Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 4
ऋषिः - भरद्वाजो बार्हस्पत्यः देवता - अग्निः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1

अ꣣ग्नि꣢र्वृ꣣त्रा꣡णि꣢ जङ्घनद्द्रविण꣣स्यु꣡र्वि꣢प꣣न्य꣡या꣢ । स꣡मि꣢द्धः शु꣣क्र꣡ आहु꣢꣯तः ॥४॥

स्वर सहित पद पाठ

अ꣣ग्निः꣢ । वृ꣣त्रा꣡णि꣢ । ज꣣ङ्घनत् । द्रविणस्युः꣢ । वि꣣पन्य꣡या꣢ । स꣡मि꣢꣯द्धः । सम् । इ꣣द्धः । शुक्रः꣢ । आ꣡हु꣢꣯तः । आ । हु꣣तः ॥४॥


स्वर रहित मन्त्र

अग्निर्वृत्राणि जङ्घनद्द्रविणस्युर्विपन्यया । समिद्धः शुक्र आहुतः ॥४॥


स्वर रहित पद पाठ

अग्निः । वृत्राणि । जङ्घनत् । द्रविणस्युः । विपन्यया । समिद्धः । सम् । इद्धः । शुक्रः । आहुतः । आ । हुतः ॥४॥

सामवेद - मन्त्र संख्या : 4
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 1;
Acknowledgment

शब्दार्थ -
(द्रविणस्यु:) उपासकांना आध्यात्मिक धन आणि बळ देण्याची इच्छा असणारा (अग्नि:) तो तेजोमय परमेश्वर (विपन्यया) विशेष स्तुतीद्वारे (समिद्धः) हृदयात संदीप्त होतो (शुक्रः) स्तुतीद्वारे प्रज्वलित आणि (आहुत:) उपासकांच्या आत्माहुतीद्वारे परिपूजित झालेल्या व परमेश्वराने (वृत्राणि) अध्यात्म प्रकाशाला आच्छादित करणाऱ्या पापांना (जङ्घनत) पुन्हा पुन्हा (जेव्हा जेव्हा ती पापे उद्भवतील, तेव्हा तेव्हा) ती नष्ट करावीत ( ही प्रार्थना ) ॥४॥

भावार्थ - याज्ञिकजनांद्वारे हवींची आहुती देऊन प्रदीप्त झालेला यज्ञाग्नी त्याप्रमाणे रोगादींचा नाश करतो, तसेच परमात्मरूप अग्नी योगाभ्यासीजनांद्वारे केल्या जाणाऱ्या हार्दिक स्तुतीमुळे संदीप्त होऊन तसेच योगीजनाच्या प्राण, इन्द्रिय, आत्मा, मन, बुद्धी आदींच्या हवीवा आहुती स्वीकारून त्यांच्या पापमय विचार सर्वथा समूळ नष्ट करतो. ॥४॥

इस भाष्य को एडिट करें
Top