Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 312
ऋषिः - नोधा गौतमः
देवता - इन्द्रः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
प्र꣡ यो रि꣢꣯रि꣣क्ष꣡ ओज꣢꣯सा दि꣣वः꣡ सदो꣢꣯भ्य꣣स्प꣡रि꣢ । न꣡ त्वा꣢ विव्याच꣣ र꣡ज꣢ इन्द्र꣣ पा꣡र्थि꣢व꣣म꣢ति꣣ वि꣡श्वं꣢ ववक्षिथ ॥३१२॥
स्वर सहित पद पाठप्र꣢ । यः । रि꣣रिक्षे꣢ । ओ꣡ज꣢꣯सा । दि꣣वः꣢ । स꣡दो꣢꣯भ्यः । प꣡रि꣢꣯ । न । त्वा꣣ । विव्याच । र꣡जः꣢꣯ । इ꣣न्द्र । पा꣡र्थिव꣢꣯म् । अ꣡ति꣢ । वि꣡श्व꣢꣯म् । व꣣वक्षिथ ॥३१२॥
स्वर रहित मन्त्र
प्र यो रिरिक्ष ओजसा दिवः सदोभ्यस्परि । न त्वा विव्याच रज इन्द्र पार्थिवमति विश्वं ववक्षिथ ॥३१२॥
स्वर रहित पद पाठ
प्र । यः । रिरिक्षे । ओजसा । दिवः । सदोभ्यः । परि । न । त्वा । विव्याच । रजः । इन्द्र । पार्थिवम् । अति । विश्वम् । ववक्षिथ ॥३१२॥
सामवेद - मन्त्र संख्या : 312
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 8;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 8;
Acknowledgment
विषय - इंद्र- महिमेचे वर्णन
शब्दार्थ -
हे (इन्द्र) परमैश्वर्यशाली परमेश्वर, (यः) हे जे आपण (ओजसा) शक्तीमध्ये व प्रतापामध्ये (दिवः) द्यौलोकाच्या (सदोभ्यः) सदनांही पलीकडे म्हणजे सूर्य, तारा मंडळ आदीपेक्षाही (परि) वर अथवा पलीकडे असून (प्र रिरिक्षे) महिमेमध्ये त्या सर्वांहून मोठे आहात. अशा (त्वा) आपणाला (पार्थिवं रजः) पार्थिव लोकादेखील (म विव्याच) फसवू शकत नाही म्हणजे महिमेमध्ये तुमचा पराभव करू शकत नाही. खरेच तुम्ही (विश्वम् अति) समस्त विश्वाचे अतिक्रमण करून (ववक्षिथ) महान म्हणून विद्यमान आहात. ।। १०।।
भावार्थ - परमेश्वराची शक्ती, महिमा व त्याचा प्रताप- प्रभाव द्यौलोक, पृथ्वीलोक आदींपेक्षा किंबहुना समस्त ब्रह्मांडापेक्षा अधिक आहे.।। १०।। या दशतीमध्ये निसर्गातील उषेच्या वर्णनातून आध्यात्मिक उषेच्या आविर्भावाचे वर्णन, अश्विनौ नावाने परमात्मा- जीवात्मा, आत्मा- मन, अध्यापक- उपदेशक का स्तवन, इंद्र नावाने जगदीश्वराची स्तुती करून त्यापासून धन, शत्रुविनाश आदींची प्रार्थना तसेच इंद्राचा महिमा, इंद्र नावाने राजा, सेमाध्यक्ष आदींच्या कर्तव्यांचे ज्ञान करून दिले आहे. यामुळे या दशतीली मंत्रांच्या अर्थाची मागील दशतीच्या मंत्राच्या अर्थाशी संगती आहे, असे जाणावे.।। चतुर्थ प्रपाठकातील प्रथम अर्धाची द्वितीय दशति समाप्त। तृतीय अध्यायातील अष्टम खंड समाप्त.
इस भाष्य को एडिट करें