Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 259
ऋषिः - वसिष्ठो मैत्रावरुणिः देवता - इन्द्रः छन्दः - बृहती स्वरः - मध्यमः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

इ꣢न्द्र꣣ क्र꣡तुं꣢ न꣣ आ꣡ भ꣢र पि꣣ता꣢ पु꣣त्रे꣢भ्यो꣣ य꣡था꣢ । शि꣡क्षा꣢ णो अ꣣स्मि꣡न्पु꣢रुहूत꣣ या꣡म꣢नि जी꣣वा꣡ ज्योति꣢꣯रशीमहि ॥२५९॥

स्वर सहित पद पाठ

इ꣢न्द्र꣢꣯ । क्र꣡तु꣢꣯म् । नः꣣ । आ꣢ । भ꣣र । पिता꣢ । पु꣣त्रे꣡भ्यः꣢ । पु꣣त् । त्रे꣡भ्यः꣢꣯ । य꣡था꣢꣯ । शि꣡क्ष꣢꣯ । नः꣣ । अस्मि꣢न् । पु꣣रुहूत । पुरु । हूत । या꣡म꣢꣯नि । जी꣣वाः꣢ । ज्यो꣡तिः꣢꣯ । अ꣣शीमहि ॥२५९॥


स्वर रहित मन्त्र

इन्द्र क्रतुं न आ भर पिता पुत्रेभ्यो यथा । शिक्षा णो अस्मिन्पुरुहूत यामनि जीवा ज्योतिरशीमहि ॥२५९॥


स्वर रहित पद पाठ

इन्द्र । क्रतुम् । नः । आ । भर । पिता । पुत्रेभ्यः । पुत् । त्रेभ्यः । यथा । शिक्ष । नः । अस्मिन् । पुरुहूत । पुरु । हूत । यामनि । जीवाः । ज्योतिः । अशीमहि ॥२५९॥

सामवेद - मन्त्र संख्या : 259
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 3;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (इन्द्र) परमेश्वर, हे आचार्य, हे राजा, आपण (नः) आम्हा उपासकांना / शिष्यांना/ प्रजाजनांना (क्रतुम्) विज्ञान व कर्म (आ भर) प्रदान करा. (यथा) जसे (पिता) एक पिता (पुत्रेम्यः) आपल्या पुत्र-पुत्रीसाठी विज्ञान व कर्म देतो, (तद्वत आपण आम्हास ज्ञान प्राप्ती आणि कर्म करण्याची प्रेरणा द्या) हे (पुरुहूत) बहुस्तुत जगदीश्वर, आचार्य, राजा आपण (अस्मिन्) या समक्ष विद्यमान अशा (खामजि) जीवन मार्गावर / जीवन यज्ञावर अथवा योग मार्गावर पुढे जाण्यासाठी (नः) आम्हाला (शिक्ष) सर्व प्रकारे सामर्थ्य प्रदान करा. यासाठी की त्यामुळे आम्ही (जीवाः) जीवित व जागरूक राहून (ज्योतिः) आशारूप ज्योती, कर्तव्य - अकर्तव्य रूप विवेक- ज्योती आणि आत्म- ज्योती अथवा परब्रह्मरूप ज्योती (अशीमहि) प्राप्त करू शकू.।।७।।

भावार्थ - एक पिता आपल्या संततीला ज्ञान देतो, कर्म करणे शिकवतो, चालणे व पळणे शिकवितो, त्यामुळे ती मुले-मुली आत्मनिर्भर होऊन जीवनात यशस्वी होतात. याचप्रमाणे परमेश्वर, आचार्य आणि राजा यांनी आम्हाला प्रचुर ज्ञान, महान कर्मयोग आणि अतुल सामर्थ्य व श्रेष्ठ शिक्षण प्रदान करावे, ज्यामुळे आम्ही जीवनातून नैराश्य विमिर घालवू शकू, जीवित, जागृत राहून उत्तरोत्तर ज्योतीचे दर्शन घेत सर्वोत्कृष्ट अशी ईश्वनीय दिव्य ज्योती प्राप्त करू शकू.।।७।।

इस भाष्य को एडिट करें
Top