कर्तव्य आहे की त्यानी जव, सातू, पुऱ्या आदी सुवासिक, मधुर, पुष्टिकर आणि आरोग्यदायी द्रव्यांचा अग्नीत होम करावा आणि त्याद्वारे वायुमंडल स्वच्छ व प्रदूषणविरहित करावे. तसेच ज्ञान, कर्म आणि उपासना यांचा आधार घेत सामगान करीत परमेश्वराची पूजा करावी. अशा प्रकारे मनुष्यांनी अश्युदय (ऐहिक उन्नती) व निःश्रेयस (आत्मिक उन्नती वा मोक्ष) प्राप्त करावा.।। ७।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे.।। ७।।