Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 464
ऋषिः - नकुलः देवता - सविता छन्दः - अत्यष्टिः स्वरः - गान्धारः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
1

अ꣣भि꣢꣫ त्यं दे꣣व꣡ꣳ स꣢वि꣣ता꣡र꣢मो꣣꣬ण्योः꣢꣯ क꣣वि꣡क्र꣢तु꣣मर्चा꣡मि꣢ स꣣त्य꣡स꣢वꣳ रत्न꣣धा꣢म꣣भि꣢ प्रि꣣यं꣢ म꣣ति꣢म् ऊ꣣र्ध्वा꣢꣫ यस्या꣣म꣢ति꣣र्भा꣡ अदि꣢꣯द्युत꣣त्स꣡वी꣢मनि꣣ हि꣡र꣢ण्यपाणिरमिमीत सु꣣क्र꣡तुः꣢ कृ꣣पा꣡ स्वः꣢ ॥४६४॥

स्वर सहित पद पाठ

अ꣣भि꣢ । त्यम् । दे꣣व꣢म् । स꣣विता꣡र꣢म् । ओ꣣ण्योः꣢꣯ । क꣣वि꣡क्र꣢तुम् । क꣣वि꣢ । क्र꣣तुम् । अ꣡र्चा꣢꣯मि । स꣣त्य꣡स꣢वम् । स꣣त्य꣢ । स꣣वम् । रत्नधा꣢म् । र꣣त्न । धा꣢म् । अ꣣भि꣢ । प्रि꣣य꣢म् । म꣣ति꣢म् । ऊ꣣र्ध्वा꣢ । य꣡स्य꣢꣯ । अ꣣म꣡तिः꣢ । भाः । अ꣡दि꣢꣯द्युतत् । स꣡वी꣢꣯मनि । हि꣡र꣢꣯ण्यपाणिः । हि꣡र꣢꣯ण्य । पा꣣णिः । अमिमीत । सुक्र꣡तुः꣢ । सु꣣ । क्र꣡तुः꣢꣯ । कृ꣣पा꣢ । स्वा३रि꣡ति꣢ ॥४६४॥


स्वर रहित मन्त्र

अभि त्यं देवꣳ सवितारमोण्योः कविक्रतुमर्चामि सत्यसवꣳ रत्नधामभि प्रियं मतिम् ऊर्ध्वा यस्यामतिर्भा अदिद्युतत्सवीमनि हिरण्यपाणिरमिमीत सुक्रतुः कृपा स्वः ॥४६४॥


स्वर रहित पद पाठ

अभि । त्यम् । देवम् । सवितारम् । ओण्योः । कविक्रतुम् । कवि । क्रतुम् । अर्चामि । सत्यसवम् । सत्य । सवम् । रत्नधाम् । रत्न । धाम् । अभि । प्रियम् । मतिम् । ऊर्ध्वा । यस्य । अमतिः । भाः । अदिद्युतत् । सवीमनि । हिरण्यपाणिः । हिरण्य । पाणिः । अमिमीत । सुक्रतुः । सु । क्रतुः । कृपा । स्वा३रिति ॥४६४॥

