Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 298
ऋषिः - वामदेवो गौतमः
देवता - इन्द्रः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
य꣡दि꣢न्द्र꣣ शा꣡सो꣢ अव्र꣣तं꣢ च्या꣣व꣢या꣣ स꣡द꣢स꣣स्प꣡रि꣢ । अ꣣स्मा꣡क꣢म꣣ꣳशुं꣡ म꣢घवन्पुरु꣣स्पृ꣡हं꣢ व꣣स꣢व्ये꣣ अ꣡धि꣢ बर्हय ॥२९८
स्वर सहित पद पाठय꣢त् । इ꣣न्द्र । शा꣡सः꣢꣯ । अ꣣व्रत꣢म् । अ꣣ । व्रत꣢म् । च्या꣣व꣡य꣢ । स꣡द꣢꣯सः । प꣡रि꣢꣯ । अ꣣स्मा꣡क꣢म् । अँ꣣शु꣢म् । म꣣घवन् । पुरुस्पृ꣡ह꣢म् । पु꣣रु । स्पृ꣡ह꣢꣯म् । व꣣स꣡व्ये꣢ । अ꣡धि꣢꣯ । ब꣣र्हय ॥२९८॥
स्वर रहित मन्त्र
यदिन्द्र शासो अव्रतं च्यावया सदसस्परि । अस्माकमꣳशुं मघवन्पुरुस्पृहं वसव्ये अधि बर्हय ॥२९८
स्वर रहित पद पाठ
यत् । इन्द्र । शासः । अव्रतम् । अ । व्रतम् । च्यावय । सदसः । परि । अस्माकम् । अँशुम् । मघवन् । पुरुस्पृहम् । पुरु । स्पृहम् । वसव्ये । अधि । बर्हय ॥२९८॥
सामवेद - मन्त्र संख्या : 298
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 7;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 7;
Acknowledgment
विषय - परमेश्वराला आणि राजाला इंद्र नावाने आवाहन करणे.
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (परमात्मपर) - हे (इन्द्र) दुर्गुणनाशक परमेश्वर, (यत्) ज्याअर्थी (शासः) शासक व नियामक आहात, म्हणून तुम्ही (अव्रतम्) व्रतहीन व कर्मछीन मनुुष्याला (सदसः परि) सज्जनांच्या समाजातून (च्यावय) काढून टाका. हे (मघवन्) सद्गुण रूप धनाचे स्वामी परमेश्वर, (अस्माकम्) आमच्या (पुरुस्पृहम्) अत्यंत प्रिय (अंशुम्) मनाला (वसव्ये अधि) आध्यात्मिक आणि आधिभौतिक दोन्ही प्रकारचे धन प्राप्त करण्यासाठी (बर्हय) आम्हाला श्रेष्ठ पुरुष करा.।।
द्वितीय अर्थ - (राजापर) - (यत्) ज्याअर्थी (इंद्र) पापांचे आणि पापीजनांचे विनाशक हे राजा, तुम्ही (शासः) शासक आहात, यामुळे (अव्रतम्) वर्णाश्रमाची मर्यादा न पाळणाऱ्या माणसाला (सदसः परि) राष्ट्ररूप यज्ञगृहातून (च्यावय) निष्कासित करा अथवा (दुसरा अर्थ) (अव्रतम्) राष्ट्रसेवेचे व्रत न घेतलेल्या मनुष्याला (सदसः परि) संसदेच्या सदस्यत्वापासून (च्यावय) वंचित करा वा काढून टाका. हे (मघवन्) धनांचे स्वामी, (अस्माकम्) आम्हा प्रजाजनांनी दिलेल्या (पुरुस्पृहम्) दिलेल्या अत्यंत प्रिय अशा (अंशुम्) कररूप दानाचा (वसवे अधि) राष्ट्रहिताच्या कामांसाठी (बर्हय) उपयोग करा. ।। ६।।
भावार्थ - तेच लोक राष्ट्र परिषदेचे (लोकसभेचे वा राज्यसभेचे) सदस्य असावेत, ज्यांनी राष्ट्र सेवेचे व्रत स्वीकारले असेल. प्रजाजनांनीदेखील वर्णाश्रमाच्या मर्यादित राहून कर्म परायण असायला पाहिजे. प्रजेने स्वेच्छेने राजाला निर्धारित कर दिला पाहिजे आणि राजाने ते कराद्वारे प्राप्त धनाचा उपयोग राष्ट्रहिताच्या कामांसाठी केला पाहिजे. ।। ६।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. ।। ६।।