Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 3
ऋषिः - मेधातिथिः काण्वः
देवता - अग्निः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1
अ꣣ग्निं꣢ दू꣣तं꣡ वृ꣢णीमहे꣣ हो꣡ता꣢रं वि꣣श्व꣡वे꣢दसम् । अ꣣स्य꣢ य꣣ज्ञ꣡स्य꣢ सु꣣क्र꣡तु꣢म् ॥३॥
स्वर सहित पद पाठअ꣣ग्नि꣢म् । दू꣣त꣢म् । वृ꣣णीमहे । हो꣡ता꣢꣯रम् । वि꣣श्व꣡वे꣢दसम् । वि꣣श्व꣢ । वे꣣दसम् । अस्य꣢ । य꣣ज्ञ꣡स्य꣢ । सु꣣क्र꣡तु꣢म् । सु꣣ । क्र꣡तु꣢꣯म् ॥३॥
स्वर रहित मन्त्र
अग्निं दूतं वृणीमहे होतारं विश्ववेदसम् । अस्य यज्ञस्य सुक्रतुम् ॥३॥
स्वर रहित पद पाठ
अग्निम् । दूतम् । वृणीमहे । होतारम् । विश्ववेदसम् । विश्व । वेदसम् । अस्य । यज्ञस्य । सुक्रतुम् । सु । क्रतुम् ॥३॥
सामवेद - मन्त्र संख्या : 3
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 1;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 1;
Acknowledgment
विषय - त्या परमेश्वराला आम्ही दूतरूपाने वरणीय मानतो, हे सांगतात :
शब्दार्थ -
आम्ही (उपासक) (होतारम्) दिव्य गुणांचे आव्हान करणाऱ्या (विश्ववेदसम्) विश्वज्ञाता, समस्त विश्वास विद्यामान आणि सर्व आध्यात्मिक व भौतिक धनाचा स्रोत जो परमात्मा, त्याला (अस्य) या अनुष्ठानित वा प्रारंभित ( यज्ञस्य) अध्यात्म यज्ञाच्या (सुक्रतुम्) सुकर्ता, सुसंचालक आणि ऋत्विजरूप असलेल्या (अग्निम) परमात्म्याला (दूतं वृणीमहे) दिव्य गुणांच्या अवतरणासाठी (आमच्या हृदय व आचरणात सद्गुणांचा स्वीकार करण्यासाठी) दूत रूपाने स्वीकार करीत आहोत. ।।३।।
भावार्थ - ज्याप्रमाणे दूत म्हणून नेमलेला माणूस आमचा संदेश आमच्या प्रियजनापर्यंत पोहोचवतो आणि त्याचा निरोप आम्हास येऊन सांगतो व अशाप्रकारे दोघांचे संमिलन घडवून आणतो, त्याप्रमाणे परमेश्वर आमच्या आणि सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, न्याय, विद्या, श्रद्धा, सुमति आदी गुणांचे संमिलन घडविण्यास दूतरूपेण कार्य करतो. वरील दिव्य गुणांना बोलावून त्यांच्याशी आमची भेट घडवितो. त्यामुळे सर्व उपसकांनी त्याचेच दूतरूपाने वरण करावे. ।।३।।
इस भाष्य को एडिट करें