Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 264
ऋषिः - रेभः काश्यपः
देवता - इन्द्रः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
य꣢च्छ꣣क्रा꣡सि꣢ परा꣣व꣢ति꣣ य꣡द꣢र्वा꣣व꣡ति꣢ वृत्रहन् । अ꣡त꣢स्त्वा गी꣣र्भि꣢र्द्यु꣣ग꣡दि꣢न्द्र के꣣शि꣡भिः꣢ सु꣣ता꣢वा꣣ꣳ आ꣡ वि꣢वासति ॥२६४॥
स्वर सहित पद पाठय꣢त् । श꣣क्र । अ꣡सि꣢꣯ । परा꣣व꣡ति꣣ । यत् । अर्वा꣣व꣡ति꣢ । वृ꣣त्रहन् । वृत्र । हन् । अ꣡तः꣢꣯ । त्वा꣣ । गीर्भिः꣢ । द्यु꣣ग꣢त् । द्यु꣣ । ग꣢त् । इ꣣न्द्र । केशि꣡भिः꣢ । सु꣣ता꣡वा꣢न् । आ । वि꣣वासति ॥२६४॥
स्वर रहित मन्त्र
यच्छक्रासि परावति यदर्वावति वृत्रहन् । अतस्त्वा गीर्भिर्द्युगदिन्द्र केशिभिः सुतावाꣳ आ विवासति ॥२६४॥
स्वर रहित पद पाठ
यत् । शक्र । असि । परावति । यत् । अर्वावति । वृत्रहन् । वृत्र । हन् । अतः । त्वा । गीर्भिः । द्युगत् । द्यु । गत् । इन्द्र । केशिभिः । सुतावान् । आ । विवासति ॥२६४॥
सामवेद - मन्त्र संख्या : 264
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 4;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 4;
Acknowledgment
विषय - परमेश्वराचा महिमा आणि त्याची उपासना
शब्दार्थ -
हे (शक्र) शक्तिशाली परमेश्वर, (यत्) ज्याअर्थी तुम्ही (परावलि) दूरस्य सूर्य, नक्षत्र, चंद्र आदी ग्रहोपग्रहांमध्ये अथवा पराविद्येद्वारे प्राप्तव्य मोक्ष लोकात (असि) विद्यमान आहात आणि हे (वृत्रहन्) अविद्यादी दोषांचे विनाशक, (यत्) ज्याअर्थी तुम्ही (अर्वावति) समीपस्थ पर्वत, नदी, सागर आदीमध्ये अथवा अपरा विद्येद्वारे प्राप्तव्य इहलोकाच्या ऐश्वर्यामध्ये (असि) विद्यमान आहात, (अतः) त्याअर्थी वा त्यामुळेच हे (इन्द्र) परमेश्वर्यशाली जगदीश्वर, (सुतावान्) उपासना रस गाळून (तुमचे ध्यान धरलेले) यजमान (त्वा) तुमची (द्युतम्) शीघ्र अथवा ज्याद्वारे लवकर मोक्ष प्राप्त होऊ शकेल, अशा (कोशिभिः) ज्ञान - प्रकाशाने दीप्तिमान (गीर्भिः) वेदवाणीद्वारे (आ विनासति) पूजा करीत आहे (त्या यजमानावर कृपा करा)।।१२।।
भावार्थ - परमेश्वर सर्व कर्म करण्यात समर्थ सून तो दूराहून दूर असलेल्या वा जवळाहून जनक प्रदेशात म्हणजे सर्वत्र विद्यमान आहे. तो अविद्या, पाप आदींचा विनाशक व सर्व ऐश्वर्यांचा स्वामी आहे. ज्ञान - विज्ञानाने परिपूर्ण साम मंत्रांचे गान करीत भक्तिरसात मग्न होऊन सर्वांनी त्या परमेश्वराची उपासना केली पाहिजे आणि त्याद्वारे ऐहिक व पारलौकिक आनंद मिळविला पाहिजे.।।२।।
विशेष -
या मंत्रात शुक्र, वृत्रहन्, इन्द्र हे सर्व शब्द इन्द्रवाचक असल्यामुळे पुनरुक्ती केल्यासारखे वाटत आहे, पण या प्रत्येक शब्दाचा यगिक अर्थ घेतल्यामुळे पुनरुक्तीचा परिहार वा निराकरण होत आहे यामुळे इथे पुनरुक्तवदाभास अलंकार आहे.।।२।।