Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 368
ऋषिः - त्रित आप्त्यः देवता - विश्वेदेवाः छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

अ꣣मी꣡ ये दे꣢꣯वा꣣ स्थ꣢न꣣ म꣢ध्य꣣ आ꣡ रो꣢च꣣ने꣢ दि꣣वः꣢ । क꣡द्ध꣢ ऋ꣣तं꣢꣫ कद꣣मृ꣢तं꣣ का꣢ प्र꣣त्ना꣢ व꣣ आ꣡हु꣢तिः ॥३६८॥

स्वर सहित पद पाठ

अ꣣मी꣡इति꣢ । ये दे꣣वाः । स्थ꣡न꣢꣯ । स्थ । न꣣ । म꣡ध्ये꣢꣯ । आ । रो꣣चने꣢ । दि꣣वः꣢ । कत् । वः꣣ । ऋत꣢म् । कत् । अ꣣मृ꣡त꣢म् । अ꣣ । मृ꣡त꣢꣯म् । का꣢ । प्र꣣त्ना꣢ । वः꣢ । आ꣡हु꣢꣯तिः । आ । हु꣣तिः ॥३६८॥


स्वर रहित मन्त्र

अमी ये देवा स्थन मध्य आ रोचने दिवः । कद्ध ऋतं कदमृतं का प्रत्ना व आहुतिः ॥३६८॥


स्वर रहित पद पाठ

अमीइति । ये देवाः । स्थन । स्थ । न । मध्ये । आ । रोचने । दिवः । कत् । वः । ऋतम् । कत् । अमृतम् । अ । मृतम् । का । प्रत्ना । वः । आहुतिः । आ । हुतिः ॥३६८॥

सामवेद - मन्त्र संख्या : 368
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 2;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (देवाः) आपापल्या विषयांचे (रस, रूप, स्पर्श आदींचे) प्रकाशक हे ज्ञानेंद्रियरूप देवगणहो, (अमी) (ये) हे जे तुम्ही (दिवः) उर्ध्वस्थान शिराच्या (मध्ये) मध्ये (रोचमाने)ररोचमान आपल्या आपल्या स्थानात (जिव्हा, नेत्र, त्या आदीमध्ये) (आ स्थन) स्थित झालेले आहात अथवा हे (देवाः) प्रकाशक सूर्यकिरणे, (अमी) (ये) हे जे तुम्ही (दिवः) द्यूलोकाच्या (मध्ये) मधे (रोचने) दीप्तीमा सूर्यात (आ स्थन) येऊन स्थित झालेली आहात, अथवा (देवाः) ज्ञान- प्रकाशाने दीप्त वा ज्ञानाचे प्रकाशक हे विद्वज्जनहो, (अमी) (ये) हे जे तुम्ही (दिवः) कीर्तिमान राष्ट्रा (मध्ये) मधे (रोचने) यशस्वी अधिकार पदावर (आ स्थन) नेमले गेले आहात. त्यामुळे मी तुम्हाला विचारू इच्छितो की (वः) तुमचे (ऋतम्) सत्य (कत्) काय आहे (त्याचे खरे स्वरूप कसे आहे) (कत्) (अमृतम्) त्यातील अमरतत्त्व काय आहे आणि (वः) तुमची (प्रत्ना) पुरातन (आहुतिः) होमक्रिया काय व कशी आहे ? ।। ९।।

