Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 344
ऋषिः - गोतमो राहूगणः देवता - इन्द्रः छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

इ꣣म꣡मि꣢न्द्र सु꣣तं꣡ पि꣢ब꣣ ज्ये꣢ष्ठ꣣म꣡म꣢र्त्यं꣣ म꣡द꣢म् । शु꣣क्र꣡स्य꣢ त्वा꣣꣬भ्य꣢꣯क्षर꣣न्धा꣡रा꣢ ऋ꣣त꣢स्य꣣ सा꣡द꣢ने ॥३४४॥

स्वर सहित पद पाठ

इ꣣म꣢म् । इ꣣न्द्र । सुत꣢म् । पि꣣ब । ज्ये꣡ष्ठ꣢꣯म् । अ꣡म꣢꣯र्त्यम् । अ । म꣣र्त्यम् । म꣡द꣢꣯म् । शु꣣क्र꣡स्य꣢ । त्वा꣣ । अभि꣢ । अ꣣क्षरन् । धा꣡राः꣢꣯ । ऋ꣣त꣡स्य꣢ । सा꣡द꣢꣯ने ॥३४४॥


स्वर रहित मन्त्र

इममिन्द्र सुतं पिब ज्येष्ठममर्त्यं मदम् । शुक्रस्य त्वाभ्यक्षरन्धारा ऋतस्य सादने ॥३४४॥


स्वर रहित पद पाठ

इमम् । इन्द्र । सुतम् । पिब । ज्येष्ठम् । अमर्त्यम् । अ । मर्त्यम् । मदम् । शुक्रस्य । त्वा । अभि । अक्षरन् । धाराः । ऋतस्य । सादने ॥३४४॥

सामवेद - मन्त्र संख्या : 344
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 12;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (परमात्मपर अर्थ) (इंद्र) अध्यात्म- संपदेचे दाता परमैश्वर्यवान हे परमेश्वर, तुम्ही (इमम्) या (ज्येष्ठम्) अत्यंत प्रशंसनीय (अमर्त्यम्) दिव्य (मदम्) स्तोताजनाला आनंद देणाऱ्या (सुतम्) अशा आम्ही तयार केलेल्या सोमरसाचे (पिब) पान करा (प्या) (ऋतस्य) या ध्यान-यज्ञाचे जे (सादने) साधन आहे, अशा या हृदयात (शुक्रस्य) उत्थित झालेल्या पवित्र श्रद्धारसाच्या (धाराः) धारा (त्वा अभि) तुमच्या व दिशेने (अक्षरन्) वाहत आहेत.।। द्वितीय अर्थ - (गुरु-शिष्यपर अर्थ) आचार्य शिष्याला म्हणत आहेत - हे (इंद्र) जिज्ञासू आणि विद्युतप्रमाणे तीव्र बुद्धी असणाऱ्या माझ्या शिष्या, तू (इदम्) हा (ज्येष्ठम्) मी देत असलेला श्रेष्ठ आणि (अमर्त्यम्) चिरस्थायी (मदम्) समाधान देणारा हा रस, की जो मी (सुतम्) तुझ्यासाठी अध्ययन- अध्यापन पद्धतीने तयार केला आहे, तो रस तू (पिब) पी. (शुक्रस्य) या पवित्र आणि (ऋठस्य) अध्ययन- अध्यापन यज्ञाच्या (सादने) गृहामध्ये म्हणजे गुरुकुलात (धाराः) माझ्या वाणी-धारा (त्वा अभि) तुला (अक्षरत्) सिंचित करीत आहेत. (त्याचा तू लाभ घे.)।। ३।।

भावार्थ - सर्व मनुष्यांनी दुःखविदारक, आनंद-सिंधू परमेश्वराप्रत श्रद्धाभाव आपल्या हृदयात धारण करून त्याची उपासना केली पाहिजे. तसेच गुरुजनांनी शिष्यांना प्रेमाने व उत्तम शिक्षण पद्धतीने शिकविले पाहिजे.।। ३।।

इस भाष्य को एडिट करें
Top