Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 342
ऋषिः - मधुच्छन्दा वैश्वामित्रः
देवता - इन्द्रः
छन्दः - अनुष्टुप्
स्वरः - गान्धारः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1
गा꣡य꣢न्ति त्वा गाय꣣त्रि꣡णोऽर्च꣢꣯न्त्य꣣र्क꣢म꣣र्कि꣡णः꣢ । ब्र꣣ह्मा꣡ण꣢स्त्वा शतक्रत꣣ उ꣢द्व꣣ꣳश꣡मि꣢व येमिरे ॥३४२॥
स्वर सहित पद पाठगा꣡य꣢꣯न्ति । त्वा꣣ । गायत्रि꣡णः꣢ । अ꣡र्च꣢꣯न्ति । अ꣣र्क꣢म् । अ꣣र्कि꣡णः꣢ । ब्र꣣ह्मा꣡णः꣢ । त्वा꣣ । शतक्रतो । शत । क्रतो । उ꣢त् । वँ꣣श꣢म् । इ꣣व । येमिरे ॥३४२॥
स्वर रहित मन्त्र
गायन्ति त्वा गायत्रिणोऽर्चन्त्यर्कमर्किणः । ब्रह्माणस्त्वा शतक्रत उद्वꣳशमिव येमिरे ॥३४२॥
स्वर रहित पद पाठ
गायन्ति । त्वा । गायत्रिणः । अर्चन्ति । अर्कम् । अर्किणः । ब्रह्माणः । त्वा । शतक्रतो । शत । क्रतो । उत् । वँशम् । इव । येमिरे ॥३४२॥
सामवेद - मन्त्र संख्या : 342
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 12;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 12;
Acknowledgment
विषय - इंद्राचे महिमा गान सर्वजण करतात.
शब्दार्थ -
(शतक्रतो) अतीव बुदधिमान आणि अनेक कर्मे करणाऱ्या, हे परमैश्वर्यवान परमेश्वरा, (गायत्रिणः) सामगान करणारे गायक अथवा यज्ञाचे उद्गाता नामक ऋत्विज् (त्वा) तुझे (गायन्ति) स्तुतिगान करतात. (अर्किणः) वेदमंत्राचा अध्ययन करणारे विद्वान वा पूजक अथवा अध्वर्यू नाम ऋत्विज् (त्वा) तुझी (अर्चन्ति) अर्चना करतात. (ब्राह्मणाः) ब्रह्मोपासक ब्राह्मण अथवा यज्ञाचे ब्रह्मा नाम ऋत्विज् (त्वा) तुला (वंशम् इव) थ्वजदंडाप्रमाणे (उद्ये मिरे) उंच ठेवतात (तुला सर्वोच्च मानतात) म्हणजे जसे पताकाधारी माणसे पठाकेची काठी उंच धरून ध्वज आकाशात फडकावतात. तद्वत ब्राह्मणजन आणि यज्ञाचे ब्रह्माजन सर्वत्र तुझ्या कीर्तीचा प्रसार करतात. ।। १।।
भावार्थ - मनुष्यांनी वेदांचे सांगोपांग अध्ययन, यज्ञादीमध्ये मंत्रोच्चारण आणि सामगान करीत परमेश्वराच्या महिमेचा सर्वत्र प्रचार- प्रसार करावा. जसे आकाशात उंच फडकणारी ध्वजा, वायूद्वारे आणखी वेगाने फडकते. तद्वत परमेश्वराच्या महिमेचा सर्वत्र विस्तार व्हायला हवा. ।। १।।
विशेष -
या मंत्रात उपमा अलंकार आहे. ङ्गगाय, गायफमध्ये यमक असून द्वितीय पदामध्ये अनुप्रास आहे. ।। १।।