Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 209
ऋषिः - वामदेवो गौतमः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

अ꣡रं꣢ त इन्द्र꣣ श्र꣡व꣢से ग꣣मे꣡म꣢ शूर꣣ त्वा꣡व꣢तः । अ꣡र꣢ꣳ शक्र꣣ प꣡रे꣢मणि ॥२०९

स्वर सहित पद पाठ

अ꣡र꣢꣯म् । ते꣣ । इन्द्र । श्र꣡व꣢꣯से । ग꣣मे꣡म꣢ । शू꣣र । त्वा꣡व꣢꣯तः । अ꣡र꣢꣯म् । श꣣क्र । प꣡रे꣢꣯मणि ॥२०९॥


स्वर रहित मन्त्र

अरं त इन्द्र श्रवसे गमेम शूर त्वावतः । अरꣳ शक्र परेमणि ॥२०९


स्वर रहित पद पाठ

अरम् । ते । इन्द्र । श्रवसे । गमेम । शूर । त्वावतः । अरम् । शक्र । परेमणि ॥२०९॥

सामवेद - मन्त्र संख्या : 209
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 10;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (शूर) विक्रमी (इन्द्र) ऐश्वर्यशाली परमात्मा, (त्वावतः) तुझ्यासारखा अन्य कोणी नसल्यामुळे तू तुझ्यासारखा एकमेव आहेस. (श्रवसे) यशाच्या प्राप्तीकरिता वा (ते) तुझे यशोगान करण्याकरिता आम्ही उपासक (अरम्) पर्याप्त रूपेण तुला (गमेम) प्राप्त करावे. हे (शख्र) सर्व कार्ये करण्यात समर्थ असलेल्या हे शक्तिशाली परमेश्वरा, (परेमणि) ज्याद्वारे तुझा साक्षात्कार होतो, त्या परा विद्येमध्ये (गमेम) आम्ही पारंगत व्हावे (अशी इच्छा करीत आहोत) ।। ६।।

भावार्थ - अनुपम परमेश्वराचे कीर्तिगान करण्यासाठी आणि त्याचे गहन वा अतर्क्य स्वरूप हस्तामलकवत जाणून घेण्यासाठी सर्व लोकांनी प्रवृत्त व्हायला हवे. केवळ अपरा विद्या प्राप्त करून (भौतिक संपदा व लौकिक यश संपादून) संतुष्ट राहू नये तर परा विद्योत (अध्यात्म विद्येत) प्रवीण व्हायला पाहिजे. ।। ६।।

इस भाष्य को एडिट करें
Top