Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 395
ऋषिः - इरिम्बिठिः काण्वः देवता - आदित्याः छन्दः - उष्णिक् स्वरः - ऋषभः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

तु꣣चे꣡ तुना꣢꣯य꣣ त꣢꣫त्सु नो꣣ द्रा꣡घी꣢य꣣ आ꣡यु꣢र्जी꣣व꣡से꣢ । आ꣡दि꣢त्यासः समहसः कृ꣣णो꣡त꣢न ॥३९५॥

स्वर सहित पद पाठ

तु꣣चे꣢ । तु꣡ना꣢꣯य । तत् । सु । नः꣣ । द्रा꣡घी꣢꣯यः । आ꣡युः꣢꣯ । जी꣣व꣡से꣢ । आ꣡दि꣢꣯त्यासः । आ । दि꣣त्यासः । समहसः । स । महसः कृणो꣡त꣢न । कृ꣣णो꣡त꣢ । न꣣ ॥३९५॥


स्वर रहित मन्त्र

तुचे तुनाय तत्सु नो द्राघीय आयुर्जीवसे । आदित्यासः समहसः कृणोतन ॥३९५॥


स्वर रहित पद पाठ

तुचे । तुनाय । तत् । सु । नः । द्राघीयः । आयुः । जीवसे । आदित्यासः । आ । दित्यासः । समहसः । स । महसः कृणोतन । कृणोत । न ॥३९५॥

सामवेद - मन्त्र संख्या : 395
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 5;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (समहसः) तेजस्वी (आदित्यासः) आदित्याप्रमाणे ज्ञान- प३काशाने भासमान ब्रह्मवित् ब्राह्मणहो, अथवा हे माझ्या प्राणांनो, तुम्ही(तुचे) संतती प्राप्तीसाठी (तुनाम) धनासाठी आणि (जीवसे) उत्तम, दीर्घ आयुष्यासाठी (त्) त्या, इतर प्राण्यांपेक्षा वेगळी असलेल्या अशा (नः आयुः) आमच्या आयुष्याला (द्राघीयः) अधिक दीर्घ (सु कृणोतन) सुंदर सुरू करा.।। संतती दोन प्रकारची असते - भौतिक संतान आणि मानस संतान. पुत्र, पुत्री आदी भौतिक संताने आणि नवीन ज्ञान - विज्ञान आदींना मानसिक संतान म्हणतात. धनदेखील दोन प्रकारचे सते. भौतिक आणि आध्यात्मिक चांदी, सोने, कापड, धान्य, नाणी आदी भौतिक धन असून अहिंसा, सत्य, न्याय, योगसिद्धी आदींना आध्यात्मिक धन म्हटले जाते. उत्कृष्ट जीवनदेखील दोन प्रकारचे सते. बाह्य आणि आध्यात्मितक. भौतिक सुख- संपदेने परिपूर्ण जीवनाला बाह्य जीवन मानावे व अध्यात्म- मार्गाचा जो यात्री त्याच्या जीवनाला आध्यात्मिक जीवन समजावे. हे सर्व आम्हांकरिता सुलभ व्हावे, म्हणून दीर्घ जीवनासाठी प्रार्थना केली आहे.।। ५।।

भावार्थ - प्राणायामाने आणि विद्वान ब्राह्मणांनी केलेल्या उपदेशाचे पालन केल्यामुळे आमचे आयुष्य दीर्घ होऊ शकते. दीर्घायू प्राप्त करून आम्ही आपल्या आवडीप्रमाणे प्रेय मार्ग वा श्रेय मार्ग अनुसरावा.।। ५।।

इस भाष्य को एडिट करें
Top