Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 286
ऋषिः - भरद्वाजो बार्हस्पत्यः
देवता - इन्द्रः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
यः꣡ स꣢त्रा꣣हा꣡ विच꣢꣯र्षणि꣣रि꣢न्द्रं꣣ त꣡ꣳ हूम꣢हे व꣣य꣢म् । स꣡ह꣢स्रमन्यो तुविनृम्ण सत्पते꣣ भ꣡वा꣢ स꣣म꣡त्सु꣢ नो वृ꣣धे꣢ ॥२८६॥
स्वर सहित पद पाठयः꣢ । स꣣त्राहा꣢ । स꣣त्रा । हा꣢ । वि꣡च꣢꣯र्षणिः । वि । च꣣र्षणिः । इन्द्र꣣म् । तम् । हू꣣महे । वय꣢म् । स꣡ह꣢꣯स्रमन्यो । स꣡ह꣢꣯स्र । म꣣न्यो । तुविनृम्ण । तुवि । नृम्ण । सत्पते । सत् । पते । भ꣡व꣢꣯ । स꣣म꣡त्सु꣢ । स꣣ । म꣡त्सु꣢꣯ । नः꣣ । वृधे꣢ ॥२८६॥
स्वर रहित मन्त्र
यः सत्राहा विचर्षणिरिन्द्रं तꣳ हूमहे वयम् । सहस्रमन्यो तुविनृम्ण सत्पते भवा समत्सु नो वृधे ॥२८६॥
स्वर रहित पद पाठ
यः । सत्राहा । सत्रा । हा । विचर्षणिः । वि । चर्षणिः । इन्द्रम् । तम् । हूमहे । वयम् । सहस्रमन्यो । सहस्र । मन्यो । तुविनृम्ण । तुवि । नृम्ण । सत्पते । सत् । पते । भव । समत्सु । स । मत्सु । नः । वृधे ॥२८६॥
सामवेद - मन्त्र संख्या : 286
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 6;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 6;
Acknowledgment
विषय - परमेश्वराला आणि राजाला आम्ही कसे आवाहन करावे ? त्याच्यापासून काय मानावे ?
शब्दार्थ -
(यः) जो परमेश्वर अथवा राजा (सत्राहा) सत्याने असत्याघा विनाश करणारा अथवा सदा सत्य व्यवहार करणारा आणि (विचर्षणिः) विशेष रूपेण द्रष्टा आहे (तम्) त्या (इन्द्रम्) दुःख, विघ्न आदींचा जो विदारक व जो सुखदाता, त्या परमेश्वराला / राजाला (वयम्) आम्ही उपासक गण / प्रजानन (हूमहे) साह्यासाठी बोलावतो हे (सहस्त्रमन्यो) पाप- विनाशार्थ वा पापीजन - विनाशार्थ अत्यंत उत्साही असलेले आणि (तुविवृम्ण) महाबली व महाधनी (सत्यते) हे सज्जन पालक परमेश्वर / राजा, आपण (समत्सु) जीवन संघर्षामध्ये आणि देवासुर संग्रामामध्ये (आंतरिक दुष्ट वृत्ती / सद्वृत्ती युद्धात) आमचे (वृधे) उन्नती, वृद्धी वा विजयाचे कारण (भव) व्हा. ।। ४।।
भावार्थ - या मंत्रात अर्थश्लेष अलंकार आहे. ।। ४।।
विशेष -
जसे ब्रह्मांडाध्ये परमेश्वर असत्य विनाशक सर्वद्रष्टा, पाप सहन न करणारा, अति बली, अति धनवान तसेच देवासुर संग्रामामध्ये देव पुरुषांना यश देणारा आणि त्यांची उन्नती करणारा आहे. राष्ट्रात राजाचीही हीच भूमिका असावी. ।। ४।।