Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 321
ऋषिः - बुहस्पतिर्नकुलो वा देवता - इन्द्रः छन्दः - त्रिष्टुप् स्वरः - धैवतः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

ब्र꣡ह्म꣢ जज्ञा꣣नं꣡ प्र꣢थ꣣मं꣢ पु꣣र꣢स्ता꣣द्वि꣡ सी꣢म꣣तः꣢ सु꣣रु꣡चो꣢ वे꣣न꣡ आ꣢वः । स꣢ बु꣣꣬ध्न्या꣢꣯ उप꣣मा꣡ अ꣢स्य वि꣣ष्ठाः꣢ स꣣त꣢श्च꣣ यो꣢नि꣣म꣡स꣢तश्च꣣ वि꣡वः꣢ ॥३२१॥

स्वर सहित पद पाठ

ब्र꣡ह्म꣢꣯ । ज꣣ज्ञान꣢म् । प्र꣢थम꣢म् । पु꣣र꣡स्ता꣢त् । वि । सी꣣मतः꣢ । सु꣣रु꣡चः꣢ । सु꣣ । रु꣡चः꣢꣯ । वे꣣नः꣢ । अ꣣वरि꣡ति꣢ । सः । बु꣣ध्न्याः꣡ । उ꣣पमाः । उ꣣प । माः꣢ । अ꣣स्य । विष्ठाः꣢ । वि꣣ । स्थाः꣢ । स꣣तः꣢ । च꣣ । यो꣡नि꣢꣯म् । अ꣡स꣢꣯तः । अ । स꣣तः । च । वि꣢ । व꣣रि꣡ति꣢ ॥३२१॥


स्वर रहित मन्त्र

ब्रह्म जज्ञानं प्रथमं पुरस्ताद्वि सीमतः सुरुचो वेन आवः । स बुध्न्या उपमा अस्य विष्ठाः सतश्च योनिमसतश्च विवः ॥३२१॥


स्वर रहित पद पाठ

ब्रह्म । जज्ञानम् । प्रथमम् । पुरस्तात् । वि । सीमतः । सुरुचः । सु । रुचः । वेनः । अवरिति । सः । बुध्न्याः । उपमाः । उप । माः । अस्य । विष्ठाः । वि । स्थाः । सतः । च । योनिम् । असतः । अ । सतः । च । वि । वरिति ॥३२१॥

सामवेद - मन्त्र संख्या : 321
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 9;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (सूर्यपर अर्थ) (प्रथमम्) श्रेष्ठ (ब्रह्म) महान आदित्यरूप ज्योती (पुरस्तात्) पूर्व दिशेत (जज्ञानम्) प्रकट होत आहे. (वेनः) कांतिमान सूर्याने (सीमतः) चारही दिशांत अथवा संयतपण (सुरूचः) आपला रोचमान किरणे (वि आवः)रात्रीच्या अंधकारात प्रविष्ट केल्या आहेत. (सः) तो सूर्य (उपमाः) सर्वांच्या जवळ असलेल्या (अस्म) या जगाची (विष्ठाः) विशेष रूपाने स्थिती सांभाळणाऱ्या (बुध्न्याः) अंतरिक्षस्थित दिशांना (विवः) आपल्या प्रकाशाने उजळून टाकतो आणि (सतःच) व्यक्त अर्थात कार्यारूपात असणाऱ्या (म्हणजे नद्या, पर्वत, घरे आदी पदार्थांना प्रकाशित करतो तसेच हा सूर्य (असतः) कारणात (अणुरूप प्रकृतीत) अव्यक्तपणे विद्यमान अशा पदार्थांच्या (योनिम्) गृहरूप भूमंडळाला (विवः) प्रकाशित करतो. (डोळ्याला दिसणारे पदार्थ आणि अतिसूक्ष्म पदार्थांनाही सूर्य आपल्या तेजाने उर्जस्वी व तेजोमय बनवितो. त्यात ऊर्जा निर्माण करतो.) द्वितीय अर्थ (परमात्मपर) - (प्रथमम्) श्रेष्ठ (ब्रह्म) आणि जगाचे आदिकारण असलेला ब्रह्म (पुरस्तात्) सृष्टिरचनेच्या आदिकाळात (जज्ञानम्) प्रकृतीच्या गर्भातून महत् आदींच्या या जगाचा उत्पत्तिकर्ता झाला. (वेनः) त्या मेघावी परब्रह्माने (सीमतः) मर्यादित राहून म्हणजे महत आदींची अत्यंत व्यवस्थितपणे (सुरुचः) रोचमान पदार्थांची (वि आवः) उत्पत्ती केल. (सः) त्याच परब्रह्माने (उपमाः) पदार्थांचा जवळ राहत आकर्षण - विकर्षण शक्तीद्वारे एकमेकास कक्षेत स्थिर ठेवणाऱ्या (अस्थ) या जगाच्या (विष्ठाः) पदार्थांना विशिष्ट स्थितीत ठेवण्यासाठी (बुध्न्याः) आकाशस्थ सूर्य, चंद्र, पृथ्वी, तारका आदी लोकांनादेखील (विवः) प्रकाशित केले. त्यानेच (सतःच) व्यक्त म्हणजे दृश्यमान भूमी, जल, अग्नी, पवन, तारका आदी लोकांना (असतःच) आणि अव्यक्त महत्, अहंकार, पंचतन्मात्रा आदींची जी कारणभूत आहे, त्या (योनिम्) प्रकृतीला (विवः) कार्यरूपात म्हणजे दृश्य रूपात प्रकट केले. ।। ९।।

भावार्थ - कांतिमान सूर्य पूर्व दिशेत उदित होत आपल्या सुदीप्त किरणांनी आकाश आणि भूमीवर सर्वत्र पसरवील. सर्व दिशा आणि सर्व जग उजळून टाकतो. त्याचप्रकारे कांतिमान मेधावी परमेश्वर प्रकृतीच्या माध्यमातून सर्व रोचमान पदार्थ आणि सूर्य, चंद्र, पृथ्वी, तारका आदी लोकांची सृ

इस भाष्य को एडिट करें
Top