Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 329
ऋषिः - विश्वामित्रो गाथिनः
देवता - इन्द्रः
छन्दः - त्रिष्टुप्
स्वरः - धैवतः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
शु꣣न꣡ꣳ हु꣢वेम म꣣घ꣡वा꣢न꣣मि꣡न्द्र꣢मस्मि꣢꣫न्भरे꣣ नृ꣡त꣢मं꣣ वा꣡ज꣢सातौ । शृ꣣ण्व꣡न्त꣢मु꣣ग्र꣢मू꣣त꣡ये꣢ स꣣म꣢त्सु꣣ घ्न꣡न्तं꣢ वृ꣣त्रा꣡णि꣢ स꣣ञ्जि꣢तं꣣ ध꣡ना꣢नि ॥३२९॥
स्वर सहित पद पाठशु꣣न꣢म् । हु꣣वेम । मघ꣡वा꣢नम् । इ꣡न्द्र꣢꣯म् । अ꣣स्मि꣢न् । भ꣡रे꣢꣯ । नृ꣡तम꣢꣯म् । वा꣡ज꣢꣯सातौ । वा꣡ज꣢꣯ । सा꣣तौ । शृण्व꣡न्त꣢म्꣢ । उ꣣ग्र꣢म् । ऊ꣣त꣡ये꣢ । स꣣म꣡त्सु꣢ । स꣣ । म꣡त्सु꣢꣯ । घ्न꣡न्त꣢꣯म् । वृ꣣त्रा꣡णि꣢ । स꣣ञ्जि꣡त꣢म् । स꣣म् । जि꣡त꣢꣯म् । ध꣡ना꣢꣯नि ॥३२९॥
स्वर रहित मन्त्र
शुनꣳ हुवेम मघवानमिन्द्रमस्मिन्भरे नृतमं वाजसातौ । शृण्वन्तमुग्रमूतये समत्सु घ्नन्तं वृत्राणि सञ्जितं धनानि ॥३२९॥
स्वर रहित पद पाठ
शुनम् । हुवेम । मघवानम् । इन्द्रम् । अस्मिन् । भरे । नृतमम् । वाजसातौ । वाज । सातौ । शृण्वन्तम् । उग्रम् । ऊतये । समत्सु । स । मत्सु । घ्नन्तम् । वृत्राणि । सञ्जितम् । सम् । जितम् । धनानि ॥३२९॥
सामवेद - मन्त्र संख्या : 329
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 10;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 10;
Acknowledgment
विषय - कोणत्या वा कशा इंद्राचे आम्ही आवाहन करावे.
शब्दार्थ -
(अस्मिन्) या (वाजसातौ) अन्न, धन, ब, विज्ञान आदींची प्राप्ती करून देणाऱ्या या (भरे) संसार - समर, जीवन संग्रामामध्ये अथवा शत्रुशी होणाऱ्या युद्धामध्ये आम्ही (शुनम्) सदा-मुखी, सुखदायी आणि सुख-वर्धक व (मघवानम्) प्रशस्त ऐश्वर्यवान, (नृतमम्) व जो सर्वांहून श्रेष्ठ नायक सून (शृण्वन्तम्) दीनजनांची प्रार्थना ऐकणारा असून जो (उग्रम्) ओजस्वी आहे, अशा त्या परमेश्वराला (ऊतये) सज्जनांच्या रक्षणासाठी आम्ही उपासक वा प्रजाजन बोलावीत आहोत. तसेच (सनत्सु) आंतरिक व बाह्य देवासुर- संग्रामामध्ये (वृत्राणि) काम, क्रोध आदी षड् रिूपनांवा मानव- शत्रूंना (घ्नन्तम्) विनष्ट करणाऱ्या व (धनानि) आध्यात्मिक व भौतिक ऐश्वर्य (सज्जितम्) जिंकणाऱ्या आणि जिंकण्यात समर्थ बनविणाऱ्या (इन्द्रम्) विश्वाचा जो सन्नावत्या परमेश्वराला अथवा राजाला आम्ही (हुवेम हाक मारतो.।। ७।।
भावार्थ - जीवनाच्या संघर्ष यात्रेत जेव्हा मनुष्य ब्रह्मांड सम्राट त्या परमेश्वराला हाक मारतो, तेव्हा परमेश्वर त्यांना पुरुषार्थी होण्यास प्रेरणा करून त्यांचे नेतृत्व करतो आणि उपासकांना सर्व विपत्तीच्या प्रहारांपासून सोडवून त्यांना सुखी करतो. याच प्रकारे राष्ट्राचा स्वामी राजा राष्ट्रावर शत्रूचे आक्रमण झाल्यास प्रजेची हाक ऐकून भीषण शत्रूंचा पराभव करतो आणि शत्रूपासून विजित धनाद्वारे प्रजेची रक्षा करतो. ।। ७।।
विशेष -
या मंत्रात श्लेष व परिकर अलंकार आहेत. ।। ७।।