Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 285
ऋषिः - वसिष्ठो मैत्रावरुणिः
देवता - इन्द्रः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
सु꣣नो꣡त꣢ सोम꣣पा꣢व्ने꣣ सो꣢म꣣मि꣡न्द्रा꣢य व꣣ज्रि꣡णे꣢ । प꣡च꣢ता प꣣क्ती꣡रव꣢꣯से कृणु꣣ध्व꣢꣯मित्पृ꣣ण꣢न्नित्पृ꣢꣯ण꣣ते꣡ मयः꣢꣯ ॥२८५॥
स्वर सहित पद पाठसु꣣नो꣡त꣢ । सो꣣मपा꣡व्ने꣢ । सो꣣म । पा꣡व्ने꣢꣯ । सो꣡म꣢꣯म् । इ꣡न्द्रा꣢꣯य । व꣣ज्रि꣡णे꣢ । प꣡च꣢꣯त । प꣣क्तीः꣢ । अ꣡व꣢꣯से । कृ꣣णुध्व꣢म् । इत् । पृ꣣ण꣢न् । इत् । पृ꣣णते꣢ । म꣡यः꣢꣯ ॥२८५॥
स्वर रहित मन्त्र
सुनोत सोमपाव्ने सोममिन्द्राय वज्रिणे । पचता पक्तीरवसे कृणुध्वमित्पृणन्नित्पृणते मयः ॥२८५॥
स्वर रहित पद पाठ
सुनोत । सोमपाव्ने । सोम । पाव्ने । सोमम् । इन्द्राय । वज्रिणे । पचत । पक्तीः । अवसे । कृणुध्वम् । इत् । पृणन् । इत् । पृणते । मयः ॥२८५॥
सामवेद - मन्त्र संख्या : 285
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 6;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 6;
Acknowledgment
विषय - इंद्रासाठी सोमरस गाळण्याविषयी प्रेरणा -
शब्दार्थ -
हे मरण धर्मा मनुष्यानो, तुम्ही (सोम पाघ्ने) उपासकांच्या हृदयातील श्रद्धा रसाचे सेवन करणाऱ्या आणि (वज्रिणे) पापी लोकांना दंड देणाऱ्या (इन्द्राय) जगदीश्वराकरिता (सोमम्) श्रद्धारस (सुनोत) अभिषुत करा (गाळा म्हणजे त्याची उपासना करा) तसेच (पक्तीः) ज्ञान, कर्म आदींच्या मिश्रण परिपाक (पचत) करा, (उपासना दृढ करा) (अवसे) जगदीश्वराच्या प्रीतिसाठी (कृणुध्वम् उत) तो श्रद्धारस व ज्ञान, कर्म आदींचा परिपाक त्याला समर्पित करा. (पृणहे) समर्पण करणाऱ्या मनुष्यासाठी तो परमेश्वर (मयः) सुख (पृणन् इत्) अवश्य देतो.।। ३।।
भावार्थ - सुखार्थीजनांनी परमेस्वराविषयी श्रद्धा ठेवावी आणि आपल्या अंतरात्म्यात ज्ञान, कर्म, सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य आदींचा परिपाक अवश्य करावा, हे त्यांच्या हिताचे आहे. ।। ३।।
विशेष -
या मंत्रात ‘समर्पण करणाऱ्याला सुख मिळते,’ या कथनाने सोम सवन व पाक परिपाक समर्पण रूप कार्याचे समर्थन होत आहे. म्हणून इथे अयन्तिरन्यास अलंकार आहे. ‘सोमं सोम’मुळे लायनुप्रास आणि ‘पृण पृण’मुळे छेकानुप्रास आहे. ।। ३।।