Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 499
ऋषिः - उचथ्य आङ्गिरसः
देवता - पवमानः सोमः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - पावमानं काण्डम्
1
अ꣡ध्व꣢र्यो꣣ अ꣡द्रि꣢भिः सु꣣त꣡ꣳ सोमं꣢꣯ प꣣वि꣢त्र꣣ आ꣡ न꣢य । पु꣣नाही꣡न्द्रा꣢य꣣ पा꣡त꣢वे ॥४९९॥
स्वर सहित पद पाठअ꣡ध्व꣢꣯र्यो । अ꣡द्रि꣢꣯भिः । अ । द्रि꣣भिः । सुत꣢म् । सो꣡म꣢꣯म् । प꣣वि꣡त्रे꣢ । आ । न꣣य । पुनाहि꣢ । इ꣡न्द्रा꣢꣯य । पा꣡त꣢꣯वे ॥४९९॥
स्वर रहित मन्त्र
अध्वर्यो अद्रिभिः सुतꣳ सोमं पवित्र आ नय । पुनाहीन्द्राय पातवे ॥४९९॥
स्वर रहित पद पाठ
अध्वर्यो । अद्रिभिः । अ । द्रिभिः । सुतम् । सोमम् । पवित्रे । आ । नय । पुनाहि । इन्द्राय । पातवे ॥४९९॥
सामवेद - मन्त्र संख्या : 499
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 4;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 4;
Acknowledgment
विषय - अध्वर्यूला प्रेरणा
शब्दार्थ -
(अध्वर्यो) यज्ञविधीचा निष्पादक अध्वर्यू नाम ऋत्विजाप्रमाणे ज्ञानयज्ञ संपन्न करणाऱ्या हे मनुष्य, तू (अद्रिभिः) पाटा - वरवंट्याप्रमाणे असलेल्या ज्ञानेंद्रियांद्वारे (सुतम्) काढलेला (सोमम्) सोम औषधीचा रस (पवित्रे) दशापवित्र पात्राप्रमाणे असलेल्या मनरूप पात्रामध्ये (आ नय) आण. नंतर तो ज्ञानरूप सोमरस (इन्द्राय पातवे) जीवात्म्याद्वारे सेवन करण्यासाठी (पुनाहि) मनन प्रक्रियेने शुद्ध कर.।। ३।।
भावार्थ - ज्याप्रमाणे यज्ञात कुटणे, रगडणे आदीच्या पाटा - वरवंटा साधनांनी काढलेला सोमरस दशा पवित्र चाळणीद्वारे चाळून शुद्ध करून पितात व पाजवितात, त्याप्रमाणे ज्ञानार्जनाची साधने म्हणजे ज्ञानेंद्रिये, त्याद्वारे अर्जित ज्ञानाला मनाद्वारे शुद्ध केले पाहिजे.।। ३।।
विशेष -
या मंत्रात श्लेषाद्वारे निघणारा भौतिक सोमविषयक अर्थ (द्वितीय अर्थ) उपमानभावेन व्यक्त होत आहे. (या मंत्रात पाटा - वरवंटा, दशा- पवित्रा मात्र, सोम औषधी ही सर्व उपमान भौतिक पर्दा आहेत व ज्ञानेंद्रिये, मन, जीवात्मा हे सर्व आध्यात्मिक प्रतिके आहेत. म्हणून या मंत्राचे दोन अर्थ निघताहेत.)