Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 403
ऋषिः - सौभरि: काण्व: देवता - इन्द्रः छन्दः - ककुप् स्वरः - ऋषभः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

त्व꣡या꣢ ह स्विद्यु꣣जा꣢ व꣣यं꣡ प्रति꣢꣯ श्व꣣स꣡न्तं꣢ वृषभ ब्रुवीमहि । स꣣ꣳस्थे꣡ जन꣢꣯स्य꣣ गो꣡म꣢तः ॥४०३॥

स्वर सहित पद पाठ

त्व꣡या꣢꣯ । ह꣣ । स्वित् । युजा꣢ । व꣣य꣢म् । प्र꣡ति꣢꣯ । श्व꣣स꣡न्त꣢म् । वृ꣣षभ । ब्रुवीमहि । सँस्थे꣢ । स꣣म् । स्थे꣢ । ज꣡न꣢꣯स्य । गो꣡म꣢꣯तः ॥४०३॥


स्वर रहित मन्त्र

त्वया ह स्विद्युजा वयं प्रति श्वसन्तं वृषभ ब्रुवीमहि । सꣳस्थे जनस्य गोमतः ॥४०३॥


स्वर रहित पद पाठ

त्वया । ह । स्वित् । युजा । वयम् । प्रति । श्वसन्तम् । वृषभ । ब्रुवीमहि । सँस्थे । सम् । स्थे । जनस्य । गोमतः ॥४०३॥

सामवेद - मन्त्र संख्या : 403
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 6;
Acknowledgment

शब्दार्थ -
हे (वृषभ) मनोरथ पूर्ण करणाऱ्या परमेश्वरा, (गोमतः) (जनस्य) ज्ञान- किरणे वा अध्यात्म किरणांनी युक्त आत्म्याद्वारे केल्या जाणाऱ्या या (संस्थे) उपासना- यज्ञात अथवा हृदयातील देवासुर- संग्रामात (श्वसन्तम्) आमची हिंसा करण्यासाठी तत्पर अशा व्याधी, स्त्यान, संश, प्रमाद, आलस्य आदींचा तसेच दुःख, दौर्मनस्य आदी विघ्न समूहांचा (त्वया) (ह) (स्वित्) तुझ्यासारख्या सहाय्यकाच्या मदतीने आम्ही (उपासका गण) (प्रति ब्रीवीमहि) प्रतिकार करू.।। या मंत्राचा राजापर अर्थही करावा. अर्थ असा सावी की गोपालक प्रजाजनांच्या गायी चोरण्याचा जर कोणी यत्न केला, तर राजाकडून मदत घेऊन गोपालकांनी चोरांचा प्रतिकार केला पाहिजे.।। ५।।

भावार्थ - आध्यात्मिक आंतरिक प्रकाशाला जो दोषादी समूह पुनः मोहान्घकारात ढकलू इच्छितात, त्या काम - क्रोधादी दोषांना उपासकाने परमेश्वराने दिलेल्या आत्मिक शक्तीने यथाशक्ती प्रतिरोध केला पाहिजे. त्याचप्रमाणे गौ - सेवकांच्या गायींचा वध करण्याचा जे हिंसक जन यत्न करतात, त्यांना राजाने व प्रजेने दंडित केले पाहिजे.।। ५।।

इस भाष्य को एडिट करें
Top