Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 234
ऋषिः - भरद्वाजो बार्हस्पत्यः देवता - इन्द्रः छन्दः - बृहती स्वरः - मध्यमः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

त्वा꣡मिद्धि हवा꣢꣯महे सा꣣तौ꣡ वाज꣢꣯स्य का꣣र꣡वः꣢ । त्वां꣢ वृ꣣त्रे꣡ष्वि꣢न्द्र꣣ स꣡त्प꣢तिं꣣ न꣢र꣣स्त्वां꣢꣫ काष्ठा꣣स्व꣡र्व꣢तः ॥२३४॥

स्वर सहित पद पाठ

त्वा꣢म् । इत् । हि । ह꣡वा꣢꣯महे । सा꣣तौ꣢ । वा꣡ज꣢꣯स्य । का꣣र꣡वः꣢ । त्वाम् । वृ꣣त्रे꣡षु꣢ । इ꣣न्द्र । स꣡त्प꣢꣯तिम् । सत् । प꣣तिम् । न꣡रः꣢꣯ । त्वाम् । का꣡ष्ठा꣢꣯सु । अ꣡र्व꣢꣯तः ॥२३४॥


स्वर रहित मन्त्र

त्वामिद्धि हवामहे सातौ वाजस्य कारवः । त्वां वृत्रेष्विन्द्र सत्पतिं नरस्त्वां काष्ठास्वर्वतः ॥२३४॥


स्वर रहित पद पाठ

त्वाम् । इत् । हि । हवामहे । सातौ । वाजस्य । कारवः । त्वाम् । वृत्रेषु । इन्द्र । सत्पतिम् । सत् । पतिम् । नरः । त्वाम् । काष्ठासु । अर्वतः ॥२३४॥

सामवेद - मन्त्र संख्या : 234
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 1;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (इन्द्र) विपत्ति विदारक आणि सर्व समृद्धिदाता परमेश्वर वा हे राजा, (कारवः) स्तुतिकर्ता आम्ही कर्मयोगी (वाजस्य) शक्ती (सातौ) प्राप्त करण्यासाठी (त्वाम् इत् हि) तुम्हालाच (हवामहे) हाक मारतो. (विनंती करून बोलावतो) (नरः) पौरुषयुक्त आम्ही (वृत्रेषु) पापांचे वा शत्रूचे आक्रमण झाल्यानंतर (सत्पतिम्) सज्जनांचा जो रक्षक म्हणजे तुम्ही आही (त्वाम्) तुम्हाला आवाहन करतो. (अर्वतः) अश्वसेना व अन्य सैन्य विभागासाठी अथवा आग्नेयास्त्र आणि वैद्युतास्त्रच्या प्रयोगाच्या वेळी संग्रामामध्ये आम्ही तुमचे उपासक / प्रजाजन तुम्हाला परमेश्वराला व राजाला हाक मारतो.।।२।।

भावार्थ - परमेश्वराचे आणि राजाचे आवाहन मनुष्याने अवश्य करावे, (त्याला रक्षणादीची प्रार्थना करावी) पण स्वतः कर्मण्य व पुरुषार्थी असावयास हवे. जेव्हा पाप, पायी रूप वृत्र आक्रमण करतात अथवा जेव्हा दैत्यांसी देवपुरुषांचे घोर युद्ध होते. अश्व, हत्ती, पायदळ, सैनिक आदी सेनांगासह शत्रू आग्नेयास्त्र वा वैद्युतास्त्रांद्वारे आक्रमण करतो (वा आम्ही शत्रूविरुद्ध त्या अस्त्रांचा वापर करतो) त्या वेळी परमेश्वरापासून प्रेरणा, शक्ती आणि धाडस यांची प्राप्ती करून व राजाचे साह्य घेऊन शत्रूला धुळीत मिळवावे.।।२।।

इस भाष्य को एडिट करें
Top