Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 463
ऋषिः - अनानतः पारुच्छेपिः देवता - पवमानः सोमः छन्दः - अत्यष्टिः स्वरः - गान्धारः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

अ꣣या꣢ रु꣣चा꣡ हरि꣢꣯ण्या पुना꣣नो꣢꣫ विश्वा꣣ द्वे꣡षा꣢ꣳसि तरति स꣣यु꣡ग्व꣢भिः꣣ सू꣢रो꣣ न꣢ स꣣यु꣡ग्व꣢भिः । धा꣡रा꣢ पृ꣣ष्ठ꣡स्य꣢ रोचते पुना꣣नो꣡ अ꣢रु꣣षो꣡ हरिः꣢꣯ । वि꣢श्वा꣣ य꣢द्रू꣣पा꣡ प꣢रि꣣या꣡स्यृक्व꣢꣯भिः स꣣प्ता꣡स्ये꣢भि꣣रृ꣡क्व꣢भिः ॥४६३॥

स्वर सहित पद पाठ

अ꣣या꣢ । रु꣣चा꣢ । ह꣡रि꣢꣯ण्या । पुना꣣नः꣢ । वि꣡श्वा꣢꣯ । द्वे꣡षाँ꣢꣯सि । त꣣रति । स꣣युग्व꣢भिः꣣ । स । यु꣡ग्व꣢꣯भिः । सू꣡रः꣢꣯ । न । स꣣यु꣡ग्व꣢भिः । स꣣ । यु꣡ग्व꣢꣯भिः । धा꣡रा꣢꣯ । पृ꣣ष्ठ꣡स्य꣢ । रो꣣चते । पुनानः꣢ । अ꣣रु꣢षः । ह꣡रिः꣢꣯ । वि꣡श्वा꣢꣯ । यत् । रू꣣पा꣢ । प꣣रिया꣡सि꣢ । प꣣रि । या꣡सि꣢꣯ । ऋ꣡क्व꣢꣯भिः । स꣣प्ता꣡स्ये꣢भिः । स꣣प्त꣢ । आ꣣स्येभिः । ऋ꣡क्व꣢꣯भिः ॥४६३॥


स्वर रहित मन्त्र

अया रुचा हरिण्या पुनानो विश्वा द्वेषाꣳसि तरति सयुग्वभिः सूरो न सयुग्वभिः । धारा पृष्ठस्य रोचते पुनानो अरुषो हरिः । विश्वा यद्रूपा परियास्यृक्वभिः सप्तास्येभिरृक्वभिः ॥४६३॥


स्वर रहित पद पाठ

अया । रुचा । हरिण्या । पुनानः । विश्वा । द्वेषाँसि । तरति । सयुग्वभिः । स । युग्वभिः । सूरः । न । सयुग्वभिः । स । युग्वभिः । धारा । पृष्ठस्य । रोचते । पुनानः । अरुषः । हरिः । विश्वा । यत् । रूपा । परियासि । परि । यासि । ऋक्वभिः । सप्तास्येभिः । सप्त । आस्येभिः । ऋक्वभिः ॥४६३॥

सामवेद - मन्त्र संख्या : 463
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 12;
Acknowledgment

शब्दार्थ -
हा सोम म्हणजे इंद्रियांना कर्म प्रवृत्त करणारा जीवात्मा (अया) हृदयहारिणी (कचा) तेजस्वितेद्वारे (पुनानः) पावित्र्य देत देत (सयुग्वभिः) सोबत वागणाऱ्या प्राणांशी मिळून (विश्वा) (द्वेषांसि) सर्व द्वेषी विघ्नांना अथवा काम, क्रोध आदी षड्रिपूंना (तरति) तरून जातो (त्यावर विजय मिळवितो). कशा प्रकारे ? (सूरः न) जसे सूर्य (सयुग्वभिः) सहयोगी किरणांसह मिळून (विश्वा द्वेषांसि) सर्व शत्रूभूत अंधकाराला (तरति) जिकून घेतो. (तसे आत्मा कामायी दोषांवर विजय मिळवितो). (पृष्ठस्य) तेव्हा प्रकाशाचे सिंचन करणाऱ्या आत्मारूप सोमच्या (धारा) प्रकाशधारा (रोचते) उद्भासित होतात (चमकतात) (अकषः) तेजामुळे तळपणाऱ्या (हरिः) पापाहारी हे आत्मा, तू (पुनानः) मन, बुद्धी आदींना पवित्र करणे (यत्) तसेच जेव्हा तू (ऋग्वभिः) प्रशंसनीय कर्म करीत (ऋग्वभिः) प्रशंसनीय (सप्तास्यैः) पंच ज्ञानेंद्रिये, मन व बुद्धी या सप्तमुख प्राणांसह (विश्वारूपा) सर्व रूपधारी मनुष्यांना (पिरयासि) प्राप्त होतोस (जेव्हा आत्मा सर्वांशी उत्तमपणे वागतो, तेव्हा आत्म्याचा खरा प्रकाश दिसून येतो.)।। ‘सूरो न सयुग्वभिः’ या वाक्यात सूर्याचा उपमान म्हणून उपयोग केल्यामुळे शेष मंत्र भागाचा अर्थ सूर्य - पक्षीदेखील घटित होत आहे. तो सूर्य कसा आहे ? तो (अया) या (हरिण्मा) तमोहारिणी (रूचा) दीप्तीने (पुनानः) भूमी पवित्र करीत (सयुग्वभिः) सहयोगी किरणआंद्वारे (विश्वा द्वेषांसि) सर्व द्वेषकारी अंधकार, रोग आदींचे (तरति) निवारण करतो. तो (पृष्ठस्य) वृष्टिकर्ता सूर्याच्या (धारा) प्रकाशधारा वा वृष्टि-धारा (रोचते) चमकते. तो (अरुषः) तेजमय रूपधारी सूर्य (हरिः) आकर्षण शक्तीने पृथ्वी आदी लोकांचा धारण कर्ता असून (पुनानः) त्यांना पवित्र वा शुद्ध करणे. (यत्) जेव्हा (सप्तास्येभिः) सात मुख वा रंग असलेल्या (ऋग्वभिः) प्रशंसनीय किरणांनी तो सूर्य (विश्वा रूपाणि) सर्व आकारवान पदार्थांना (परियाति) प्राप्त होतो. (वा व्यक्त होण्यास कारणीभूत ठरतो, तेव्हा तो पदार्थाना पावित्र्य देतो.)।। ७।।

भावार्थ - जसे सूर्य आपल्या किरणांनी रोग, मालिन्यादी दूर करून साऱ्या भूमंडळाला पवित्र करतो, तसे मनुष्यांनी आत्म्यातील पापवृत्ती, द्वेष आदी कल्मष दूर करून आपले जीवन पवित्र केले पाहिजे.।। ७।।

इस भाष्य को एडिट करें
Top