Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 293
ऋषिः - वसिष्ठो मैत्रावरुणिः
देवता - इन्द्रः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
इ꣣म꣡ इन्द्रा꣢꣯य सुन्विरे꣣ सो꣡मा꣢सो꣣ द꣡ध्या꣢शिरः । ता꣡ꣳ आ मदा꣢य वज्रहस्त पी꣣त꣢ये꣣ ह꣡रि꣢भ्यां या꣣ह्यो꣢क꣣ आ꣢ ॥२९३॥
स्वर सहित पद पाठइ꣣मे꣢ । इ꣡न्द्रा꣢꣯य । सु꣣न्विरे । सो꣡मा꣢꣯सः । द꣡ध्या꣢꣯शिरः । द꣡धि꣢꣯ । आ꣣शिरः । ता꣢न् । आ । म꣡दा꣢꣯य । व꣣ज्रहस्त । वज्र । हस्त । पीत꣡ये꣢ । ह꣡रि꣢꣯भ्याम् । या꣣हि । ओ꣡कः꣢꣯ । आ । ॥२९३॥
स्वर रहित मन्त्र
इम इन्द्राय सुन्विरे सोमासो दध्याशिरः । ताꣳ आ मदाय वज्रहस्त पीतये हरिभ्यां याह्योक आ ॥२९३॥
स्वर रहित पद पाठ
इमे । इन्द्राय । सुन्विरे । सोमासः । दध्याशिरः । दधि । आशिरः । तान् । आ । मदाय । वज्रहस्त । वज्र । हस्त । पीतये । हरिभ्याम् । याहि । ओकः । आ । ॥२९३॥
सामवेद - मन्त्र संख्या : 293
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 7;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 7;
Acknowledgment
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (अतिथिपर) - (इमे) हे जे (दध्याशिरः) हृदयात मिसळलेले (सोमासः) सोम आदी औषधींचे रस (इन्द़्राम) तुझ्यासारख्या विद्वान अतिथीकरिता आम्ही (गृहस्थजनांनी) (सुन्विरे) तयार करून ठेवले आहेत, हे (वज्रुहस्त) आमच्यातील दोष नष्ट करण्याकरिता ज्याच्या हातात उपदेशरूप वज्र आहे, असे विद्वान अतिथी महोदय, ापण (वान्) तो दधिमिक्षित सोमरस (मदाय) यथेच्छ (पीतये) पिण्यासाठी (हरिभ्याम्) ऋक् वसाम या ज्ञानासह अथवा ज्यात दोन घोडे जुंले आहे. अशा रथावर बसून आपण माझ्या म्हणजे गृहस्थ व्यक्तीच्या (ओकः) घरात (आ याहि) या.।।
द्वितीय अर्थ - (परमात्मपर) - (इमे) हे जे (दध्याशिरः) कर्मरूप दह्यात मिसळलेला अथवा शिजविलेला जो (सोमासः) श्रद्धा-रस (इन्द्राय) तुझ्यासाठी तुज जयदीश्वरासाठी (सुन्विरे) मी तयार केला आहे, हे (वज्रहस्त) वज्रधारी सैनिकाप्रमाणे दोषांचा विनाश करणाऱ्या हे परमेश्वरा, (तान्) तो कर्ममिश्रित श्रद्धारस (मदाय) आमचे संतोष होईपर्यंत तू (पीतये) पिण्यासाठी तू (हरिभ्याम्) जसा एक रथी दोन घोड्यांच्या रथावर आरूढ होऊन वेगाने येतो. तद्वत तू आमच्या (ओक) हृदय-सदनी (आ याहि) ये.।।१।।
भावार्थ - जसे दह्यात मिसळून सोमरस अतिथींना देतात, तसेच श्रद्धा-रस कर्मात मिसळूनच परमेश्वराला अर्पित केला पाहिजे. कारण की कर्म विहीन भक्तीचा काही लाभ होत नाही. (माणसाने परमेश्वराची भक्ती- उपासना अवश्य करावी, पण त्यासोबत पुरुषार्थ व यत्नही केले पाहिजेत. ।। १।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. परमात्मपर अर्थात लुप्तोपमा अलंकारदेखील आहे. ।। १।।