Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 369
ऋषिः - वामदेवो गौतमः देवता - इन्द्रः छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

ऋ꣢च꣣ꣳ सा꣡म꣢ यजामहे꣣ या꣢भ्यां꣣ क꣡र्मा꣢णि कृ꣣ण्व꣡ते꣢ । वि꣡ ते सद꣢꣯सि राजतो य꣣ज्ञं꣢ दे꣣वे꣡षु꣢ वक्षतः ॥३६९॥

स्वर सहित पद पाठ

ऋ꣡च꣢꣯म् । सा꣡म꣢꣯ । य꣣जामहे । या꣡भ्या꣢꣯म् । क꣡र्मा꣢꣯णि । कृ꣣ण्व꣡ते꣢ । वि । ते꣡इति꣢ । स꣡द꣢꣯सि । रा꣣जतः । यज्ञ꣢म् । दे꣣वे꣡षु꣢ । व꣣क्षतः ॥३६९॥


स्वर रहित मन्त्र

ऋचꣳ साम यजामहे याभ्यां कर्माणि कृण्वते । वि ते सदसि राजतो यज्ञं देवेषु वक्षतः ॥३६९॥


स्वर रहित पद पाठ

ऋचम् । साम । यजामहे । याभ्याम् । कर्माणि । कृण्वते । वि । तेइति । सदसि । राजतः । यज्ञम् । देवेषु । वक्षतः ॥३६९॥

सामवेद - मन्त्र संख्या : 369
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 2;
Acknowledgment

शब्दार्थ -
(वेदाध्यायी जन) (ऋचम्) ऋग्वेदाचे आणि (साम) सामवेदाचे (यजामहे) अर्थज्ञानासह आणि गीतिज्ञानासह अध्ययन करतो तसेच अध्यायनही करतो. (वाभ्यम्) ज्यांच्याप्रमाणे म्हणजे ज्या वेदांचे अध्ययन व अध्यापन करून वेदपाठीजन (कर्माणि) वेदात सांगितल्याप्रमाणे कर्म (कृण्वते) करतात. (ते) ते ऋग्वेद व सामवेद (सदसि) निवासगृहात व सभागृहात (राजतः) शोभित होतात. कारण तिथे त्यांचा पाठ केला जातो, गान केले जाते आणि ते (देवेषु) विद्वज्जनांना (यज्ञम्) यज्ञाचे महत्त्व (वक्षतः) प्राप्त करून देतात. ।। १०।।

भावार्थ - आम्ही सर्व सद्गृहस्थांनी घरात, सभेत वा विविध समारंभात ऋग्वेद, सामवेद, सामयोनि, ऋचा, ऋचेचे केलेले सुस्वर गायन अवश्य केले पाहिजे. या विद्या व कलाने अर्थज्ञान वा प्रक्रिया सुयोग्य गुरूकडून अर्थज्ञानपूर्वक शिकली पाहिजे तसेच सस्वर वेदपाठ व सामगान घरी, सभेत वा विशिष्ट अवसरांवर केले पाहिजे.।। १०।। या दशतीमध्ये इंद्र आणि कश्यप नावाने इंद्राचे स्मरम, त्याच्या अर्चनासाठी प्रेरणा, त्याच्या ध्यानाचे फल, त्याच्याकडून दान मिळण्याची याचना, दिव्य उषेचा प्रादुर्भाव या विषयांचे वर्णन आणि ऋक् व साम यांच्या अध्ययन- अध्यापनाचा संकल्प, हे सर्व विषय आहेत. करिता या दशतीतील विषयांची संगती मागील दशतीच्या विषयांशी आहे, हे जाणावे.।। चतुर्थ प्रपाठकातील द्वितीय अर्धाची तृतीय दशति समाप्त. चतुर्थ अध्यायाचा द्वितीय खंड समाप्त.

इस भाष्य को एडिट करें
Top