Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 274
ऋषिः - भर्गः प्रागाथः
देवता - इन्द्रः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
य꣡त꣢ इन्द्र꣣ भ꣡या꣢महे꣣ त꣡तो꣢ नो꣣ अ꣡भ꣢यं कृधि । म꣡घ꣢वञ्छ꣣ग्धि꣢꣫ तव꣣ त꣡न्न꣢ ऊ꣣त꣢ये꣣ वि꣢꣫ द्विषो꣣ वि꣡ मृधो꣢꣯ जहि ॥२७४॥
स्वर सहित पद पाठय꣡तः꣢꣯ । इ꣣न्द्र । भ꣡या꣢꣯महे । त꣡तः꣢꣯ । नः꣣ । अ꣡भ꣢꣯यम् । अ । भ꣣यम् । कृधि । म꣡घ꣢꣯वन् । श꣣ग्धि꣢ । त꣡व꣢꣯ । तत् । नः꣣ । ऊत꣡ये꣢ । वि । द्वि꣡षः꣢꣯ । वि । मृ꣡धः꣢꣯ । ज꣣हि ॥२७४॥
स्वर रहित मन्त्र
यत इन्द्र भयामहे ततो नो अभयं कृधि । मघवञ्छग्धि तव तन्न ऊतये वि द्विषो वि मृधो जहि ॥२७४॥
स्वर रहित पद पाठ
यतः । इन्द्र । भयामहे । ततः । नः । अभयम् । अ । भयम् । कृधि । मघवन् । शग्धि । तव । तत् । नः । ऊतये । वि । द्विषः । वि । मृधः । जहि ॥२७४॥
सामवेद - मन्त्र संख्या : 274
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 5;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 5;
Acknowledgment
विषय - इन्द्र नाम परमेश्वरकडे / राजाकडे अभयत्वाची याचना
शब्दार्थ -
हे (इन्द्र) शत्रुविदारक परमेश्वर वा हे राजा, आम्ही (यतः) ज्यापासून (भयामहे) भयभीत होत असतो (ततः) त्या त्या (शत्रू, मनुष्य, प्राणी आदीपासून (नः) आम्हाला (अभयम्) निर्भय (कृधि) करा. हे (मघवन्) निर्भयत्व रूप धनाचे स्वामी, आपण आम्हाला (शग्धि) शक्तिशाली करा. (तव) तुमचे / (तत्) ते अभयदान (नः) आमच्या (ऊतये) सुरक्षेसाटी असू द्या. तुम्ही (द्विषः) आमच्या मनातील द्वेष वृत्ती वा द्वेष करणाऱ्या द्वेषकांना (विजहि) विनष्ट करा (मृधः) हिंसावृत्ती अथवा आपसातील (संघर्ष, गैरसमज, मतभेद, युद्ध) आदी (विजहि) समाप्त करा. ।। २।।
भावार्थ - मनुष्यांनी महाबली परमेश्वराला हृदयी धारण करून आणि महापराक्रमी पुरुषाला राजापदावर अभिषिक्त करून त्यापासून अभय वा निर्भयत्व मिळवावे, हृदयात महत्त्वाकांक्षा जागृत करून महान कार्ये पूर्ण करून दाखवावीत, तसेच द्वेष वृत्ती, हिंसा वृत्ती व युद्धादी समाप्त करून (सर्व राष्ट्रवासी लोकांनी) राष्ट्रात सद्भावना व शांती स्थापना करावी. ।। २।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. ‘भया, भयं’ छेदानुप्रास आहे. तकाराची आवृत्ती असल्यामुळे वृत्त्यनुप्रास अलंकार आहे. ।। २।।