Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 30
ऋषिः - वामदेवो गौतमः
देवता - अग्निः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1
प꣢रि꣣ वा꣡ज꣢पतिः क꣣वि꣢र꣣ग्नि꣢र्ह꣣व्या꣡न्य꣢क्रमीत् । द꣢ध꣣द्र꣡त्ना꣢नि दा꣣शु꣡षे꣢ ॥३०॥
स्वर सहित पद पाठप꣡रि꣢꣯ । वा꣡ज꣢꣯पतिः । वा꣡ज꣢꣯ । प꣣तिः । कविः꣢ । अ꣣ग्निः꣢ । ह꣣व्या꣡नि꣢ । अ꣣क्रमीत् । द꣡ध꣢꣯त् । र꣡त्ना꣢꣯नि । दा꣣शु꣡षे꣢ ॥३०॥
स्वर रहित मन्त्र
परि वाजपतिः कविरग्निर्हव्यान्यक्रमीत् । दधद्रत्नानि दाशुषे ॥३०॥
स्वर रहित पद पाठ
परि । वाजपतिः । वाज । पतिः । कविः । अग्निः । हव्यानि । अक्रमीत् । दधत् । रत्नानि । दाशुषे ॥३०॥
सामवेद - मन्त्र संख्या : 30
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 3;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 3;
Acknowledgment
विषय - आता परमेश्वर स्तोत्यावर कसा उपकार करतो, हे सांगतात. -
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (परमेश्वरपरक) (राजपति:) आर्वत्मक बळाचा अधीश्वर (कवि:) मेधावी व दूरदर्शी (अग्नि:) प्रकाशस्वरूप परमेश्वर (दाशुषे) आत्म्याला हवी करून ईश्वराला अर्पण करणाऱ्या आत्मदानी स्त्रोतासाठी (रत्नानि) रमणीय सद्गुणरूप संपत्ती (दधत्) प्रदान करीत त्याच्या आत्मसमर्पणरूप हवीला (परि अक्रमीत्) सर्वत: पूर्णत: प्राप्त करतो अर्थात स्वीकार करतो. ।।१०।।
द्वितीय अर्थ : (यज्ञाग्नीपरक) (वाजपति) अन्न आणि शक्ती देणारा आणि सर्वांचा पालक (कवि:) गतिमान (अग्नि:) यज्ञाग्नी (दाशुषे) हवी देणाऱ्या यजमानाला (रक्षन्ति) आरोग्य आदी रमणीय फळे (दधत्) देत (हव्यानि) सुगंधित, मधुर, पुष्टिकर आणि रोगनाशक धृत, केशर, कस्तुरी आदी आहुती पदार्थांना (परि, अक्रमीत) सूक्ष्म करून चारही दिशांकडे प्रसृत करतो. ।।१०।।
भावार्थ - ज्याप्रमाणे अन्न आणि बळ यांच्या उत्पत्तीचे कारण असलेला यज्ञाग्नी हवी देणाऱ्या यजमानाला दीर्घायुष्य, आरोग्य आदी फळ प्रदान करतो, त्याचप्रमाणे आत्मसमर्पणरूप हवी देणाऱ्या स्तोताला परमेश्वर सद्गुण आदी फळे देतो. ।।१०।।
विशेष -
या मंत्रात श्लेषालंकार आणि उपमानोपमेयभाव ध्वनित होत आहे. ।।१०।।