Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 275
ऋषिः - इरिम्बिठिः काण्वः देवता - इन्द्रः छन्दः - बृहती स्वरः - मध्यमः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

वा꣡स्तो꣢ष्पते ध्रु꣣वा꣡ स्थूणाꣳ स꣢꣯त्रꣳ सो꣣म्या꣡ना꣢म् । द्र꣣प्सः꣢ पु꣣रां꣢ भे꣢त्ता꣡ शश्व꣢꣯तीना꣣मि꣢न्द्रो꣣ मु꣡नी꣢ना꣣ꣳ स꣡खा꣢ ॥२७५॥

स्वर सहित पद पाठ

वा꣡स्तोः꣢꣯ । प꣣ते । ध्रुवा꣢ । स्थू꣡णा꣢꣯ । अँ꣡सत्रम् । सो꣣म्या꣡ना꣢म् । द्र꣣प्सः꣢ । पु꣣रा꣢म् । भे꣣त्ता꣢ । श꣡श्व꣢꣯तीनाम् । इ꣡न्द्रः꣢꣯ । मु꣡नी꣢꣯नाम् । स꣡खा꣢꣯ । स । खा꣣ ॥२७५॥


स्वर रहित मन्त्र

वास्तोष्पते ध्रुवा स्थूणाꣳ सत्रꣳ सोम्यानाम् । द्रप्सः पुरां भेत्ता शश्वतीनामिन्द्रो मुनीनाꣳ सखा ॥२७५॥


स्वर रहित पद पाठ

वास्तोः । पते । ध्रुवा । स्थूणा । अँसत्रम् । सोम्यानाम् । द्रप्सः । पुराम् । भेत्ता । शश्वतीनाम् । इन्द्रः । मुनीनाम् । सखा । स । खा ॥२७५॥

सामवेद - मन्त्र संख्या : 275
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 5;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) - (परमात्मपर) - हे (वास्तोःपते) ब्रह्मांडरूप गृहाचे स्वामी इंद्र परमेश्वर, आपण (सोम्यानाम्) शान्तिमय, इतरांना शांती देणारे अथवा ब्रह्मानंदरूप सोमरस प्रवाहित करणाऱ्या स्तोताजनांसाठी (ध्रुवा स्थूणा) स्थिर आधारस्तंभ म्हणजे आधारस्तंभाप्रमाणे आधार वा आश्रय देणारे आहेत. तसेच आपण (असंत्रक) त्यांच्यासाठी धनुष व कवच सम असून विघ्नकर्त्यांवर बाण- प्रहार करणारे आणि कवचाप्रमाणे रक्षक आहात. (द्रप्सः) रसमय वा सूर्याप्रमाणे ज्योतिष्मान तथा (शाश्वतीनाम्) दीर्घकाळापासून चालत आलेल्या (पुराम्) काम, क्रोध आदी शत्रूंच्या (भेत्ता) तोडणारे (इंद्रः) इन्द्रनाम ईश्वर आहात आणि (मुनीनाम्) मुनिजनांचे (सखा) मित्र आहात.।। द्वितीय अर्थ - (राष्ट्रपर) हे (वास्तोःपते) राष्ट्ररूप गृहाचे अधिपती इंद्र राजा, आपण राट्र यज्ञरूप समयाग करणाऱ्या प्रजाजनांसाठी (ध्रुवा स्थूणा) स्थिर आधारस्तंभ आहात (अंसत्रम्) आपण त्यांचे धनुष्य व कवच व्हा, म्हणजे त्यांचे आधारस्तंभ होऊन प्रजेला आधार द्या आणि धनुष्याप्रमाणे त्यांच्यासाठी धनुष्य म्हणजे शत्रूवर आक्रमण करणारे आणि त्यांच्यासाठी कवच म्हणजे शत्रूकडून होणाऱ्या आघातांपासून प्रजेला वाचविणारे व्हा. तसेच (द्रप्सः) प्रेम रसाचे आगार आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी आपण (शश्वतीनाम्) दीर्घकाळापासून सुदृढ केलेल्या (पुराम्) शत्रु-नगरीला (भेत्ता) उद्ध्वस्त करणारे (इंद्रः) आमचे सम्राट आहात. आपण (मुनीनाम्) मुनिवृत्तीने वनात निवास करणाऱ्या वानप्रस्थांचे (सखा) मित्र वा हितचिंतक आहात.।। तृतीय अर्थ - (वास्तुकला - विशेषज्ञ शिल्पीविषयी) हे (वास्तोःपते) वास्तुकला विशेषज्ञ, गृहनिर्माण कुशल शिल्पी, तू लक्ष ठेव की (सोम्यानाम्) यज्ञ करणाऱ्या वा ऐश्वर्य इच्छुक गृहस्थजनांच्या (स्थूणा) घरांचा आधार जे स्तंभ वा भिंती तयार करशील, तसेच (अंसत्रम्) घरांचा खांदा असल्याप्रमाणे जे स्तंभ, भिंती वा छत असतील, ते सर्व सुदृढ सू दे. कारण की कधी कधी पावसाच्या पाण्याने (शश्वतीनाम्) दीर्घकाळापासून उभ्या असलेल्या नगरी अथवा त्यातील घरांना ते वृष्टिजल (भेत्ता) तोडून टाकते वा पाडते. जर म्हणाल की येथे मुनिजनांच्या घराविषयी का काही सांगत नाही ? तर त्याचे उत्तर असे की (मुनीनाम्) वानप्रस्थ वृत्तीने वनात निवास करणाऱ्या मुनिजनांचा तर तो (इंद्रः) परमेश्वरच (सखा) मित्र असतो. अर्थात ते तर एका परमेश्वराच्या शरणी असतात, बाह्य सुखाविषयी ते कोणतीच अभिलाषा बाळगत नाहीत आणि वनाच्या वृक्षाखाली बांधलेल्या आपल्या कुटीमध्येच ते आनंदी असतात. ।। ३।।

भावार्थ - राजा तोच श्रेष्ठ असतो, जो परमेश्वराच्या गुणांचे अनुसरण करीत प्रजेसाठी आधारस्तंभ असतो. शत्रु-संहारक, स्वजन- रक्षक, प्रेमर सागार, सूर्यमन तेजस्वी आणि ऋषीमुनींकरिता मित्रवत हितकर्ता असतो. वास्तुकलेचे तज्ज्ञ जे अभियंता आदी असतात, त्यांचेही कर्तव्य आहे की त्यांनी राष्ट्रात इतकी सुदृढ घरे कुशल शिल्पी (गवंडी) द्वारे तयार करवून घ्यावीत की जी मुसळधार पावसाने अथवा वादळानेही क्षतिग्रस्त होणार नाहीत. ।। ३।।

इस भाष्य को एडिट करें
Top