Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 320
ऋषिः - वेनो भार्गवः देवता - वेनः छन्दः - त्रिष्टुप् स्वरः - धैवतः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

ना꣡के꣢ सुप꣣र्ण꣢꣯मुप꣣ य꣡त्पत꣢꣯न्तꣳ हृ꣣दा꣡ वेन꣢꣯न्तो अ꣣भ्य꣡च꣢क्षत त्वा । हि꣡र꣢ण्यपक्षं꣣ व꣡रु꣢णस्य दू꣣तं꣢ य꣣म꣢स्य꣣ यो꣡नौ꣢ शकु꣣नं꣡ भु꣢र꣣ण्यु꣢म् ॥३२०॥

स्वर सहित पद पाठ

ना꣡के꣢꣯ । सु꣣पर्ण꣢म् । सु꣣ । पर्ण꣢म् । उ꣡प꣢꣯ । यत् । प꣡त꣢꣯न्तम् । हृ꣣दा꣢ । वे꣡न꣢꣯न्तः । अ꣣भ्य꣡च꣢क्षत । अ꣣भि । अ꣡च꣢꣯क्षत । त्वा꣣ । हि꣡र꣢꣯ण्यपक्ष꣣म् । हि꣡र꣢꣯ण्य । प꣣क्षम् । व꣡रु꣢꣯णस्य । दू꣣त꣢म् । य꣣म꣡स्य꣢ । यो꣡नौ꣢꣯ । श꣣कुन꣢म् । भु꣣रण्यु꣢म् ॥३२०॥


स्वर रहित मन्त्र

नाके सुपर्णमुप यत्पतन्तꣳ हृदा वेनन्तो अभ्यचक्षत त्वा । हिरण्यपक्षं वरुणस्य दूतं यमस्य योनौ शकुनं भुरण्युम् ॥३२०॥


स्वर रहित पद पाठ

नाके । सुपर्णम् । सु । पर्णम् । उप । यत् । पतन्तम् । हृदा । वेनन्तः । अभ्यचक्षत । अभि । अचक्षत । त्वा । हिरण्यपक्षम् । हिरण्य । पक्षम् । वरुणस्य । दूतम् । यमस्य । योनौ । शकुनम् । भुरण्युम् ॥३२०॥

सामवेद - मन्त्र संख्या : 320
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 9;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे इंद्र परमेश्वर (नाके) आत्मलोकात (उपपतन्तम्) जाणारा व (हिरण्य पक्षम्) ज्योतिरूप पंख असलेला (वरुणस्य दूतम्) पापभिवारक आणि मनाचा प्रेरक, (यमस्य) शरीरस्थ इंद्रियांचा नियामक जो जीव्तामा, त्या जीवात्म्याच्या (योमौ) हृदयरूप गृहात उदित होणाऱ्या (शकुनम्) शक्तिशाली (भुरण्युम्) धारक व पषक असलेल्या (सुपर्णम्) शुभपालन गुणांनी युक्त (त्वा) असलेल्या तुमची (यत्) स्तोताजन (वेनन्तः) जेव्हा खऱ्या हृदयाने कामना करतात, तेव्हा ते जीवात्मा (हृदा) मनापासून (अभ्यचक्षत, तुमचा साक्षात्कार करतात. (याच मंत्राचा दुसरा अर्थ की ज्यात सूर्याच्या उदाहरणावरून परमेश्वराच्या दर्शनाचा उपाय सांगितला आहे.) ज्याप्रमाणे (नाके) मध्याहृीं आकाशात (उपपवन्तम्) जाणाऱ्या (हिरण्यपक्षम्) किरणरूप सोनेरी पंख असलेल्या, (वरुणस्य दूतम्) अंतरिक्षस्य रोगनिवारक वायूच्या (दूतम्) दूताप्रमाणे उपकारक असलेल्या (यमस्य) रथ, यंत्र आदींना नियंत्रित करणाऱ्या वैद्युत अग्नीच्या उत्पादक असलेल्या (योनौ) गृहरूप अंतरिक्षात (शकुनम्) पक्ष्याप्रमाणे विद्यमान व (भुरण्युम्) भ्रमणशील अशा (सुपर्णम्) सूर्याला लोक (अभ्यचक्षत) डोळ्याने पाहतात (त्याप्रमाणे स्तोताजन हृदयस्थ परमेश्वराचा साक्षात्कार करतात. मंत्राचा पहिला अर्थ नंतर वाचावा. आधी दुसरा अर्थ वाचावा, म्हणजे अर्थसंगती लागते.)।। ८।।

भावार्थ - जे मनुष्य उत्कंठित हृदयाने परमेश्वराची कामना करतात, ते मनाद्वारे त्याच तीव्रतेने त्याचा साक्षात्कारही करू शकतात. नेमके त्याप्रकारे की जसे लोक डोळ्यांनी सूर्याला पाहतात.।। ८।।

इस भाष्य को एडिट करें
Top