Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 232
ऋषिः - श्रुतकक्ष आङ्गिरसः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

ए꣣वा꣡ ह्यसि꣢꣯ वीर꣣यु꣢रे꣣वा꣡ शूर꣢꣯ उ꣣त꣢ स्थि꣣रः꣢ । ए꣣वा꣢ ते꣣ रा꣢ध्यं꣣ म꣡नः꣢ ॥२३२॥

स्वर सहित पद पाठ

ए꣣व꣢ । हि । अ꣡सि꣢꣯ । वी꣣रयुः꣢ । ए꣣व꣢ । शू꣣रः꣢ । उ꣣त꣢ । स्थि꣣रः꣢ । ए꣣व꣢ । ते꣣ । रा꣡ध्य꣢꣯म् । म꣡नः꣢꣯ ॥२३२॥


स्वर रहित मन्त्र

एवा ह्यसि वीरयुरेवा शूर उत स्थिरः । एवा ते राध्यं मनः ॥२३२॥


स्वर रहित पद पाठ

एव । हि । असि । वीरयुः । एव । शूरः । उत । स्थिरः । एव । ते । राध्यम् । मनः ॥२३२॥

सामवेद - मन्त्र संख्या : 232
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 12;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे इन्द्र परमेश्वर अथवा हे राजा, (एव हि) खरोखर आपण (वीरयुः) वीरांना चाहणारे वा त्यावर स्नेह करणारे (असि) आहात. (एव) खरोखर आपण (शूरः) शूरवीर (उत) आणि (स्थिरः) अविचल वा दृढ आहात. (एव) खरोखरच (ते) तुमचे (मनः) मन (राध्यम्) सत्कर्मांद्वारे अनुकूल केले जाणे शक्य आहे. (कारण तुम्ही सदाचारी व सत्कर्मी व्यक्तीवर अनुग्रह करता.) ।। १०।।

भावार्थ - जसे परमेश्वर स्वतः वीर, सुस्थिर आणि अनविजेय आहे व तो वीरांची कामना करणारा आहे, तो भीरू लोकांना चाहत नाही. राजानेही परमेश्वराप्रमाणे असावे.।।१०।। या दशतीमध्ये सोमपानासाटी निमंत्रण, परमेश्वराचे सख्यत्व व त्याचे महत्त्व, त्याच्यापासून बल प्राप्तीची कामना, शूर रूपाने त्याची स्तुती, इंद्र शब्दाने आचार्य, राजा आदींच्या चरित्राचे वर्णन, हे सर्व विषय आले आहेत. यामुळे या मंत्रांच्या अर्थाशी मागील अध्यायाच्या मंत्रांची संगती आहे, असे जाणावे.।। तृतीय प्रपाठकातील प्रथम अर्धाची चतुर्थ दशति समाप्त. द्वितीय अध्यायातील बारावा खंड समाप्त. इथे द्वितीय अध्याय संपला.

इस भाष्य को एडिट करें
Top