Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 313
ऋषिः - वसिष्ठो मैत्रावरुणिः
देवता - इन्द्रः
छन्दः - त्रिष्टुप्
स्वरः - धैवतः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
अ꣡सा꣢वि दे꣣वं꣡ गोऋ꣢꣯जीक꣣म꣢न्धो꣣꣬ न्य꣢꣯स्मि꣢न्नि꣡न्द्रो꣢ ज꣣नु꣡षे꣢मुवोच । बो꣡धा꣢मसि त्वा हर्यश्व यज्ञै꣣र्बो꣡धा꣢꣯ न꣣ स्तो꣢म꣣म꣡न्ध꣢सो꣣ म꣡दे꣢षु ॥३१३॥
स्वर सहित पद पाठअ꣡सा꣢꣯वि । दे꣣व꣢म् । गो꣡ऋजी꣢꣯कम् । गो । ऋ꣣जीकम् । अ꣡न्धः꣢꣯ । नि । अ꣣स्मिन् । इ꣡न्द्रः꣢꣯ । ज꣣नु꣡षा꣢ । ई꣣म् । उवोच । बो꣡धा꣢꣯मसि । त्वा꣣ । हर्यश्व । हरि । अश्व । यज्ञैः꣢ । बो꣡ध꣢꣯ । नः꣣ । स्तो꣡म꣢꣯म् । अ꣡न्ध꣢꣯सः । म꣡दे꣢꣯षु ॥३१३॥
स्वर रहित मन्त्र
असावि देवं गोऋजीकमन्धो न्यस्मिन्निन्द्रो जनुषेमुवोच । बोधामसि त्वा हर्यश्व यज्ञैर्बोधा न स्तोममन्धसो मदेषु ॥३१३॥
स्वर रहित पद पाठ
असावि । देवम् । गोऋजीकम् । गो । ऋजीकम् । अन्धः । नि । अस्मिन् । इन्द्रः । जनुषा । ईम् । उवोच । बोधामसि । त्वा । हर्यश्व । हरि । अश्व । यज्ञैः । बोध । नः । स्तोमम् । अन्धसः । मदेषु ॥३१३॥
सामवेद - मन्त्र संख्या : 313
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 9;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 9;
Acknowledgment
विषय - परमेश्वराला श्रद्धा रसाचे समर्पण
शब्दार्थ -
आमच्यातर्फे (उपासकांतर्फे) (देवम्) दीप्तिमय, तेजस्वी (गोऋजीकम्) इंद्रियरूप गायींना सरळ मार्गे जाण्यासाठी जे साधन म्हणजे (अन्धसः) श्रद्धारस (असावि) आम्ही तुझ्यासाठी अभिषुत केला आहे. (गाळला आहे. म्हणजे हृदयात तुझे ध्यान धरले आहे.) (अस्मिन्) या श्रद्धा भावनेशी (इन्द्रः) परमेश्वर (जनुषा ईम्) स्वाभाविकपणे (नि उवीच) अत्यंत संबंद्ध झाला आहे. हे (हर्यश्व) वेगवान भूमी, चंद्र, विद्युत आदी पदार्थांचे स्वामी परमेश्वर, आम्ही (यज्ञैः) योगाभ्यास रूप यज्ञाद्वारे (त्वा) तुम्हाला (बोधामसि) जाणतो. तुम्ही (अन्धसः) आनंद- रसाच्या (मदेषु) तृप्तीद्वारे (नः) आम्हाला (बोध) जाणून घ्या. (आम्ही उपासक योग सराधनाद्वारे ईश्वराचे रूप जाणतो आणि परमेश्वराने आमच्या श्रद्धा भावनांचे दृढत्व व गांभीर्य ओळखावे.) ।। १।।
भावार्थ - परमेश्वराच्या उपासनेने य़ोगभ्यासी मनुष्याची इंद्रिये सरळ मार्गी होतात. त्यामुळे सर्वांनी श्रद्धेने परमेश्वराची अर्चना केली पाहिजे. ।। १।।
विशेष -
या मंत्रात इंद्राने आणि त्याच्या स्तुतिकर्त्यानी एकमेकास बोधनरूप क्रिया केली आहे. त्यामुळ ेयेथे ङ्गअम्योन्यफ अलंकार आहे. ङ्गबोधाफच्या एक वेळा आवृत्तीमुळे यमक अलंकार आणि ‘मन्धो मन्ध’ छेकानुप्रास आहे.।। १।।