Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 273
ऋषिः - पुरुहन्मा आङ्गिरसः
देवता - इन्द्रः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
यो꣡ राजा꣢꣯ चर्षणी꣣नां꣢꣫ याता꣣ र꣡थे꣢भि꣣र꣡ध्रि꣢गुः । वि꣡श्वा꣢सां तरु꣣ता꣡ पृत꣢꣯नानां꣣ ज्ये꣢ष्ठं꣣ यो꣡ वृ꣢त्र꣣हा꣢ गृ꣣णे꣢ ॥२७३॥
स्वर सहित पद पाठयः꣢ । रा꣡जा꣢꣯ । च꣣र्षणीना꣢म् । या꣡ता꣢꣯ । र꣡थे꣢꣯भिः । अ꣡ध्रि꣢꣯गुः । अ꣡ध्रि꣢꣯ । गुः꣣ । वि꣡श्वा꣢꣯साम् । त꣣रुता꣢ । पृ꣡त꣢꣯नानाम् । ज्ये꣡ष्ठ꣢꣯म् । यः । वृ꣣त्रहा꣢ । वृ꣣त्र । हा꣢ । गृ꣣णे꣢ ॥२७३॥
स्वर रहित मन्त्र
यो राजा चर्षणीनां याता रथेभिरध्रिगुः । विश्वासां तरुता पृतनानां ज्येष्ठं यो वृत्रहा गृणे ॥२७३॥
स्वर रहित पद पाठ
यः । राजा । चर्षणीनाम् । याता । रथेभिः । अध्रिगुः । अध्रि । गुः । विश्वासाम् । तरुता । पृतनानाम् । ज्येष्ठम् । यः । वृत्रहा । वृत्र । हा । गृणे ॥२७३॥
सामवेद - मन्त्र संख्या : 273
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 5;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 5;
Acknowledgment
विषय - परमात्मा व राजा यांच्या गुणांचे वर्णन
शब्दार्थ -
प्रथम अर्थ - (परमात्मपर) - (यः) जो इंद्र परमेश्वर (चर्षणीनाम्) मनुष्यंचा (राजा) सम्राट आहे, जो (रथेभिः याता) जणू काही त्यांचसह रथाने यात्रा करणारा म्हणजे शीघ्रगामी असून (अधिग्रुः) निर्बाध गतीने जाणारा आणि (विश्वासाम्) सर्व (पृतनानाम्) शत्रुसैन्याचा म्हणजे शत्रूभूत कामज - क्रोधज दोषगणांना (तरुता) पराभूत करणारा आहे आणि (यः) जो (वृत्रहा) पाप-संहारक आहे, त्या (ज्येष्ठम्) गुणामध्ये जो सर्वश्रेष्ठ आहे, तो अनादी असल्यामळे आयूमध्ये सर्वांपेक्षा दीर्घायू आहे. मी त्या परमेश्वराची (गृणे) स्तुतीव अर्चना करतो.।।
कामज आणि क्रोधज गुणांचा उल्लेख मनूने या स्वरूपात केला आहे - शिकार करणे, जुगार, दिवसा जोपणे, परनिन्दा, पर स्त्री सेवन, मद्यपान अनुचित रीतीने वाद्य वाजविणे (ढोल ताशे वाजवून उगाच गोंधल घालणे), उगाच निष्कारण इकडे तिकडे भटकणे, हे दहा गण कामकज आहेत. वेडे धाडस करणे, द्रोह, ईर्षा, असूमा, अर्थशुची नसणे (भ्रष्टाचार वा दुराचाराद्वारे धर्नार्जन) कठोर वाणी, कटोर दंड देणे, हे आठ क्रोधज गण आहेत. (मनुस्मृती ७/४७/४८) साधकाच्या उपासनेमध्ये विघ्न व्यलय आणणाऱ्या या शत्रुगणास परमेश्वर पराजित करतो.।।
द्वितीय पक्ष - (राजापूर) - (यः) जो (चर्षणीनाम्) मानुषी प्रजेचा (राजा) राजा असून (रथेभिः) जल, स्थल व अंतरिक्षात गती करणाऱ्या यानांद्वारे (याता) येणे-जाणे करतो आणि ज्याच्या (अधिग्रुः) गतीला वा आक्रमणाला कुणी रोकू शकत नाही, तसेच जो (विश्वासाम्) सर्व (पृतनानाम्) शत्रुसैन्याचा (तरूता) पराभव करणारा आहे, याशिवाय (यः) जो (वृत्रहा) विघ्नकारी शत्रूंचा संहारक आहे, त्या (ज्येष्ठम्) वीरत्व आणि गुणात श्रेष्ठ असलेल्या राजाला मी (एक नागरिक, प्रजाजन) (गृणे) हाक मारतो, त्याची स्तुती करतो. त्याला प्रोत्साहन देतो आणि त्याचा सत्कार करतो.।।१।।
भावार्थ - जसे ब्रह्मांडाचा राजराजेश्वर परमेश्वर संकटातून तारणारा, कुणाकडूनही प्रतिहत न होणारा विजयासाठी यत्नशील मनुष्याला दिव्य गुण समूहाद्वारे विजय मिळवून देणारा, काम - क्रोधादीच्या सैन्याला उद्ध्वस्त करणारा आणि ज्येष्ठ व श्रेष्ठ आहे आणि म्हणूनच जो उपासनीय आहे, त्याचप्रमाणे विद्युतादी शक्तीद्वारे चालणाऱ्या विमानादी साधनांनी येणा- जाणारा, समस्त शत्रूंना पराभूत करणारा राष्ट्रनायक राजादेखील संकटकाळी साह्याकरिता प्रजाजनांसाठी आवाहनीय (हाक मारणेसाठी योग्य) आहे. प्रजाजनांनी त्याला हाक मारावी, त्याला वेळी प्रोत्साहन द्यावे आणि त्याच्या गुण, कर्म स्वभावाची प्रशंसा करावी. ।। १।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. परमेश्वरपर अर्थामध्ये ‘याता रथेभिःया शब्द प्रयोगात व्यंगोत्प्रेक्षा अलंकार आहे. ।। १।।