Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 252
ऋषिः - देवातिथिः काण्वः देवता - इन्द्रः छन्दः - बृहती स्वरः - मध्यमः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

य꣡था꣢ गौ꣣रो꣢ अ꣣पा꣢ कृ꣣तं꣢꣫ तृष्य꣣न्ने꣡त्यवे꣢रिणम् । आ꣣पित्वे꣡ नः꣢ प्रपि꣣त्वे꣢꣫ तूय꣣मा꣡ ग꣢हि꣣ क꣡ण्वे꣢षु꣣ सु꣢꣫ सचा꣣ पि꣡ब꣢ ॥२५२॥

स्वर सहित पद पाठ

य꣡था꣢꣯ । गौ꣣रः꣢ । अ꣣पा꣢ । कृ꣣त꣢म् । तृ꣡ष्य꣢न् । ए꣡ति꣢꣯ । अ꣡व꣢꣯ । इ꣡रि꣢꣯णम् । आ꣣पित्वे꣢ । नः꣣ । प्रपित्वे꣢ । तू꣡य꣢꣯म् । आ । ग꣣हि । क꣡ण्वे꣢꣯षु । सु । स꣡चा꣢꣯ पि꣡ब꣢꣯ ॥२५२॥


स्वर रहित मन्त्र

यथा गौरो अपा कृतं तृष्यन्नेत्यवेरिणम् । आपित्वे नः प्रपित्वे तूयमा गहि कण्वेषु सु सचा पिब ॥२५२॥


स्वर रहित पद पाठ

यथा । गौरः । अपा । कृतम् । तृष्यन् । एति । अव । इरिणम् । आपित्वे । नः । प्रपित्वे । तूयम् । आ । गहि । कण्वेषु । सु । सचा पिब ॥२५२॥

सामवेद - मन्त्र संख्या : 252
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 2;
Acknowledgment

शब्दार्थ -
(यथा) ज्याप्रमाणे एक (गौरः) गौर मृग (मृगाची विशिष्ट जाती) (तृष्यन्) तहानेमुळे विव्हळ होऊन (हरिणाम्) मरुभूमी (अव) सोडून (अपा) पाण्याने (कृतम्) भरलेल्या जलाशयाकडे अथवा जलमय प्रदेशाकडे (एति) धाव घेतो वा जातो, तद्वत (आपित्वे) बंधु भावनेने प्रीतिरसाने (प्रपित्वे) भरलेल्या आमच्या हृदयात हे परमेश्वरा, तू (तूयम्) त्वरित (आगहि) ये आणि (कण्वेषु) आम्हा मेधावीजनांजवळ येऊन (सचा) आमच्यासह (तु पिब) प्रीतिरसरूप सोमरस पान कर.।।१०।।

भावार्थ - जसे एक गौरमृग निर्जल मरुस्थळ सोडून जल प्रचुर प्रदेशाला जातो, तसेच उपासकाच्या प्रीतिरसाचा चाहता परमेस्वर ही प्रेमशून्य हृदयांना सोडून प्रीतिरसाने ओथंबलेल्या मेधावीजनांच्या हृदयाकडे जातो. वास्तविक पाहता परमेश्वर सर्वव्यापी असल्यामुळे त्याचे येणे- जाणे संभवत नाही, यामुळे वेदांमध्ये जेथे जेथे परमेश्वराचे गमन- आगमन वर्णित आहे, तेथे ती प्रार्थना अलंकारिक समजली पाहिजे. अशा प्रसंगी त्याचे गमन म्हणजे त्याचे विस्मरण आणि आगमन म्हणजे त्याचे स्मरण असा अर्थ लक्षित जाणावा.।।१०।। या दशतीमध्ये शरीराचे अवयव जोडण्याबाबत इंद्राचे कौशल्य, त्याच्या गुणः कर्माने वर्णन आणि इंद्र नावाने जीवात्मा, प्राण, शल्य शास्त्र विशारद, राजा आदींचे वर्णन आहे. त्यामुळे या दशतीच्या मंत्रातील अर्थाचा संबंध मागील दशतीच्या अर्थाशी आहे, असे जाणावे.।। तृतीय प्रपाठकातील द्वितीय अर्धाची प्रथम दशती समाप्त। तृतीय अध्यायाचा द्वितीय खंड समाप्त.

इस भाष्य को एडिट करें
Top