Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 242
ऋषिः - प्रगाथो घौरः काण्वः देवता - इन्द्रः छन्दः - बृहती स्वरः - मध्यमः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

मा꣡ चि꣢द꣣न्य꣡द्वि श꣢꣯ꣳसत꣣ स꣡खा꣢यो꣣ मा꣡ रि꣢षण्यत । इ꣢न्द्र꣣मि꣡त्स्तो꣢ता꣣ वृ꣡ष꣢ण꣣ꣳ स꣡चा꣢ सु꣣ते꣡ मुहु꣢꣯रु꣣क्था꣡ च꣢ शꣳसत ॥२४२॥

स्वर सहित पद पाठ

मा꣢ । चि꣣त् । अन्य꣢त् । अ꣣न् । य꣢त् । वि । शँ꣣सत । स꣡खा꣢꣯यः । स । खा꣣यः । मा꣢ । रि꣣षण्यत । इ꣡न्द्र꣢꣯म् । इत् । स्तो꣣त । वृ꣡ष꣢꣯णम् । स꣡चा꣢꣯ । सु꣣ते꣢ । मु꣡हुः꣢꣯ । उ꣣क्था꣢ । च꣣ । शँसत ॥२४२॥


स्वर रहित मन्त्र

मा चिदन्यद्वि शꣳसत सखायो मा रिषण्यत । इन्द्रमित्स्तोता वृषणꣳ सचा सुते मुहुरुक्था च शꣳसत ॥२४२॥


स्वर रहित पद पाठ

मा । चित् । अन्यत् । अन् । यत् । वि । शँसत । सखायः । स । खायः । मा । रिषण्यत । इन्द्रम् । इत् । स्तोत । वृषणम् । सचा । सुते । मुहुः । उक्था । च । शँसत ॥२४२॥

सामवेद - मन्त्र संख्या : 242
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 1;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (सखायः) मित्रहो, तुम्ही (अन्यत्) अन्य कोणत्या वस्तूची, दगडाच्या मूर्तीची, नदी, पर्वत आदींची (मा चित्) कधीही (वि शंसत) उपासनीय मानून त्याची पूजा करू नका. (मा रिषण्यत) जो उपासनीय नाही अशा (व्यक्ती, पदार्थ वा शक्तीची) पूजा करून आपली हानी करून घेऊ नका. (सुते) ज्ञान, कर्म आणि भक्तीचा जो निष्पादित (प्राप्त) रस (आनंद) आहे, त्याचे सर्वांनी (सचा) एकत्र येऊन, मिळून त्या (वृषणम्) सुखवर्षक (इन्द्रम् इत्) परमेश्वराचीच (स्तोत्र स्तुती व उपासना करा आणि त्याच्याप्रत (मुहूः) वारंवार (उक्याच) स्तोत्राद्वारे (शंसत) स्ततिगान करा.।।१०।।

भावार्थ - परिवारात समाजात, राष्ट्रात वा जगात जो कुणी सन्मानास पात्र असेल त्याचा सन्मान तर केला पाहिजेच, पण त्यापैकी कुणालाही परमेश्वर मानून त्याची पूजा करू नये. तसेच नदी, वृक्ष, डोंगर आदी अचेतन पदार्थांची पूजादेखील कदापि करू नये. वेदांमध्ये इंद्र, आदी नावाने ज्या परमेश्वराला सुखवर्षी व जगदीश्वर मानले आहे, त्याचीच उपासना, स्तुती, प्रार्थना, अर्चना करणे उचित आहे.।।१०।। या दशतीमध्ये मनुष्यांना इंद्राची स्तुती, अर्चना आदीसाठी प्रेरणा केली असून, त्याच्याजवळ ऐश्वर्याची प्रार्थना केली आहे. शिवाय इन्द्राचे सहचर जे मरुत् गण, त्यांचे आवाहन केले आहे. या दशतीच्या मंत्रांच्या अर्थाशी मागील दशतीच्या मंत्राच्या अर्थाची संगती आहे, असे जाणावे.।। तृतीय प्रपाठकातील प्रथम अर्धाची पंचम दशती समाप्त. तृतीय अध्यायातील प्रथम खंड समाप्त. आता द्वितीय अधीचा आरंभ

इस भाष्य को एडिट करें
Top