Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 347
ऋषिः - गोतमो राहूगणः देवता - इन्द्रः छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

अ꣡सा꣢वि꣣ सो꣡म꣢ इन्द्र ते꣣ श꣡वि꣢ष्ठ धृष्ण꣣वा꣡ ग꣢हि । आ꣡ त्वा꣢ पृणक्त्विन्द्रि꣣य꣢꣫ꣳ रजः꣣ सू꣢र्यो꣣ न꣢ र꣣श्मि꣡भिः꣢ ॥३४७॥

स्वर सहित पद पाठ

अ꣡सा꣢꣯वि । सो꣡मः꣢꣯ । इ꣣न्द्र । ते । श꣡वि꣢꣯ष्ठ । धृ꣣ष्णो । आ꣢ । ग꣣हि । आ꣢ । त्वा꣣ । पृणक्तु । इन्द्रिय꣢म् । र꣡जः꣢꣯ । सू꣡र्यः꣢꣯ । न । र꣣श्मि꣡भिः꣢ ॥३४७॥


स्वर रहित मन्त्र

असावि सोम इन्द्र ते शविष्ठ धृष्णवा गहि । आ त्वा पृणक्त्विन्द्रियꣳ रजः सूर्यो न रश्मिभिः ॥३४७॥


स्वर रहित पद पाठ

असावि । सोमः । इन्द्र । ते । शविष्ठ । धृष्णो । आ । गहि । आ । त्वा । पृणक्तु । इन्द्रियम् । रजः । सूर्यः । न । रश्मिभिः ॥३४७॥

सामवेद - मन्त्र संख्या : 347
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 12;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (जीवात्मापर अर्थ) - (इंद्र) हे माझ्या जीवात्मा, (ते) तुझ्यासाठी मी (एक साधक) (सोमः) ज्ञान, उत्साह आदी सद्भावनांचा रस (असावि) गाळून तयार केला आहे. (ज्ञानप्राप्तीसाठी मनोभूमी तयार केली आहे.) (धृष्णो) काम आदी शत्रूंना पराभूत करणाऱ्या हे (शविष्ठ) बलवान आत्मा, तू (आ गहि) रसपानासाठी ये म्हणजे तत्पर हो. (इन्द्रियम्) ज्ञानप्राप्तीची साधने, माझी चक्षु, मन आदी इंद्रिये (रश्मिभिः) ज्ञानाच्या प्रकाशाने (त्वा) तुला (आ पृणक्तु) भरपूर तृप्त करोत. (सूर्यः) सूर्य (ब) (न) जसा आपल्या (रश्मिभिः) किरणांनी (रजः) पृथ्वी, अंतरिक्ष आदी लोक व्याप्त वा परिपूर्ण करतो. तद्वत इंद्रिये तुला परिप्लुत करो.।। अथवा सोम एवं इन्द्रिय शब्दांनी दुसरा अर्थही निघत आहे. योगर्दनामध्ये सोम म्हणजे अध्यात्म प्रसाद म्हटले आहे. इंद्रिय म्हणजे अध्यात्म प्रसादाने उत्पन्न (योगदर्शन १/४८) ऋतम्भरा प्रज्ञा. या दृष्टीने अर्थ होतो - ती प्रज्ञा तुला (आत्म्याला) रश्मीद्वारे म्हणजे निर्वीज समाधीच्या प्रकाशाने परिपूर्ण करो.।। द्वितीय अर्थ - (सेवाध्यक्ष वा वीर पुरुषपर अर्थ) - हे (इंद्र) वीर नरपुंगव सेनाध्यक्ष, (ते) तुझ्या सेवनासाठी आम्ही प्रजाजनांनी (सोमः) सोम आदी औषधींचा रस (असावि) गाळला आहे. ते पिण्यासाठी हे (शविष्ठ) बलिष्ठ व (धृष्णो) हे शत्रुघर्षक वीर, तू (आ गहि) ये. (इन्द्रयम्) मनरूप आंतरिक इन्द्रियाने (त्वा) तुला (रश्मिभिः) उत्साहाच्या किरणांनी (पृणक्तु) भरून टाकावे. जसा सूर्य किरणांनी भूमंडळास व्याप्त करतो.।। ६।।

भावार्थ - सर्वांनी स्वतःच्या आत्म्याला उद्बोधन देऊन ज्ञान, कर्म, योगसिद्दी आदींचा संचय करावा. त्याचप्रकारे राष्ट्राच्या कर्णधार सैन्य प्रमुखाने वीरत्वाचा संचय करून राष्ट्र रक्षण केले पाहिजे.।। ६।।

इस भाष्य को एडिट करें
Top