Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 284
ऋषिः - वसिष्ठो मैत्रावरुणिः
देवता - इन्द्रः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
मो꣡ षु त्वा꣢꣯ वा꣣घ꣡त꣢श्च꣣ ना꣢꣫रे अ꣣स्म꣡न्नि री꣢꣯रमन् । आ꣣रा꣡त्ता꣣द्वा सध꣣मा꣡दं꣢ न꣣ आ꣡ ग꣢ही꣣ह꣢ वा꣣ स꣡न्नुप꣢꣯ श्रुधि ॥२८४॥
स्वर सहित पद पाठमा꣢ । उ꣣ । सु꣢ । त्वा꣣ । वाघ꣡तः꣢ । च꣣ । न꣢ । आ꣣रे꣢ । अ꣣स्म꣢त् । नि । री꣣रमन् । आरा꣡त्ता꣢त् । वा꣣ । सधमा꣡द꣢म् । स꣣ध । मा꣡द꣢꣯म् । नः꣣ । आ꣢ । ग꣣हि । इह꣢ । वा꣣ । स꣢न् । उ꣡प꣢꣯ । श्रु꣣धि ॥२८४॥
स्वर रहित मन्त्र
मो षु त्वा वाघतश्च नारे अस्मन्नि रीरमन् । आरात्ताद्वा सधमादं न आ गहीह वा सन्नुप श्रुधि ॥२८४॥
स्वर रहित पद पाठ
मा । उ । सु । त्वा । वाघतः । च । न । आरे । अस्मत् । नि । रीरमन् । आरात्तात् । वा । सधमादम् । सध । मादम् । नः । आ । गहि । इह । वा । सन् । उप । श्रुधि ॥२८४॥
सामवेद - मन्त्र संख्या : 284
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 6;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 6;
Acknowledgment
विषय - परमेश्वराला व राजाला प्राथना
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (परमात्मपर) हे इंद्र परमात्मा, (वा घतः) आमच्या शरीर यज्ञाचे ऋत्विज जे इंद्रिये, मन, बुद्धी आदी आहेत, त्या (बा) तुला (अस्मत्) आमच्यापासून (च न) निश्चयाने (आरे) दूर (मा उ सु) नाही. (निरीर मन्) नेतील, असे कर म्हणजे इंद्रियांच्या आकर्षणात गुंतून मी तुला माझ्यापासून विलग कधीही करू नये. तू (आरात्तात् वा) कितीही दूर असल्यास, तरीही तेथून (नः) आमच्या या जीवन यज्ञात वा उपासना यज्ञात (आ गहि) अवश्य ये (इह वा सम्) आणि इथेच माझ्या हृदयात निवास करीत तू (उषश्रुधि) आम्ही करीत असलेली स्तुती व प्रार्थना ऐक.।।
द्वितीय अर्थ - (राजापर) - हे इंद्र राजा, (वाघहः) बुद्धिमान राजयंत्री, नगराधीया आदी राज्याधिकारी (त्वा) तुम्हाला (अस्मत्) आमच्यापासून (आरे) दूर (च नं) निश्चयाने (मा उ सु) (निरीर मन्) नेण्यात समर्थ होऊ नयेत, असे करा. म्हणजे तुम्ही आम्हा प्रजाजनांना नेहमी सुलभ असा. हे राजा, (आसत्ताद् वा) कितीही दूरस्थ तुमच्या राजधानीपासून तुम्ही (नः) आमच्या (सधमादम्) यज्ञ - समारोहात (आ गहि) अवश्य या (इह वा सन्) आणि इथे आमच्याजवळ राहून तुम्ही (उपश्रुधि) आमचे सुख - दुःखाचे निवेदन ऐका.।। २।।
भावार्थ - राजराजेश्वर परमेश्वर आणि मानव- राजा आम्हा उपासकांना / प्रजाजनांना सदैव सुलभ असावा आणि आमच्या सुख- दुःखाकडे त्याचे नेहमी लक्ष असावे.।। २।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. ङ्गरफ वर्णाची अनेक वेळा आवृत्ती असल्यामुळे इथे वृत्त्यनुप्रास अलंकार आहे. ।। २।।