Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 326
ऋषिः - द्युतानो मारुतः देवता - इन्द्रः छन्दः - त्रिष्टुप् स्वरः - धैवतः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

त्व꣢ꣳ ह꣣ त्य꣢त्स꣣प्त꣢भ्यो꣣ जा꣡य꣢मानोऽश꣣त्रु꣡भ्यो꣢ अभवः꣣ श꣡त्रु꣢रिन्द्र । गू꣣ढे꣡ द्यावा꣢꣯पृथि꣣वी꣡ अन्व꣢꣯विन्दो विभु꣣म꣢द्भ्यो꣣ भु꣡व꣢नेभ्यो꣣ र꣡णं꣢ धाः ॥३२६॥

स्वर सहित पद पाठ

त्व꣢म् । ह꣣ । त्य꣢त् । स꣣प्त꣡भ्यः꣢ । जा꣡य꣢꣯मानः । अशत्रु꣡भ्यः꣢ । अ꣣ । शत्रु꣡भ्यः꣢ । अ꣣भवः । श꣡त्रुः꣢꣯ । इ꣣न्द्र । गूढे꣡इति꣢ । द्या꣡वा꣢꣯ । पृ꣣थिवी꣡इति꣢ । अ꣡नु꣢꣯ । अविन्दः । विभुम꣡द्भ्यः꣢ । वि꣣ । भुम꣡द्भ्यः꣢ । भु꣡व꣢꣯नेभ्यः । र꣡ण꣢꣯म् । धाः꣣ ॥३२६॥


स्वर रहित मन्त्र

त्वꣳ ह त्यत्सप्तभ्यो जायमानोऽशत्रुभ्यो अभवः शत्रुरिन्द्र । गूढे द्यावापृथिवी अन्वविन्दो विभुमद्भ्यो भुवनेभ्यो रणं धाः ॥३२६॥


स्वर रहित पद पाठ

त्वम् । ह । त्यत् । सप्तभ्यः । जायमानः । अशत्रुभ्यः । अ । शत्रुभ्यः । अभवः । शत्रुः । इन्द्र । गूढेइति । द्यावा । पृथिवीइति । अनु । अविन्दः । विभुमद्भ्यः । वि । भुमद्भ्यः । भुवनेभ्यः । रणम् । धाः ॥३२६॥

सामवेद - मन्त्र संख्या : 326
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 10;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (इंद्र) शूरवीर परमेश्वरा, (त्वं ह)तूच (त्यत्) त्यापुढे सांगितलेली महान कार्ये करतोस. कोणते कर्म ? हे पुढे सांगतात - (जायमानः) उपासकाच्या हृदयात प्रकट होत तू (उशत्रुभ्यः) तुझ्याशिवाय पुढील दुर्गुणांचा कोणी शत्रु वा विनाशक नाही. ते (सप्तभ्यः) काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आणि दुर्भाषण या सात राक्षसांचा वध करण्यासाठी त्यांचे तूच (शत्रु) (अभवः) शत्रू होतोस. तूच (गूढे) कारणरूप असलेल्या पाच महाभूतांमध्ये लपलेल्या (द्यावापृथिवी) द्यूलोक व पृथ्वी लोकास (अन्वविन्दः) कार्य अवस्थेत आणतोस (द्युलोक, पृथ्वी, सर्व ग्रहादी सूक्ष्म कारण रूपाने प्रकृतीत अव्यक्त असतात. त्यांना परमेश्वरच पृथ्वी, चंद्र आदी रूपात कार्यरूपात प्रकट करीत असतो.) अशा प्रकारे (विभुमद्भ्यः) (भुवनेभ्यः) वैभवमय लोक - लोकांतराची उत्पत्ती करण्यासाठी तूच (रणम्) (धाः) युद्ध (म्हणजे क्रिया) करतोस. या सर्वांचे तात्पर्य असे की जसे युद्धामध्ये शूरत्व दाखविले जाते. तद्वत तू प्रकृतीपासून महत् तत्त्वस महत्पासून अहंकार, अहंकारापासून पंचतन्मात्रा आणि मनासह दहा इंद्रिये, पंच तन्मात्रापासून पंचभूत आणि पंच महाभूतांपासून द्यावापृथिवी आदी लोक - लोकांतर आणि सर्व प्रजा. या सर्वांना तूच उत्पन्न केले आहेस. वर वर्णिलेल्या क्रमाने सृष्टीच्या उत्पत्तिच्या वेळी प्रकृतीत जो विक्षोभ वा जी उलथापालथ करावी लागते, त्यालाच इथे रण म्हटले आहे. ।। ४।।

भावार्थ - परमेश्वरच काम, क्रोध आदी अंतः शत्रूंचा विनाश करतो. त्यानेच प्रकृती तत्त्वाच्या गर्भातून महत् आदीच्या क्रमाने विविध वैचित्र्यांने भरलेल्या सूर्य, नक्षत्र, ग्रह उपग्रह आदींची उत्पत्ती केली. तसेच पुढे त्यानेच त्या लोकांमध्ये स्वेदज, अण्डज, उद्भिज आणि जरायुज असे जीव- जन्तू, वृक्ष वनस्पती आदीने नटलेले पर्वत निर्झर, नदी, सरोवर, सागर आदीनी सुशोभित अशा या सृष्टीची निर्मिती केली आहे. यामुळे आम्ही मुक्त कंठाने त्याचे स्तुतिगान केले पाहिजे. ।। ४।।

इस भाष्य को एडिट करें
Top