Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 32
ऋषिः - मेधातिथिः काण्वः देवता - अग्निः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1

क꣣वि꣢म꣣ग्नि꣡मुप꣢꣯ स्तुहि स꣣त्य꣡ध꣢र्माणमध्व꣣रे꣢ । दे꣣व꣡म꣢मीव꣣चा꣡त꣢नम् ॥३२॥

स्वर सहित पद पाठ

क꣣वि꣢म् । अ꣣ग्नि꣢म् । उ꣡प꣢꣯ । स्तु꣣हि । स꣣त्य꣡ध꣢र्माणम् । स꣣त्य꣢ । ध꣣र्माणम् । अध्वरे꣢ । दे꣣व꣢म् । अ꣣मीवचा꣡त꣢नम् । अ꣣मीव । चा꣡त꣢꣯नम् ॥३२॥


स्वर रहित मन्त्र

कविमग्निमुप स्तुहि सत्यधर्माणमध्वरे । देवममीवचातनम् ॥३२॥


स्वर रहित पद पाठ

कविम् । अग्निम् । उप । स्तुहि । सत्यधर्माणम् । सत्य । धर्माणम् । अध्वरे । देवम् । अमीवचातनम् । अमीव । चातनम् ॥३२॥

सामवेद - मन्त्र संख्या : 32
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 12
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 3;
Acknowledgment

शब्दार्थ -
प्रथम अर्थ (परमेश्वरपरक) हे मनुष्य, तू (अध्वरे) हिंसा आदिरहीत जीवन यज्ञात (कविम्) वेदकाव्य रचणाऱ्या कवीची क्रान्तिदर्शी आणि (सत्यधर्माणम्) सत्य गुण, कर्म, स्वभाव असणाऱ्या (देवम्) सूख प्रदाता परमेश्वराची उपासना कर. (अमीववातनम्) अज्ञान आदीचे निवारक, वकाधी, सत्यज, संशय, प्रमाद, आलस्य आदी जे योगाभ्यासात विघ्न निर्माण करणारे मानसिक रोग आहेत, त्यांना नष्ट करणाऱ्या (अग्निम्) तेजस्वी परमेशाची (उपस्तुहि) उपासना कर ।। द्वितीय अर्थ : (भौतिक अग्नीपरक) हे मनुष्या, तू (अध्वरे) शिल्पयज्ञामध्ये (कविम्) गतिमान, (सत्यधर्माणम्) सत्य गुण, कर्म, स्वभाव असलेल्या (देवम्) प्रकाशमान, प्रकाशक आणि कार्यसाधक (अमीवनातनम्) तसेच ज्वर आदी रोगांना नाश करणाऱ्या (अग्निम्) अग्नी, विद्युत आणि सूर्य यांच्या (उप, स्तुहि) गुणांचे वर्णन कर. (आणि तंत्र, यंत्र विज्ञानात यांचा प्रयोग कर.) ।।१२।।

भावार्थ - मनुष्यांनी जसे शिल्प विद्येच्या तंत्र शास्त्र आदीच्या सिद्धीकरीता भौतिक अग्नी, विद्युत आणि सूर्याच्या गुणांचा भरपूर उपयोग केला पाहिजे. तद्वत मनुष्यांनी धर्मप्राप्तीकरीता परमेश्वराच्या गुण, कर्म स्वभावाचे ज्ञान प्राप्त केले पाहिजे. आणि त्याचे वर्णन व अनुकरणही केले पाहिजे. ।।१२।।

इस भाष्य को एडिट करें
Top