Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 246
ऋषिः - विश्वामित्रो गाथिनः
देवता - इन्द्रः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
आ꣢ म꣣न्द्रै꣡रि꣢न्द्र꣣ ह꣡रि꣢भिर्या꣣हि꣢ म꣣यू꣡र꣢रोमभिः । मा꣢ त्वा꣣ के꣢ चि꣣न्नि꣡ ये꣢मु꣣रि꣢꣫न्न पा꣣शि꣢꣫नोऽति꣣ ध꣡न्वे꣢व꣣ ता꣡ꣳ इ꣢हि ॥२४६॥
स्वर सहित पद पाठआ꣢ । म꣣न्द्रैः꣢ । इ꣣न्द्र । ह꣡रि꣢꣯भिः । या꣣हि꣢ । म꣣यू꣡र꣢रोमभिः । म꣣यू꣡र꣢ । रो꣣मभिः । मा꣢ । त्वा꣣ । के꣢ । चित् । नि꣢ । ये꣣मुः । इ꣢त् । न । पा꣣शि꣡नः꣢ । अ꣡ति꣢꣯ । ध꣡न्व꣢꣯ । इ꣣व । ता꣢न् । इ꣣हि ॥२४६॥
स्वर रहित मन्त्र
आ मन्द्रैरिन्द्र हरिभिर्याहि मयूररोमभिः । मा त्वा के चिन्नि येमुरिन्न पाशिनोऽति धन्वेव ताꣳ इहि ॥२४६॥
स्वर रहित पद पाठ
आ । मन्द्रैः । इन्द्र । हरिभिः । याहि । मयूररोमभिः । मयूर । रोमभिः । मा । त्वा । के । चित् । नि । येमुः । इत् । न । पाशिनः । अति । धन्व । इव । तान् । इहि ॥२४६॥
सामवेद - मन्त्र संख्या : 246
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 2;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 2;
Acknowledgment
विषय - इंद्राने निर्बाध आमच्याजवळ यावे-
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (अध्यात्मपर) - (उपासक वा योगसाधक परमेश्वरास प्रार्थना करीत आहे) हे (इन्द्र) परम ऐश्वर्यवान परमेश्वर, आपण (मन्द्रैः) आनंददायक (मयूररोमभिः) मरपंखाप्रमाणे मृदु अशा (हरिभिः) प्राणशक्तीद्वारे (आ यहि) या अर्थात आमच्या हृदयात प्रकट व्हा. (त्वा) (जेव्हा तुम्ही हृदयात प्रकट व्हाल, जेव्हा आम्ही ध्यानावस्थेत तुमच्या अस्तित्वाचा अनुभव करीत असू) त्या वेळी (केचित्) योगमार्गात वा ध्यानावस्थेत बाधक अशा व्याधी, स्त्यान, संशय, प्रमाद, आलस्म, अविरती भ्रान्तिदर्शन, अलन्धभूमिकत्व, (आम्ही काय व कशासाठी करतोय, हेच माहीत नसणे) अनववस्यि तत्त्व, (लागलेले ध्यान स्थिर न राहणे आदी आमची विघ्ने आपण हृदयात येताना त्या बाधा आम्हास (मा मियेयुः) ऐकू शकणार नाहीत, असे करा. (न) जसे (पाशिनः) पाश हातात घेतलेल्या पारधी (इत्) गतिमान पशूला भूमीवर वा आकाशात उडणाऱ्या पक्ष्याला पाशाद्वारे रोकू शकतो, हसे आमचे होऊ नये. (वान्) त्या प्रतिबंधक पूर्ववर्णित बाधा (धन्व इव) अंतरिक्षाप्रमाणे पार करून आपल्या सर्वव्यापकत्वामुळे आपण हृदयी प्रकट व्हा. जसे कोणी विमानाने अंतरिक्ष पार करून येतो, तद्वत बाधा दूर करून आपण आमच्या हृदयात प्रकट व्हा अथवा दुसरा अर्थ - (धन्व इव) एखाद्या धनुर्धारी मनुष्याप्रमाणे बाधा- विघ्ने दूर सारण्यात आम्हीही यशस्वी होऊ शकू.।।
द्वितीय अर्थ - (राजापर) हे (इन्द्र) शत्रुविदारक वीर राजा, आपण (मन्द्रैः) प्रशंसनीय, गंभीरस्वरवान (मयूररोमभिः) मोरपिसासारखे मृदू रोम असलेल्य (हरिभिः) रथात जुंपलेल्या उत्तम वंशाच्या अश्वाप्रमाणे (आ याहि) संकटकाळी आमच्याकडे धावून या. (न) जसे (इत्) भूमीवर चालणाऱ्या प्राण्याला वा आकाशात विहार करणाऱ्या पक्ष्यांना पारधी (पाशिनः) पाशब्द करतो, तद्वत (त्वा) तुम्हाला (केचित्) कोणीही शत्रू (या नियेमुः) बद्ध करू शकणार नाही, असे करा. (धन्व इव) धनुष्याप्रमाणे आपण (तान्) त्या शत्रूंना (अति इहि) अतिक्रान्त वा पराजित करा (अशी आम्हा प्रजाजनांची कामना प्रार्थना आहे.।।४।।
भावार्थ - प्रणांचे स्वरूप मोरपिसाप्रमाणे कोमल असते, म्हणूनच प्राण विद्येला मधुविद्याही म्हणतात. प्राणायामाद्वारे आम्ही परमेश्वराला आमच्या हृदयात प्रकट करू शकतो. तसा प्रकट झालेला परमेश्वर आमच्या योगसाधना मागा४त देणाऱ्या विघ्न- बाधा दूर करतो. त्याचप्रमाणे प्रजाजनांनी रक्षणासाठी हाक मारल्यानंतर राजादेखील सर्व शत्रंना पराजित तरून राष्ट्राचा उत्कर्ष घडवू शकतो.।।४।।
विशेष -
या मंत्रात श्लेष आणि उपमा अलंकार आहेत. र, म, आणि न या वर्णांची अनेक वेळा आवृत्ती असल्यामुळे येथे वृत्यनुप्रास अलंकार आहे. ‘न्द्रै, न्द्र, न्नि, न्न’ या वर्णांमुळे छेकानुप्रसा आहे.।।४।।