सामवेद - मन्त्र संख्या : 464
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 12;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (परमात्मपर) - (मी (य्तम्) त्या प्रख्यात गुण- कर्म अस्वभाव असणाऱ्या (ओण्योः) द्युलोक- पृथ्वीलोकाचा अथवा वाणीव मनाचा जो (देवम्) प्रकाशक असून जो (कविक्रतुम्) क्रांतदर्शिनी प्रज्ञाधारक वा बुद्धिपूर्वक कर्म करणारा आहे. (त्याची पूजा- अर्चना करतो) तो (एकसवम्) सत्यरूप ऐश्वर्याचा वा सप्रेरणेचा स्वामी असून (रत्नधाम्) रमणीय ग्रह नक्षत्रादीचा धारणकर्ता (प्रियम्) प्रिय आणि (यतिम्) ज्ञानी आहे, अशा (सवितारम्) जगदुत्पादक परमेश्वराची मी (अभि अर्चानि) पूजा, अर्चना करतो. तो परमेश्वर असा आहे की (यस्य) ज्याची (ऊर्ध्वा) उत्कृष्ट (अमतिः भाः) आत्मदीप्ती (अदिघुतत्) उपासकांना आत्मिक प्रकाश देते. आम्ही सर्व जणांनी त्याच्या (सवीमसि) अनुशासनात असावे. (हिरण्याषाणिः) ज्योती (सूर्य आदीना) जो व्यवहारात वा लोकोपकारक कार्यात लावतो आहे, त्या (सुक्रतुः) उत्तम प्रज्ञावान व उत्तम कर्मकर्ता परमेश्वराने (कृपा) त्याच्या कृपेने (स्वः) ज्योतिष्मान सूर्याचे (अभिमीत निर्माण केले आहे.।। द्वितीय अर्थ - (राष्ट्रपर अर्थ) - मी एक प्रजाजन, त्या विशिष्ट गुण, कर्म- स्वभाव असणाऱ्या (ओण्योः) स्त्री - पुरुषांना (देवम्) विद्यादीद्वारे सुशोभित करणाऱ्या (किवक्रतुम्) बुद्धिपूर्वक कर्म करणाऱ्या (स्तयसवम्) सत्य ज्ञानी (रत्न धाम्) रमणीय धन देणाऱ्या (प्रिय सर्वप्रिया आणि (मतिम्) विचारसील (सवितारम्) सदाचार प्रेरक राजाचा (अभि अर्चामि) सत्कार करतो. (तो असा आहे की (यस्य) ज्याचे (ऊर्ध्वा) उच्च (अमतिः) सर्वाधिक तेजस्वी रूप असून ज्याची ज्याचे (भाः) यशरूप कान्ती (अदिघुतत्) इतरांनाही तेजस्वी व यशस्वी करते. त्याच्याच (सवीमनि) अनुशासनात आम्ही रहावे. (हिरण्यपाणिः) सुवर्ण आदी धन आपल्या हातात घेऊन सर्वांना दान करणारा तो राजा (सुक्रतुः) शुभ कर्म करणारा सून तो आपल्या (कृपा) सामर्थ्याने राष्ट्रात (स्वः) सुख व आनंद (अभिमीत) उत्पन्न करतो.।। तृतीय अर्थ - (सूर्यपर) - मी (त्यम्) त्या दूरवर्ती (ओण्योः) भूमी व आकाशाला (देवम्) प्रकाशित करणारा (कविक्रतुम्) मेघावीजनाप्राणे भूमंडळ - धारण, ऋतुचक्र परिभ्रमण आदी कार्य करणारा (स्तयसवम्) जलाला वर खाली नेणारा - आणणारा (रत्नधाम्) सोने, चांगी, हिरे, मोती आदी रत्न भूगर्भात स्थापित करणारा (प्रियम्) तृप्तिदाता व (मतिम्) ज्ञान प्राप्तीत साधन असा आहे. अशा त्या (सवितारम्) सूर्याची मी (अभि अर्चामि) पूजा, अर्चना करतो, म्हणजे त्याच्या गुण कर्मांचे वर्णन करतो. तो असा आहे की (यस्य) ज्याची (अमतिः भाः) रूपवती प्रभा (सवीमनि) उत्पन्न भूमंडळावर (अदिद्युतत्) सर्व पदार्थांना प्रकाशित कतरे. तो (हिरण्यपाणिः) सोनेरी किरणे असलेला (सुक्रतुः) उत्तम हितकर कर्मे करणारा सूर्य (कृपा) आपल्या शक्तीने (स्वः) प्रकाश (मम्मिनीत) उत्पन्न करतो.।। ८।।

भावार्थ - अनुपम गुण- कर्म- स्वभाव असणाऱ्या त्या परमेश्वराची उपासना करून, राजाचा सत्कार करून आणि सूर्याकडून मिळणारे लाभ प्राप्त करून सर्वजण सुख - आनंद मिळवतात.।। ८।।

इस भाष्य को एडिट करें
Top