भावार्थ - या ठिकाणी केवळ प्रश्न विचारले असून उत्तरे सांगितली नाहीत. उत्तरे तुम्ही वाचकांनी स्वतः आपल्या बुद्धी कौशल्याने द्यावीत, असे अपेक्षिले आहे. प्रश्नांची उत्तरे या स्वरूपात असू शकतात. मस्तकामध्ये जे ज्ञानेन्द्रिय रूप देव आहेत, त्याचे ऋत आहे. जीवात्म्यापर्यंत खरे ज्ञान पोचविणे, त्यांचे अमृत आहे. वास्तविक इन्द्रिय तत्त्व, जे देहासह इन्द्रिय गोलक नष्ट झाल्यानंतरदेखील मरत नाही, तर सूक्ष्म शरीराच्या रूपाने विद्यमान असते. त्या तत्त्वांची सनातन आहुती आहे. शरीर रक्षारूप यज्ञामध्ये व ज्ञान प्रदानरूप यज्ञामध्ये स्वतःला आहुत वा होम करणे. याचप्रमाणे द्युलोकात स्थित सूर्यात जे किरणरूप देव गण आहेत, त्यांचे ऋत आहे. ते सत्यनियम की ज्यांच्या प्रभावाने ती किरणे सूर्योदयासह आकाशात व भूमंडळात व्याप्त होतात आणि त्यांचे अमृत आहे, ते शुद्ध मेघजल, ज्याला ते समुद्र, सरोवर आदींपासून ग्रहण करून बाष्प रूपाने वर घेऊन जातात व त्यांची सनातन आहुती आहे. मेघजलाला भौतिक अग्नीमध्ये होम करणे की ज्यामुळे औषधी, वनस्पती आदी उगवतात आणि प्राणी जीवन प्राप्त करतात अथवा ती किरणे सर्व ग्रह - उपग्रहात स्वतःला आहुत करतात की ज्यामुळे पृथ्वी, मंगल, बुध, चंद्र आदी प्रकाशित होतात. याच प्रकारे राष्ट्रात विद्या - दान करणारे विद्वज्जन देवगण आहेत. त्यांचे ऋत आहे ती सत्याविष्ठा ज्यांचे अनुसरण करीत ते विद्यादानात दत्तचित्त असतात. त्यांचे अमृत आहे ते ज्ञान की जे ते सत्यात्रांना देतात आणि त्यांची सनातन आहुती आहे. अध्ययन - अध्यापवरूप यज्ञात स्वतःला होम करणे वा समर्पित करणे, अशा प्रकारे या मंत्राच्या अर्थावर विचार करताना सुधीजनांची स्वतःदेखील वेगळी कल्पना करता येते वा करावी.।। ९।। या ऋचेचा ऋषी आप्त असून त्याचा पुत्र आहे त्रित आणि मंत्र देवता आहे ‘विश्वेदेवाः’ हे पाहून विवरणकार माधव याने खालीलप्रमाणे इतिहास लिहून टाकला आहे - ‘‘आप्त नावाच्या ऋषीचे तीन पुत्र होत. शकत, द्वित व त्रित. त्यांनी यज्ञ करण्यासाठी यजमानांकडून गायींची मागणी केली व यजमानांनी काही गायी त्यांना दिल्या. ते तिघे जण सर्व गायींसोबत घेऊन घराकडे निघाले. ते जेव्हा सरस्वती नदीच्या एका तीरावरून जात होते तेव्हा दुसऱ्या तीरावर बसलेल्या गवादकाने त्यांना पाहिले. तो उठला व सरस्वती पार करून तो अलीकडील तटावर आला. येऊन रात्रीच्या अंधारात त्याने त्या तिघा ऋषी पुत्रांना भयभीत केले. ते तिधे जण भिऊन पळाले, तेव्हा त्यापैकी त्रित हा गवत काड्यांनी व वेलीनी व्यापलेल्या एका जलविहीन विहिरीत पडला. तो विहिरीत पडला. या पडण्याच्या प्रसंगाने कारण काही अन्य लेखक वेगळेच सांगतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एकत व द्वित यांना संख्येने कमी गायी मिळाल्या होत्या. त्रितला अधिक गायी मिळाल्या होत्या, म्हणून त्या दोघा भावांनी त्रितला हेतुःपुरस्सर विहिरीत ढकलले. विहिरीतच त्रितने विचार केला की मी यज्ञ करण्याचा संकल्प केला होता. आता जर मी यज्ञ न करताच मेलो, तर माझे अमंगल होईल. म्हणून काही तरी असा उपाय केला पाहिजे की ज्यायोगे मी विहिरीत राहूनच सोम- पान करू शकेन. असा विचार मनात येताच त्याच्या लक्षात आले की एक वेल विहिरीच्या भिंतीत वरून उतरलेला आहे. त्याने वेल तोडली व ही लता म्हणजे सोम-लता आहे, असा निश्चय करून आणि मनातल्या मनात यज्ञाच्या इतर साधनांची कल्पना करीत विहिरीच्या दगड - गोट्यांच्या खलबत्त्याप्रमाणे वापर करून लता कुटली व त्याचा रस सिद्ध करून देवांना आवाहन केले. देवांना आवाहनाचे कारण कळेना, म्हणून ते उद्विग्न झाले. त्रितचे आवाहन बृहस्पतीनेही ऐकले. तो देवांना म्हणाला की त्रितमे यज्ञ केला आहे. आपण तिथे जाऊ या. मग सर्व देवगण तिथे गेले. त्यांना आलेले पाहून आपल्या उद्धाराची अपेक्ष बाळगणाऱ्या त्रितने त्यांची स्तुती केली व तो देवांना दोष देऊ लागला. म्हणाला की अवश्यमेव तुमचा विवेक नष्ट झाला आहे. तुम्ही सर्व अकृतज्ञ आहात. कारण मला विहिरीबाहेर काढत नाही. त्रितने केलेल्या देवनिंदेचे वर्णनच या ऋचेत केले आहे. आदी आदी.’’ हे सर्व वर्णन केवळ कल्पना - कलेचा विलास असून यात सत्याचा लवलेशही नाही, हे सुधीजन स्वतः समजू शकतात.।।

इस भाष्य को एडिट करें
Top