Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 225
ऋषिः - मेधातिथिः काण्वः प्रियमेधश्चाङ्गिरसः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
उ꣣क्थं꣢ च꣣ न꣢ श꣣स्य꣡मा꣢नं꣣ ना꣡गो꣢ र꣣यि꣡रा चि꣢꣯केत । न꣡ गा꣢य꣣त्रं꣢ गी꣣य꣡मा꣢नम् ॥२२५॥
स्वर सहित पद पाठउ꣣क्थ꣢म् । च꣣ । न꣢ । श꣣स्य꣡मा꣢नम् । न । अ꣡गोः꣢꣯ । अ । गोः꣣ । रयिः꣢ । आ । चि꣣केत । न꣢ । गा꣣यत्रम् । गी꣣य꣡मा꣢नम् ॥२२५॥
स्वर रहित मन्त्र
उक्थं च न शस्यमानं नागो रयिरा चिकेत । न गायत्रं गीयमानम् ॥२२५॥
स्वर रहित पद पाठ
उक्थम् । च । न । शस्यमानम् । न । अगोः । अ । गोः । रयिः । आ । चिकेत । न । गायत्रम् । गीयमानम् ॥२२५॥
सामवेद - मन्त्र संख्या : 225
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 12;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 12;
Acknowledgment
विषय - कोणाचे कार्य अयशस्वी होते
शब्दार्थ -
(अगोः) अश्रद्ध मनुष्याचद्वारे (शस्यमानम्) उच्चारलेले (उक्थम्) स्तोत्र (न) कोणाद्वारेही (स्वीकृत) होत नाही, एवढेच नव्हे तर त्याने दिलेले (रयिः) दानदेखील (न) कोणी (विवेकी मनुष्य) स्वीकृत करीत नाही. याही पुढे असे की श्रद्धाहीन माणसाने (गीयमानम्) गायिलेले (गायत्रम्) सामगान देखील (आ चिकेत) कोणी स्वीकार करीत नाही म्हणजे त्या गानाला व्यर्थ जाणून त्याची दखलदेखील घेत नाही. म्हणून परमेश्वराची स्तुती, उपासना आदी कार्ये श्रद्धेने केली पाहिजेत.।।३।।
भावार्थ - श्रद्धेविना उच्चारित स्तोत्र जणू काय अनुच्चारितच राहते. त्याने दिलेले दानदेखील न दिलेल्याप्रमाणे होते आणि सामगान गायिले तरीही ते गान न गायिल्याप्रमाणे आहे, असे समजावे. म्हणून स्तोत्र-पाठ, दान, गायन आदी कर्मे सदैव श्रद्धेने केली पाहिजेत.।।३।।
विशेष -
या मंत्रात स्तोत्र उच्चारण, गायत्रगान आदी असल्यानंतर ही म्हणजे कारण उपस्थित झाल्यानंतर देखील कार्य म्हणजे ज्ञानाची उत्पत्ती होत नाही. त्यामुळे येथे विशेषोक्ती अलंकार आहे.।।३।।