Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 343
ऋषिः - जेता माधुच्छन्दसः देवता - इन्द्रः छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

इ꣢न्द्रं꣣ वि꣡श्वा꣢ अवीवृधन्त्समु꣣द्र꣡व्य꣢चसं꣣ गि꣡रः꣢ । र꣣थी꣡त꣢मꣳ र꣣थी꣢नां꣣ वा꣡जा꣢ना꣣ꣳ स꣡त्प꣢तिं꣣ प꣡ति꣢म् ॥३४३॥

स्वर सहित पद पाठ

इ꣡न्द्र꣢꣯म् । वि꣡श्वाः꣢ । अ꣣वीवृधन् । समुद्र꣡व्य꣢चसम् । स꣣मुद्र꣢ । व्य꣣चसम् । गि꣡रः꣢꣯ । र꣣थी꣡त꣢मम् । र꣣थी꣡नाम् । वा꣡जा꣢꣯नाम् । स꣡त्प꣢꣯तिम् । सत् । प꣣तिम् । प꣡ति꣢꣯म् ॥३४३॥


स्वर रहित मन्त्र

इन्द्रं विश्वा अवीवृधन्त्समुद्रव्यचसं गिरः । रथीतमꣳ रथीनां वाजानाꣳ सत्पतिं पतिम् ॥३४३॥


स्वर रहित पद पाठ

इन्द्रम् । विश्वाः । अवीवृधन् । समुद्रव्यचसम् । समुद्र । व्यचसम् । गिरः । रथीतमम् । रथीनाम् । वाजानाम् । सत्पतिम् । सत् । पतिम् । पतिम् ॥३४३॥

सामवेद - मन्त्र संख्या : 343
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 12;
Acknowledgment

शब्दार्थ -
( प्रथम अर्थ) (परमात्मपर अर्थ) - (विश्वाः) (आम्हा उपासकजनांची सर्व (गिरः) वाणी अथवा वेदवाणी (समुद्रव्य चसम्) सागर आणि अंतरिक्षाप्रमाणए सर्वत्र व्याप्त असणाऱ्या (रथीनान्) (रथीतमम्) रथीजनाला जसा महारथी,, तसा जो सर्वांहून श्रेष्ठ जग-संचालक, पृथ्वी, सूर्य, चंद्र आदी रथसदृश लोकांचा जो सर्वोच्च स्वामी आहे, (वाजानाम्) सर्व बळांचा जो (पतिम्) अधीश्वर आहे आणि (सत्पतिम्) सज्जनांचा, सद्गुणांचा आणि सदाचाराचा जो रक्षक आहे, अशा (इन्द्रम्) परमैश्वर्यवान परमात्म्याचा (अवीवृधन्) आम्ही वर्धन म्हणजे त्याचे महिमागान करून त्याच्या महिमेचा प्रचार- प्रसार करावा. (अवश्य केला पाहिजे.)।। द्वितीय अर्थ - (राजापर अर्थ) - (विश्वाः) सर्व (गिरः) राष्ट्रवासी प्रजाजनांची वाणी (समुद्रव्यचसम्) जलपोतांद्वारे जो सागरावर आणि विमानांद्वारे जो आकाशात व्याप्त आहे, त्या (रथीनाम्) यानांचे जितके स्वामी आहेत, त्या सर्वांपेक्षा (रथीतमम्) अधिक संख्येत भूमान, जलयान व अंतरिक्षयान जवळ बाळगून आहे आणि जो (वाजामाम्) दैहिक, मानसिक आणि आत्मिक शक्तीचा जो स्वामी आहे व अन्न-धान्य, युद्ध आदींचा जो अधीश्वर आहे, जो (सत्यतिम्) सज्जनांचा व सत्कर्मांचा रक्षक आहे, अशा त्या (इंद्रम्) शत्रुविदारक आणि सुखप्रदायक राजाला आम्हाला प्रजाजनांनी सदैव (अवीवृधन्) वाढवावे, त्याला प्रोत्साहन द्यावे. ।। २।।

भावार्थ - सर्व वेदवाणी आणि स्तोताजनांची वाणी परमेश्वराची महिमा गाते त्याचप्रकारे राष्ट्रात सर्व प्रजाजनांनी प्रजावत्सल राजाचे महिमा गान अवश्य करावे. ।। २।।

इस भाष्य को एडिट करें
Top