Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 48
ऋषिः - मनुर्वैवस्वतः देवता - अग्निः छन्दः - बृहती स्वरः - मध्यमः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
1

अ꣣ग्नि꣢रु꣣क्थे꣢ पु꣣रो꣡हि꣢तो꣣ ग्रा꣡वा꣢णो ब꣣र्हि꣡र꣢ध्व꣣रे꣢ । ऋ꣣चा꣡ या꣢मि मरुतो ब्रह्मणस्पते꣣ दे꣢वा꣣ अ꣢वो꣣ व꣡रे꣢ण्यम् ॥४८॥

स्वर सहित पद पाठ

अ꣣ग्निः꣢ । उ꣣क्थे꣢ । पु꣣रो꣡हि꣢तः । पु꣣रः꣢ । हि꣣तः । ग्रा꣡वा꣢꣯णः । ब꣣र्हिः꣢ । अ꣣ध्वरे꣢ । ऋ꣣चा꣢ । या꣣मि । मरुतः । ब्रह्मणः । पते । दे꣡वाः꣢꣯ । अ꣡वः꣢꣯ । व꣡रे꣢꣯ण्यम् ॥४८॥


स्वर रहित मन्त्र

अग्निरुक्थे पुरोहितो ग्रावाणो बर्हिरध्वरे । ऋचा यामि मरुतो ब्रह्मणस्पते देवा अवो वरेण्यम् ॥४८॥


स्वर रहित पद पाठ

अग्निः । उक्थे । पुरोहितः । पुरः । हितः । ग्रावाणः । बर्हिः । अध्वरे । ऋचा । यामि । मरुतः । ब्रह्मणः । पते । देवाः । अवः । वरेण्यम् ॥४८॥

सामवेद - मन्त्र संख्या : 48
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 5;
Acknowledgment

शब्दार्थ -
(अये) स्तुतिमय (अध्वरे) हिंसादी दोषरहित उपासना यज्ञामध्ये (अग्नि) ज्योतिर्मय परमात्मा (पुरोहित) समोर विहित आहे. (उपासक उपासना स्थितीतील स्वानुभवांचे वर्णन करीत आहे.) (ग्रावाण:) स्तुतीचे शब्द यज्ञाप्रसंगी लागणारे पाटा-वरवंटा (पुरोहिता) समोर स्थित आहेत. (बर्हि:) हृदय हेच कुशानिर्मित आसन (पुरोहितम्) सन्मुख स्थित आहे. हे (मसत) माझे प्राण हे (ब्रह्मण:पते) ज्ञानगुणसंपन्न माझ्या जीवात्मा हे (देवा) इन्द्रिय-मन-बुद्धी रूप ऋत्विजगण हो, मी (उपासक) (ऋचा) ईशस्तुतिरूप वाणीसह तुमची (वरेण्यम्) वरणीय (अव) रक्षा (यामि) मागत आहे. ।।४।।

भावार्थ - जसे बाह्ययज्ञात यज्ञवेदीत अग्नी प्रज्वलित केला जातो, जसे तिथे सोम आदी औषधी कुटण्यासाठी पाटा वरवंटा तसेच ऋत्विजगण बसण्यासाठी कुशानिर्मित आसन तयार असतात, तसेच उपासनायज्ञात परमात्मरूप अग्नी समिद्ध केला जातो. त्यावेळी उच्चारले जाणारे शब्द हेच पाटा वरवंटा असतात. हृदय हेच कुशा आसन आणि बृहस्पतिनाम जीवात्मा हाच यजमान होतो. प्राण, इंद्रिय, मन, बुद्धी हे सर्व ऋत्विज होऊन हृदयासनावर विराजमान होऊन त्या उपासना यज्ञाचा विस्तार करतात. कारण की, या यज्ञात त्यांचे सप्रय्य आणि त्यांचे रक्षण सामर्थ्य साफल्यासाठी आवश्यक आहे. यामुळे सर्व उपासकांनी आभ्यन्तर यज्ञ हम्णजे हृदयात होणाऱ्या उपासना यज्ञात त्यांच्या रक्षण सामर्थ्याची याचना केली पाहिजे. ।।४।।

इस भाष्य को एडिट करें
Top