Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 345
ऋषिः - अत्रिर्भौमः देवता - इन्द्रः छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

य꣡दि꣢न्द्र चित्र म इ꣣ह꣢꣫ नास्ति꣣ त्वा꣡दा꣢तमद्रिवः । रा꣡ध꣣स्त꣡न्नो꣢ विदद्वस उभयाह꣣स्त्या꣡ भ꣢र ॥३४५॥

स्वर सहित पद पाठ

य꣢त् । इ꣣न्द्र । चित्र । मे । इह꣢ । न । अ꣡स्ति꣢ । त्वा꣡दा꣢꣯तम् । त्वा । दा꣣तम् । अद्रिवः । अ । द्रिवः । रा꣡धः꣢꣯ । तत् । नः꣣ । विदद्वसो । विदत् । वसो । उभयाहस्ति꣢ । आ । भ꣣र ॥३४५॥


स्वर रहित मन्त्र

यदिन्द्र चित्र म इह नास्ति त्वादातमद्रिवः । राधस्तन्नो विदद्वस उभयाहस्त्या भर ॥३४५॥


स्वर रहित पद पाठ

यत् । इन्द्र । चित्र । मे । इह । न । अस्ति । त्वादातम् । त्वा । दातम् । अद्रिवः । अ । द्रिवः । राधः । तत् । नः । विदद्वसो । विदत् । वसो । उभयाहस्ति । आ । भर ॥३४५॥

सामवेद - मन्त्र संख्या : 345
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 12;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (परमात्मपर) - हे (चित्र) अद्भुत गुण-कर्म- स्वभाव असणाऱ्या (अद्रिवः) वज्रधारीप्रमाणे दुष्कर्माचा दंड देणाऱ्या (इंद्र) जगदीश्वरा, (यत्) जे आध्यात्मिक व भौतिक धन आमच्या कर्मांच्या, परिणाकामुळे अथवा आमच्या पौरुषहीनत्वामुळे (त्वादातम्) तू थांबवून वा ऐकून ठेवले आहेस व त्यामुळे ते धन आम्हाला (इह) इथे (नास्ति) मिळत नाही आहे, (तत्) (राघः) ते धन हे (विद्वद्वसो) त्या धनाच्या ज्ञान व प्राप्तीविषयी जाणणाऱ्या हे परमेश्वरा, तू (उभयाहस्ति) दोन्ही हातामध्ये भरून मला (आ भर) प्रदान कर.।। येथे निराकार परमेश्वराविषयी दोन्ही हातांनी दान करण्याबद्दल जे विधान केले आहे, ते दानाचे प्राचुर्य दाखविण्यासाठी असून लाक्षणिक प्रयोग जाणावा.।। द्वितीय अर्थ - (राजा- प्रजापर अर्थ) - दुष्काळ, रोगराई वा पूर यासारख्या नैसर्गिक संकटांच्या वेली प्रजा आपल्या राजाला विनंती करीत आहे - हे (चित्रः अद्भुत दावी, (अद्रिवः) मेघ व सूर्य यांच्याप्रमाणे राष्ट्रात धनाची वृष्टी करणारे हे (इंद्र) विपत्तिनाशक राजा, (त्वादातम्) तुम्ही (यत्) जे धन (मे) मला (इह) या संकटप्रसंगी द्यायला हवे व जे आतापर्यंत (नास्ति) मला मिळत नाहीये, (तत्) (राधः) ते धन (ती शासकीय मदत) हे (विद्वद्वसो) धन-संचय करणारे राजा, (उभयाहस्ति) आता दोन्ही हातांनी भरभरून (आ भर) मला द्या. मी एक संकटग्रस्त माणूस असून मला मदत करा. ।। ४।।

भावार्थ - आध्यात्मिक धनाने वंचित आणि ऐहिक धन जवळ नसलेले लोक जेव्हा पुरुषार्थ- परिश्रम करीत जर परमेश्वराजवळ याचना करतील, तर त्याच्या कृपेने त्यांच्यावर धनाची वृष्टी अवश्य होते. तसेच राजाचेही कर्तव्य आहे, की त्याने संकटग्रस्त प्रजेची रक्षणासाठी पुष्कळ धन उपलब्ध करावे व प्रजेला सर्वतोपरी साह्य करावे. ।। ४।।

इस भाष्य को एडिट करें
Top