Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 325
ऋषिः - बृहदुक्थ्यो वामदेव्यः
देवता - इन्द्रः
छन्दः - त्रिष्टुप्
स्वरः - धैवतः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
वि꣣धुं꣡ द꣢द्रा꣣ण꣡ꣳ सम꣢꣯ने बहू꣣ना꣡ꣳ युवा꣢꣯न꣣ꣳ स꣡न्तं꣢ पलि꣣तो꣡ ज꣢गार । दे꣣व꣡स्य꣢ पश्य꣣ का꣡व्यं꣢ महि꣣त्वा꣢꣫द्या म꣣मा꣢र꣣ स꣡ ह्यः समा꣢꣯न ॥३२५॥
स्वर सहित पद पाठवि꣣धु꣢म् । वि꣣ । धु꣢म् । द꣣द्राण꣢म् । स꣡म꣢꣯ने । सम् । अ꣣ने । बहूना꣢म् । यु꣡वा꣢꣯नम् । स꣡न्त꣢꣯म् । प꣣लितः꣢ । ज꣣गार । देव꣡स्य꣢ । प꣣श्य । का꣡व्य꣢꣯म् । म꣣हित्वा꣢ । अ꣣द्या꣢ । अ꣣ । द्य꣢ । म꣣मा꣡र꣢ । सः । ह्यः । सम् । आ꣣न ॥३२५॥
स्वर रहित मन्त्र
विधुं दद्राणꣳ समने बहूनाꣳ युवानꣳ सन्तं पलितो जगार । देवस्य पश्य काव्यं महित्वाद्या ममार स ह्यः समान ॥३२५॥
स्वर रहित पद पाठ
विधुम् । वि । धुम् । दद्राणम् । समने । सम् । अने । बहूनाम् । युवानम् । सन्तम् । पलितः । जगार । देवस्य । पश्य । काव्यम् । महित्वा । अद्या । अ । द्य । ममार । सः । ह्यः । सम् । आन ॥३२५॥
सामवेद - मन्त्र संख्या : 325
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 10;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 10;
Acknowledgment
विषय - जन्मणाऱ्याचा मृत्यू होणे अवश्य भावी आहे.
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (चंद्र सूर्यपर अर्थ) - (समने) अंधकाररूप (बहूनाम्) अनेक शत्रूंचे (दद्राणम्) विदारण करणाऱ्या (विद्यम्) चंद्राला (युवानं सन्तम्) तरुण असताना म्हणजे पूर्णिमेच्या रात्री पूर्ण प्रकाशित असताना (पलितः) वृद्ध म्हणजे पिकलेले किरण रूप केस असलेल्या सूर्याने (जगार) गिळून टाकले. अर्थात पूर्णिमा संपल्यानंतर प्रतिपदेपासून हळूहळू चंद्राची एक एक कला खात खात त्याला सूर्य अमावस्येच्या रात्री पूर्णपणे गिळून टाकतो. (देवस्य) क्रीडा म्हणजे अद्भुत कार्य करणाऱ्या परमेश्वराच्या या (महित्वा) महान (काव्यम्) जगत्- रूप दृश्य काव्याला, रे लोकहो, (पश्व) पहा. या जगात (ह्यः) जो काल (समान) प्राण धारण करीत होता, जिवंत होता, (सः) तो (अघ) आज (ममार) मृत्यू पावतो.
चंद्र सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतो. पृथ्वीभोवती परिभ्रमण करीत असल्यामुळे चंद्राचा जेवढा भाग पृथ्वीच्या आड येतो, तेवढ्यावर सूर्यप्रकाश पडत नाही. म्हणून चंद्राचा तेवढा भाग अप्रकाशित असतो. अमावस्येला चंद्राच्या आणि सूर्यामध्ये पृथ्वी येते, त्यामुळे सूर्यकिरणे चंद्रावर पडत नाहीत, म्हणून त्या रात्री चंद्र मुळीच दिसत नाही. या ग्रहस्थितीलाच वेद काव्याच्या कवीने अशा प्रकारे म्हटले आहे की सूर्याने चंद्राला गिळले.
द्वितीय अर्थ - (अध्यात्म पक्ष) - (समने) प्राणमय शरीरात (बहूनाम्) अनेक ज्ञानेद्रियांना (दद्राणम्) आपापल्या विषयांकडे प्रेरित करणाऱ्या (विधुम्) ज्ञान- साधन मनाला (युवानं सन्तम्) जागृत अवस्थेत युवकाप्रमाणे पूर्ण शक्तिमान असणाऱ्या (पलितः) अनादी असल्यामुळे जो वृद्ध असा आत्मा (जगार) सुषुप्ती अवस्थेत (युवा मनाला) गिळून टाकतो, कारण की सुषुप्ती अवस्थेत मनाच्या सर्व क्रिया सांत होतात. लोकहो, तुम्ही (देवस्य) प्रकाशक आत्म्याचे (महित्वा) महान (काव्यम्) जनन, मरण आदीरूप काव्य (पश्य) पहा. हा जो (अघ) आज (ममार) मरून पडलेला आहे. (सः) तो (हयः) काल (समान) प्राणधारी होता. हा सर्व आत्म्याच्या येर झाऱ्याचा खेळ आहे. आत्मा अशाच प्रकारे पुढेही पुनर्जन्म प्राप्त करून शरीरधारी होईल आणि देहाच्या रूपाने जीवित राहील तर मरणारदेखील.।। ३।।
भावार्थ - या जगात अति सामर्थ्यवान व्यक्तीचा मृत्यू अवश्यंभावी आहे. सा विचार करून सर्वांनी धर्म कर्मामध्ये मनाला गुंतविले पाहिजे. ।। ३।।
विशेष -
या मंत्रात ङ्गअघ ममार स हयः समानफ या सामान्य अर्थाचे चंद्राला गिळून टाकणेफ या विशेष अर्थाद्वारे समर्थन केले आहे. त्यामुळे येथे अर्थान्तर न्यास अलंकार आहे. तसेच ‘तरुणाला म्हाताऱ्याने गिळले’ या कथनात विरूप संघटनारूप विषय अलंकार आहे.।। ३।।