Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 27
ऋषिः - विरूप आङ्गिरसः देवता - अग्निः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1

अ꣣ग्नि꣢र्मू꣣र्धा꣢ दि꣣वः꣢ क꣣कु꣡त्पतिः꣢꣯ पृथि꣣व्या꣢ अ꣣य꣢म् । अ꣣पा꣡ꣳ रेता꣢꣯ꣳसि जिन्वति ॥२७॥

स्वर सहित पद पाठ

अ꣣ग्निः꣢ । मू꣣र्धा꣢ । दि꣣वः꣢ । क꣣कु꣢त् । प꣡तिः꣢꣯ । पृ꣣थिव्याः꣢ । अ꣣य꣢म् । अ꣣पां꣢ । रे꣡ताँ꣢꣯सि । जि꣣न्वति ॥२७॥


स्वर रहित मन्त्र

अग्निर्मूर्धा दिवः ककुत्पतिः पृथिव्या अयम् । अपाꣳ रेताꣳसि जिन्वति ॥२७॥


स्वर रहित पद पाठ

अग्निः । मूर्धा । दिवः । ककुत् । पतिः । पृथिव्याः । अयम् । अपां । रेताँसि । जिन्वति ॥२७॥

सामवेद - मन्त्र संख्या : 27
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 3;
Acknowledgment

शब्दार्थ -
प्रथम अर्थ (परमात्मपरक) (अग्नि:) सर्वांचा अग्रनेता परमेश्वर (मूर्द्धा) शरीरात मूर्ध्दा जशी सर्वोच्च तसा शिरोमणीआहे. तो (दिव:) प्रकाशमान द्युलोका (ककुत्) सर्वोततम (पर्वताच्या सर्वोच्च शिखराप्रमाणे) सर्वोत्तम स्वामी आहे. आणि (पृथिव्या:) भूमीचा (पति:) पालनकर्ता स्वामी आहे. तो (अपाम्) अंतरिक्षातील (रेतांसि) जल (जिन्वति) भूमीवर आणतो, वृष्टी करतो. द्वितीय अर्थ : (सूर्यपरक) (अग्नि:) प्रकाशक सूर्यरूप अग्नी (मूर्द्धा) त्रिलोकीत शिराप्रमाणे आहे. (दिवा) द्युलोकरूप बैलाच्या (ककुत्) प्रमाणे आहे आणि (पृथिव्या:) भूमीचा (पति:) पालनकर्ता स्वामी आहे. तो (अपाम्) अंतरिक्षातील (रेतांसि) जल (जिन्वति) भूमीवर बरसण्यासाठी प्रेरित करतो वा पाऊस पाडतो. ।।७।। या मंत्रात श्लेषालंकार आहे. परमेश्वर सूर्यासमान आहे, या कथनात उपमाध्वनी आहे. मूर्द्धासम आणि ककुत्सम, मूर्द्धा आणि ककुत् येथे लुप्तोपमा आहे. अथवा या ठिकाणी अग्नीत मूर्द्धत्व आणि ककुत्वाचा आरोप असल्यामुळे येथे रूपक अलंकारही होत आहे. अग्नीवर ककुत्वाचा आरोप शाब्द म्हणजे विशिष्ट शब्दावर आधारित शाब्द रूपक असून द्युतोकावर वृषभत्वाचा आरोप असल्यामुळे येथे एकादेशवर्ती रूपकही मानता येतो. ।।७।।

भावार्थ - जसा सूर्य सौरलोकाच्या मूर्द्धेप्रमाणे द्युलोकाच्या कुबजप्रमाणे (कुब्बड) आणि भूमीचा पालनकर्ता आहे, तद्वत आम्ही ज्या ईश्वराचीउपासना करतो, तो परमेश्वर सकळ ब्रह्मांडाचा शिरोमणी आहे, नाना उज्ज्वल नक्षत्रांनी सजलेल्या द्युलोकांचा अधिपती आहे आणि विविध पर्वत, नदी, नद, सागर, सरोवर, लता, वृक्ष, पत्र, पुष्प आदींनी सुशोभित या भूमंडळाचा पालक आहे. तो परमेश्वरच सूर्याप्रमाणे आकाशस्थित मेघजलाला पृथ्वीवर आणतो. म्हणून त्याला सर्वांनी धन्यवाद दिले पाहिजेत. ।।७।।

इस भाष्य को एडिट करें
Top